शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

इश्क का अंगुठा ! - वाचा,अमृता प्रितमच्या दिवानगीचा आलम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 17:45 IST

31 ऑगस्ट हा अमृता प्रितमचा जन्मदिवस. आज ती असती तर 101 वर्षाची झाली असती. मात्र ती नसली तरी, समरसून जगण्याची, प्रेमात स्वत:ला विसरून जाण्याची तिची कहाणी, चिरतरुण आहे.

ठळक मुद्देमेरे इश्क के जख्म तेरी याद ने सिये थे

- लीना पांढरे

‘रात्नीचा कटोरा कुणी जिंदगीच्या शहदने भरू शकला नाही आणि सच्चाईचे ओठ तो शहद कधी चाखू शकले नाहीत हा दु:खांत नसतो.. दु:खांत असतो जेव्हा या रात्नीच्या कटो:याला असलेली चंद्राची कल्हई निघून जाते आणि कटो:यातील कल्पना नासून जाते. आपल्या दुर्दैवामुळे आपल्या सजणाच्या नावागावाचा ठावठिकाणा गवसू नये आणि आपल्या आयुष्याचं पत्न सदा रखडत राहावं हा दु:खांत नसतो तर आपण आपल्या प्रियकराच्या नावे सारं आयुष्य लिहून टाकलेलं असावं आणि नंतर त्याचा पत्ता आपल्याकडून कुठे तरी हरवून जावा हा दु:खांत असतो.’ - पुढे चालण्यासाठी कुठलेच रस्ते आमंत्नण देत नाहीत अशा कडेलोटाच्या ठिकाणी येऊन पोहोचल्यानंतर अमृता प्रीतमने लिहिलेल्या या ओळी आहेत.आजपासून बरोबर 101 वर्षापूर्वीची  कहाणी . आजच्या पाकिस्तानस्थित पंजाबमधील एका गावात 31 ऑगस्ट 1919 रोजी एक मुलगी जन्माला आली. त्यावेळेला तिच्या घराच्या भिंतींवरून मृत्यूच्या सावल्या रेंगाळत होत्या. ती जेमतेम तीन वर्षाची झाली तेव्हा नुकताच तिचा रांगायला लागलेला लहान भाऊ मरण पावला. ती जेमतेम अकरा वर्षाची होते न होते तोच तिची आई हा इहलोक सोडून गेली. तिच्या हातात लेखणी देणारे तिचे पिताजीपण कालवश झाले. तेव्हाच्या प्रथेप्रमाणो सोळाव्या वर्षीच या मुलीचं लग्न झालं आणि ती दोन मुलांची आई झाली. इथर्पयतची कहाणी सरधोपट मार्गाने जाते. पण नंतर एक अफसाना घडला. 

ही दर्दभरी दांस्ता आहे अमृता प्रीतम या विख्यात पंजाबी आणि हिंदीतून लिहिणा:या कवयित्नीची. साहित्य अकादमी, ज्ञानपीठ, पद्मश्री, पद्मविभूषण, आठ विद्यापीठांने सन्मानाने देऊ केलेली डी.लिटची पदवी आणि असंख्य आंतरराष्ट्रीय पुरस्कार असे मानाचे शिरपेच लाभलेली लेखिका. पंधरा वर्षापूर्वीच ती स्वर्गलोकी निघून गेली, मात्न तिच्या शेकडो कविता, कथा, कादंब:या, दोन आत्मचरित्नं असा मोठा लखाखता खजिना तमाम वाचकांसाठी मागे ठेवून गेली.अफसाना असा झाला की एका चिमुकल्या गावात झालेल्या मुशायराच्या कार्यक्र मात आपल्या कविता सादर करायला अमृता गेली होती. कार्यक्र म संपला आणि सारे जण बसस्थानकाकडे निघाले. पाऊस पडून गेल्यानंतरचा एक लख्ख जांभळा प्रकाश सर्वत्न पसरलेला होता. पावसाची रिमङिाम नुकतीच थांबली होती. संध्याकाळच्या सोनसळी उन्हातं बस पकडण्यासाठी झपाझप पावलं उचलत दहा-पंधरा जणांचा घोळका चाललेला होता. त्यामध्ये एक उंचच्या उंच शायर होता. साहिर लुधियानवी. त्याच्या पहिल्या भेटीतच जन्मजन्मांतरीचं नातं असल्याप्रमाणो त्याच्या अखंड प्रेमात बुडालेली अमृता. तो  झपाझप चालत निघालेला. त्याच्या लांबवर पडलेल्या सावलीतून त्याच्यासह चालत जाणारी व त्याच्यावर दिलोजानसे फिदा झालेली अमृता. अमृताच्या अखेरच्या श्वासार्पयत तिच्या कवितांना लाभलेली सोनेरी महिरत त्यांच्या पहिल्या भेटीतलीच होती. ती सोनेरी झळाळी कधीही लुप्त झाली नाही.भंगलेल्या संसारातील मुलांना ज्या प्रचंड दु:खं आणि वैफल्याला सामोरं जावं लागतं त्यामधून अमृताचीही मुलं गेली. त्या अपराध भावनेचा दंश आयुष्यभर अमृताच्या मनात राहिला जो तिच्या कथा-कादंब:यांतून प्रतिबिंबित झालेला आहे.मात्न  साहिर तिच्यासाठी एक मनभावन, रंगीत, अधुरं स्वप्नचं राहिला. ते अनेकदा भेटले. त्यांनी एकमेकांवर जान कुर्बान केली. एकमेकांसाठी कविता लिहिल्या. ता:यांची अक्षरं आणि किरणांच्या भाषेतून एकमेकांना प्रेमपत्नं पाठवली; पण ही प्रेमकहाणी असफल राहिली. प्रेमभंगाची जखम देऊन साहिर मुंबईला निघून गेला. कोणी म्हणतं तो सुधा मल्होत्नाच्या प्रेमात पडला होता, तर कोणी म्हणतात आईच्याबद्दल असणा:या इडीपस कॉम्प्लेक्सने त्याला कुठल्याही स्रीमध्ये रमू दिलं नाही.त्याच्या भोवती पडलेल्या चाहत्यांच्या गराडय़ात एकदा सामील होऊन तिनं साहिरच्या पुढे आपला तळहात धरला आणि म्हटलं स्वाक्षरी. आपल्या अंगठय़ाचा ठसा साहिरने उमटवला आणि तिनं सवाल केला‘ मेरी उम्र की कागज परतेरी इश्कने अंगुठा लगायाहिसाब कौन चुकाएगा! ’या घटनेनंतर जेव्हा भारत-पाकिस्तान फाळणी झाली होती. लोक होरपळत होते. ज्याचं प्रतिबिंब अमृताच्या कवितेमध्ये पडलेलं आहे. तिनं साहिरवर प्रेम केलं. त्यांच्या नात्यावर  लिहिलेल्या ‘सूनेहडे’ला साहित्य अकादमीचं बक्षीस मिळालं; पण तो तिच्या आयुष्यातून निघून गेला होता. तेव्हा तिनं लिहिलं होतं,‘ मेरे इश्क के जख्मतेरी याद ने सिये थेआज मैने टाके खोलकरवह धागा तुङो लौटा दिया.’अमृता दिल्लीमध्ये ऑल इंडिया रेडिओवर काम करत असताना तिच्या एका पुस्तकाचं कव्हर डिझाइन करण्यासाठी तिला मुंबईहून आलेला एक चित्नकार भेटला इमरोझ. इमरोझबरोबर अमृता अखेरच्या क्षणार्पयत राहिली. इमरोझनेही अमृताला अखेरच्या क्षणार्पयत साथ दिली. परस्परांवर असलेल्या प्रगाढ विश्वासामुळे त्यांना विवाहाच्या औपचारिकतेची मोहर त्यांच्या नात्यावर लावावीशी वाटली नाही. साहिरशी अमृताचं नातं जुदाई आणि जख्मेतन्हाईचं होतं, तर इमरोझशी मिलाफ आणि शहनाईचं! अमृता दोन मुलांची आई होती आणि इमरोझपेक्षा सात वर्षानी मोठी होती. इमरोझ अविवाहित होता आणि झपाटय़ाने नावलौकिकास येणारा प्रख्यात चित्नकार. या दोघांचं पार्थिवतेतून अपार्थिवाकडे जाणारं, लौकिकतेच्या सीमा झुगारून अलौकिक झालेलं समृद्धं, प्रगल्भ, सहजीवन सुरू झालं. सत्तर-पंच्याहत्तर वर्षापूर्वी विवाह न करता या दोघांचं एकत्न राहणं आणि मोकळेपणाने सर्वत्न वावरणं म्हणजे प्रखर सामाजिक रोषाला आमंत्नणच होतं. लेकिन दीवानगी का आलम ही कुछ ऐसा था हुजूर की पूछो मत.आपल्या प्रेमावर इमरोझचा इतका विश्वास होता की त्याला कधीही साहिर, सज्जाद किंवा अमृताच्या घटस्फोटित पतीबद्दल मत्सर, राग वाटलाच नाही. अखेरच्या घटका मोजत असणा:या अमृताच्या घटस्फोटित पतीला त्याने आपल्या घरात आणून ठेवलं होतं. अमृताने आणि इमरोझने त्याची सेवा केली आणि अखेरचा श्वास त्याने अमृताच्या घरात घेतला. साहिरलाही अमृतासह तो अनेकदा भेटलेला होता. अमृताची मुलं त्याने स्वत:ची म्हणून स्वीकारली. आयुष्याची चाळीस-पन्नास वर्षे त्यांनी ज्या आशियानामध्ये काढली, ती दिल्लीमधील कुतुबमिनारकडे जाणा:या रस्त्यावरील हौज खास या शांत इलाख्यातील एक तीन मजली इमारत आहे.  भोवताली हिरवागार बगीचा आणि दाट झाडं आहेत. घराच्या आतमध्येसुद्धा झाडं आणि वेली आहेत. भिंतींवर, दिव्यांच्या शेडवर, जमिनीवर, जिन्यावर सर्वत्न इमरोझने काढलेली चित्ने आहेत. त्या प्रत्येक चित्नात अमृताच्या पडछाया पसरलेल्या आहेत. कॉरिडॉरमधून खूप-खूप कुंडय़ा आणि उमललेली फुलं. नारंगी लाकडी दाराच्या उजव्या बाजूस घंटी आणि त्याच्या खाली दोन इवलाली नावं अमृता- इमरोझ. हा समास काळाला कधीही तोडता येणार नाही आणि येणा:या कैक पिढय़ांसाठी ही जोडी मिथक बनून राहिलं. या मनस्वी चित्नकाराने अमृताबद्दल म्हटलंयं‘जेव्हा तू निघून जातेसजीवन गजल होऊन जातं.आणि जेव्हा तू येतेसगजल जीवन होऊन जातं..’

( लेखिका प्राध्यापक आहेत.)