शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

दारू पिऊन गाडय़ा चालवणा:या मुलींना लगाम?

By admin | Updated: June 25, 2015 14:52 IST

मुली दारू पिऊन बेदरकार गाडय़ा उडवत नाही, असा आजवर एक समज होता. नाकाबंदीत पोलीसही तरुणींना अडवत नसत. आता मात्र पोलिसांनीच ठरवून टाकलंय की, मुलगी आहे म्हणून काही सूट नाही, आणि दारू पिऊन गाडी चालवणा:या मुलींची गय नाही! पण प्रश्न असा आहे की, दारू पिऊन गाडय़ा उडवण्याइतका उद्दाम बेदरकारपणा मुलींमधे आला कुठून?

- जयेश शिरसाठ
 
‘‘इझी गाईज, ‘फुलटू’ होऊन अनेकदा नाकाबंदी पार केलीये मी! घाबरायचं काहीच कारण नाही!! बाई गाडी चालवताना दिसली की नाकाबंदीत गाडी अडवणं सोडाच पण पोलीस ढुंकूनही पाहत नाहीत. सो चील..’’
ही वाक्यं मुंबईच्या पार्टी गोअर्सना काही नवीन नाहीत. सॅटर्डे नाइट एन्जॉय करून, पबमधल्या किंवा कॉर्पोरेट पाटर्य़ा झोडून घरी परतताना अनेकदा तरुण मुलींनाच ड्राइव्ह करायला सांगण्याचा मुंबईत ट्रेण्ड आहे. अनेक ठिकाणी तर सेफ्टी म्हणून ग्रुपमधल्या न पिणा:या मुलीलाच गाडी चालवायलाही सांगितलं जातं.
त्याचं कारण एकच, तरुणी स्कूटरवर असो नाही तर चारचाकी चालवत असो, शक्यतो नाकाबंदीवाले ती गाडी अडवून  यंत्र तोंडाला लावून काही दारू प्राशन केल्याची टेस्ट करण्याच्या भानगडीत पडत नाहीत.
त्यामागे आजवर तरी एक भाबडा विश्वास होता की, शक्यतो म्हणजे सहसा आपल्याकडे बायका दारू पीत नाहीत आणि प्याल्या तरी त्या काही दारू पिऊन पुरुषी बेदरकारपणा दाखवत गाडी चालवणार नाहीत.
या समजालाच गेल्या काही दिवसांत तडा गेला. आणि आता मुंबईत पोलिसांपुढे मोठा प्रश्न आहे की, तरुण मुलींच्या संदर्भात ड्रिंक अॅण्ड ड्राइव्हच्या केसेस कशा रोखायच्या?
मुंबईसारख्या मेट्रो शहरात आजच्या घडीला हे वास्तव आहे की दारू पिऊन फर्लागभर बाइक चालवायची तरी पुरुष दहावेळा विचार करतील. कदाचित नाहीही म्हणतील. अंतर लांब असेल तर सरळ टॅक्सी-रिक्षा पकडतील. पार्टी करून परत जाताना गाडी कोण चालवेल या विचाराने पार्टीत ‘न पिणा:या’ मित्रला आवर्जून सोबत घेतील. आणि हे कमीच म्हणून हल्ली सरळ गाडय़ा बुक केल्या जातात. तशा गाडय़ा पुरवणा:या एजन्सीजही मुंबईत भरपूर आहेत. पार्टी संपली की भाडय़ाची गाडी ड्रायव्हरसह उपलब्ध. ठरल्या मुक्कामी मुकाट नेऊन सोडते. 
या सा:याचं कारण रात्री असणारी नाकाबंदी आणि जागोजागी होणारं चेकिंग. आता दारू पिऊन गाडी चालवायची म्हटलं तरी अनेक तरुणांच्या अंगावर काटा येतो, कारण नको ती झंझट मागे लागण्याचं संकट!
या सा-यात झालं मात्र उलटंच!
मुली मात्र बिंधास्त. भीड चेपल्यासारख्या बेधडक गीअर टाकतात आणि सर्रकन निघूनही जातात. 
या महिन्याच्या 8 तारखेर्पयत मुंबईत असंच घडत होतं. पण 8 जूनच्या मध्यरात्रीपासून तरुणींच्या या दबंगगिरीवर मर्यादा आल्या.  रिलायन्स कंपनीत व्हाईस प्रेसिडेण्ट असलेल्या जान्हवी गडकर या 32 वर्षाच्या तरुणीनं दारू पिऊन बेदरकार गाडी चालवत आपल्या ऑडीनं समोरून येणा:या एका टॅक्सीला अशी काही धडक मारली की त्या टॅक्सीचालकासह दोघांनी जागेवरच प्राण सोडला, तर उर्वरित चार प्रवाशांनाही गंभीर जखमा झाल्या. 
जान्हवीचं शिक्षण परदेशात झालंय. इथे ती देशातल्या आघाडीच्या कंपनीची कायदेशीर सल्लागार म्हणून काम करत होती. त्यामुळे दारू पिऊन गाडी चालवणं गुन्हा आहे हे तिला माहीत नसेल असं काही नाही. त्यात जिथं अपघात झाला त्या फ्री-वेच्या दोन्ही तोंडांना अनेकदा नाकाबंदी असते. वाहतूक पोलीसही तैनात असतात हेदेखील माहिती असेल. तरी ती प्रचंड दारू पिऊन सुसाट निघाली याचं कारण हेदेखील असेल का, की मुलींना कुणी अडवत नाही?
प्रश्न एकटय़ा जान्हवीपुरता उरलेला नाही. मेट्रो शहरांमधल्या कॉर्पोरेट कल्चरमध्ये वावरणा:या, नाइट आऊटला बाहेर पडणा:या किंवा कामाचा हँगओव्हर दूर करण्यासाठी नाइटलाइफकडे पर्याय म्हणून पाहणा:या आणि सोशल ड्रिंक्सपासून व्यसनांर्पयतचा प्रवास गाठत दारू पिणा:या अनेक तरुणींचा आता हा प्रश्न आहे. आणि तो फक्त मुंबईपुरता नाही, तर देशातल्या सगळ्याच मेट्रो शहरांतला आणि वेगानं मोठय़ा होत असलेल्या शहरांचाही आहेच! कारण मुलींमध्ये ‘सोशल ड्रिंक्स’चं प्रमाण वाढलंय हे जितकं खरं, तितकंच दारू पिऊन गाडी चालवण्याचंही! आपल्याला काही नाही होत असा एक बेदरकारपणाही त्यात आलेला दिसतो. कारण मुंबईच नाही, तर दिल्ली आणि चेन्नईमधेही गेल्या काही दिवसात मुलींबाबतच्या ड्रिंक अॅण्ड ड्राइव्हच्या केसेस वाढलेल्या आहेत.
आजवर व्हायचं असं की, पोलीस मग तो मुंबईतला असो की पुण्यातला, तरुण मुलगी किंवा बाई गाडी चालवतेय म्हटल्यावर जरा सावधपणो चौकशी करतो. अनेकदा कार चालवणा:या मुलींना नाकाबंदीतून सूट मिळते.  जोडप्यालाही पोलीस अडवत नाहीत.  एकेकटी तरुणी जर रात्री गाडी चालवत असेल तर पोलिसांना तिच्या सुरक्षिततेची काळजी वाटते.
पण हे सारं ‘वाटणं’ आपला भाबडेपणा होता की काय, असा प्रश्न आता पोलिसांनाही पडू लागला आहे. आता त्यांच्यासमोर आव्हान आहे ते महिला वाहनचालकांच्या तपासणीचं आणि दारू पिऊन त्यांनीही गाडी चालवू नये म्हणून कठोर होऊन नियमांच्या अंमलबजावणीचं!
जान्हवी गडकरने केलेल्या अपघातानंतर आता मुंबईत तरी वाहतूक पोलिसांनी तरी निश्चय केलाय की, नाकाबंदीमध्ये तरुण मुलींचीही झाडाझडती घ्यायचीच!  
कारण गेल्या संपूर्ण वर्षात ड्रिंक अॅण्ड ड्रायव्हिंग मोहिमेत 7 ते 8 हजार पुरुष चालकांवर कारवाई झाली. त्यात कारवाई झालेल्या महिलांची संख्या 10 ते 12 आहे. यावर्षी 8 जूनर्पयत फक्त एकाच महिलेवर कारवाई झाली होती. आता गडकर प्रकरणानंतर वाहतूक पोलिसांनी 2क् ते 25 तरुणींना दारू पिऊन गाडी चालवताना पकडलं आहे.
त्यात आणखी महत्त्वाचं म्हणजे आत्तार्पयत रात्रीबेरात्री लागणा:या नाकाबंदीची जबाबदारी महिला पोलिसांवर नव्हती. पुरुष कर्मचारीच डय़ूटीवर असायचे. ब्रेथ अॅनलायझर यंत्र सोबत घेऊन पोलीस गाडय़ा थांबवायचे. ते यंत्र चालकाच्या तोंडाजवळ नेऊन तो दारू प्यायलाय की नाही हे तपासायचे. कुठून आलात, कुठं चालतात, नाव काय, कुठं जायचंय असे प्रश्न विचारून दारू प्यालेल्यांवर कारवाई केली जायची. आता त्यांचा प्रश्न आहे की, ही पद्धत महिला चालकांच्या बाबतीत कशी वापरणार? म्हणून मग आता वाहतूक पोलिसांनी नाकाबंदीतही महिला अधिकारी-कर्मचा:यांची डय़ूटी लावली आहे.
यंत्रणोवरचा ताण वाढला आहे हे नक्की, पण आता गाडी चालवणा:या तरुणींना कुठलाही सॉफ्ट कॉर्नर मिळणार नाही. दारू पिऊन गाडी चालविण्याची हिंमत त्या करणार नाहीत, असे प्रयत्न सुरू झाले आहेत!
पोलीस यंत्रणा तर कामाला लागली आहे; पण खरा प्रश्न हा आहे की, दारू पिऊन गाडी चालवण्याचा बेदरकारपणा तरुणीकमी करतील का? स्वत:सह इतरांचाही जीव आपण धोक्यात घालतो आहोत आणि असं करणं गुन्हा आहे, हे तरी किमान समजून घेतील का?
 
 
तरुण मुली दारू पिऊन गाडी चालवण्याचा बेदरकार उद्दामपणा करत नाहीत असं मानलं जायचं. पण आता परिस्थिती तशी राहिलेली नाही. आता स्त्री-पुरुष असा कुठलाही भेदभाव न करता, सरसकट वाहनचालकांची तपासणी करा असं आम्ही यंत्रणोला बजावलं आहे. अर्थात, या कारवाईचा परिणाम लगेच होणार नाही. थोडा वेळ लागेल, पण परिस्थिती बदलेल हे नक्की!
- मिलिंद भारंबे 
 सहपोलीस आयुक्त, मुंबई
 
 
............................
 
(‘लोकमत’च्या मुंबई आवृत्तीत रिपोर्टर म्हणून काम करणारा जयेश  ‘क्राईम बीट’चा जाणकार आहे)