शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

अंतराळात आता मानवी रोबोट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 07:10 IST

जी कामं करताना अंतराळवीरांना धोका संभवतो, ती कामं करायला थेट रोबोटच अवकाशात जातोय.

ठळक मुद्देहा स्कायबॉट साधारण दोन आठवडे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात राहणार आहे

- प्रसाद ताम्हनकर

अंतराळात आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक (आयएसएस) दोन दशकांपूर्वी यशस्वीपणे कार्यरत झाले. या दोन दशकात विविध देशांच्या अनेक अंतराळवीरांनी इथे राहून आपापली शोधकार्ये उत्तम केली. यावेळी या अवकाश स्थानकाला एक अनोखा पाहुणा भेट देतो आहे. हा पाहुणा म्हणजे कोणी मानवी अंतराळवीर नसून, चक्क एक मानवी रोबोट आहे. नुकतेच कझाकिस्तानच्या बायकोनूर कॉस्मोड्रॉम इथून रशियाच्या अवकाश संस्थेने (रॉस्कोसमॉसने) या ह्युमनॉइड रोबोटचं यशस्वी लाँचिंग केलं. स्कायबॉट एफ-850 असं नाव या रोबोटला देण्यात आलं आहे. यानिमित्ताने रॉस्कोसमॉसने आपल्या अपडेटेट सूयोझ 2.1 या अद्ययावत रॉकेटचीदेखील चाचणी पार पाडली. रॉस्कोसमॉसने केलेल्या ट्विटनुसार ही संस्था पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक (आयएसएस)शी डॉकिंग करण्याच्या प्रयत्नात आहे. यापूर्वी केलेला त्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरलेला होता. मात्र आता या स्कायबॉटकडेच या यानाचे सारथ्य देण्यात आले होतं जे त्यानं यशस्वीपणे पार पाडलं. क्रू-मेंबर म्हणून त्याला पाठविण्यात आलं आहे. मानवी अंतराळवीरांसाठी धोकेदायक असलेली अवकाश स्थानकाशी संबंधित काही कामं या रोबोटच्या मदतीने करण्यात येणार आहेत. त्यासाठीचे प्रशिक्षण घेण्यासाठीच हा रोबोट रवाना झाला आहे. एका वृत्तानुसार या स्कायबॉटचे वजन 165 किलो असून, उंची 5 फूट 11 इंच आहे. या रोबोटला आर्टिफिशियल इंटेलिजन्सचीदेखील जोड देण्यात आलेली आहे. यापूर्वी हा रोबोट काही जाहिरातींमध्ये तसेच ऑनलाइन व्हिडीओमध्ये रेस्क्यू ऑपरेशनसाठी शस्त्नास्त्रांचे प्रशिक्षण घेताना दिसला होता. FEDOR (Final Experimental Demonstration Object Research)   अशी व्याख्या करण्यात आलेल्या या रोबोटला काही योग्य ते बदल करून उड्डाणाच्या वेळी पायलट सीटला चक्क बांधण्यात आले होते. अर्थात, त्याचं काम त्यानं चोख बजावलंच. हा स्कायबॉट साधारण दोन आठवडे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात राहणार आहे. या काळात त्याला विविध अवजारे, जसे की स्पॅनर, अगिAशमनयंत्न यांचा उपयोग कसा करायचा याचं प्रशिक्षण देण्यात येईल. यापूर्वी नासाने Robonaut 2 (R2), Robonaut 1 (R1)  असे रोबोट्स आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात पाठवलेले होते.आता हे रोबोट तिथं कसं काम करतात हे लवकरच दिसेल!