शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

वाटतं जावं पळून, अशी तुमची चिडचिड झाली आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 15:42 IST

कंटाळा आला जगण्याचा, असं वाटतं नको हे सगळं. जावं कुठं तरी पळून. हे घरात बसणं नको, ही कटकट नको, हे घरकाम नको, हे बोअर आयुष्य नको

ठळक मुद्देजायचं का पळून?

- अनन्या भारद्वाज

कंटाळा आला जगण्याचा, असं वाटतं नको हे सगळं. जावं कुठं तरी पळून. हे घरात बसणं नको, ही कटकट नको, हे घरकाम नको, हे बोअर आयुष्य नको. वाटतं जावं पळून.- असं आताशा येतं ना तुमच्या मनात. वाटतं नको ही रूटीनची कटकट. त्यात हा कोरोना. त्याचा कहर. घरात तंगीबिंगी, घरकाम करा, घरातच बसा, काहीतरी नवीन शिक, हातात वेळ आहे तर हा घरच्यांचा डोस.नोकरी लागेल का, परीक्षा होईल का, कुणी जॉब देईल का,  आहे ती रिलेशनशिप तरी टिकेल का?असे अनेक प्रश्न तुमच्या मनात येत असतीलच.आणि वाटत असेल जावं पळून?पण सांगा, कुठं पळणार? कुठं जाणार पळून? हा कोरोना तर सगळीकडे आहे, जगभरात आहे. कुठं जाताही येणार नाही, अगदी जिल्हाही सोडता येणार नाही, अशी जिल्हाबंदी आहे.मग पळून जायचं कुठं? आणि कसं?बरं घरात असं काही म्हणावं तर घरचे म्हणणार जा, बाहेर कुणी विचारतंय का बघ, काय धमक्या देतो पळायच्या, पळायला आहेच कुठं तुला जागा?म्हणजे थोडक्यात काय तर पळायलाही जागा नाही.पण म्हणून आपण या भावनेचाच विचार करायला हवा की पळून जायचं म्हणजे नेमकं कुठं जायचं? कसं जायचं? कुणापासून पळायचं?असहायता, नैराश्य, कधी समस्या, कधी माणसं, कधी मोठंच काहीतरी कमावण्याचं स्वपA, कधी अगदीच नको होणं परिस्थिती यापायी अनेकांना पळून जावंसं वाटतं. सध्याचं आयुष्य, माणसं, परिस्थिती यासा:याचा तिटकारा आला आहे असं वाटतं.कुणाचं तोंड पाहू नये असंही वाटतं. कितीही जीव रमवला ऑनलाइन, कितीही घातलं तोंडाला कुलूप तरी वाटतं नको हे सारं. पार तिडीकच जाते डोक्यात.पण मग उपाय शोधायलाही सुरुवात होते.

आता तर पळणंही शक्य नाही मग आपण नेटवर शोधाशोध करतो. हाऊटू हेल्प युअरसेल्फ, हाऊ टू हिल युअरसेल्फ, पॉङिाटिव्ह थिंकिंग, रिलॅक्स कसं व्हावं यासाठीच्या टिप्स काय असतात? पुस्तकं वाचा, ऑनलाइन गेम्स खेळा, असंही काहीजण करून पाहतात.पण तरी बोअरडम काही कमी होत नाही.वाटतं, आता आहे ते मागे सोडून आपण निघून गेलो, या गुंत्यात नाहीच अडकलं तर कदाचित आपलं जगणं बदलेल.आता नाही जरा परिस्थिती सुधारली की पळू.मग आपण आपल्या सोयीच्या सोयीसोयीने यशस्वी झालेल्यांच्या गोष्टी वाचतो. सिनेमे पाहतो. त्यांचा संघर्ष पाहतो, वाटतं हे एवढं तर मलाही जमेल.त्यात आपण हे विसरतो की आज कुणी घरातून पळाला, म्हणजे लगेच उद्या त्याला यश मिळालं असं होत नाही. सगळेच बसलेले फटके कुणी सांगत नाही.आपली मानसिक स्थिती जर लो असेल, आधीच गाडी खडकत असेल, रडतखडत चालत असेल तर आपण डायरेक्ट पळून जाऊन सुसाट कसं धावायला लागणार?म्हणजे घरात आपण चार पाऊलं चालत नाही आणि बाहेर जाऊन आपण लगेच मॅराथॉन जिंकणार असं कसं होईल?पण आपण असे प्रश्न स्वत:ला विचारत नाही.उत्तम तब्येत, नीट प्लॅनिंग, उत्तम परिस्थितील आर्थिक थोडं का होईना पाठबळ किंवा आपण जमवलेले पैसेआणि नेमकं आपण काय करणार हे ठरलेलं असताना काहीतरी वेगळं करून पाहणं वेगळं.पण डोक्यात वारं आलं म्हणून पळत सुटणं म्हणजे आपटी खाणंच आहे.पण मग यावर उपाय काय? परिस्थिती बदलायचा प्रयत्न करायचाच नाही का?असंच कुजत जगायचं का?तर अजिबात नाही.त्यावर उपाय म्हणजे, आपल्याला न आवडणारी घरातली माणसं असली, तरी ती मायेची असतात.त्यांना आपल्याविषयी थोडं तरी प्रेम असतं, बाहेर आपण अनोळखी लोकांनी जुळवून घ्यायला तयार आहोत तर मग आपल्याच घरातल्या माणसांशी मायेनं बोलायला, कधी जरा पडतं घेत त्यांचं म्हणणं ऐकून तरी घ्यायला काय हरकत आहे?कधी कधी नात्यात साचलेपण येतं. एकमेकांना गृहीत धरायला लागतो आपण.त्यापेक्षा अगदी लहान बहीण भाऊ, मोठे बहीण भाऊ, नात्यातले कुणी, आईबाबा यासा:यांशी बोलायला लागा. डायरेक्ट मनातलं नाही तर इकडचं तिकडचं, जरा गप्पा मारा.सहजच फोन करा. जमलं तर आपलं मन मोकळं करा.  त्यांनी काही सांगितलं तर ऐकून पहा. ते करूनही पहा. पळून जाण्यापेक्षा आपल्या निगेटिव्ह विचारांपासून पळा. लांब व्हा.आहे त्या परिस्थितीत टिच्चून उभा राहीन असं म्हणा, आणि कामाला तर लागा.घरात साफसफाई करणं, भांडीच घासणं, घरात जाळी काढणं, कपडे धुणं अगदी कोणतंही काम करा. त्यानं जरा मन तर हलकंच होईल, घरही आपलं वाटेल.त्या घरात रुजायचा प्रयत्न करा.आणि पळू नका, स्वत:पासून पळणं कधीच जमणार नाही..त्यापेक्षा या घरबंद काळात जरा जगून तर बघा, वेगळ्या रीतीने.