शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

...रे भैय्या छुटे लगान!

By admin | Updated: June 17, 2016 07:47 IST

लगान सिनेमा रिलीज होऊन काल १५ वर्षे पूर्ण झाली.. एखादा सिनेमा येतो नी जातो, त्यात काय विशेष? पण काल ट्विटरवर अनेकांनी आमीरला शुभेच्छा देत लगानच्या आठवणी जागवल्या! सेलिब्रेट केलं ‘गोऱ्यां’विरुद्ध एक क्रिकेट मॅच जिंकणं.

लगान सिनेमा रिलीज होऊन काल १५ वर्षे पूर्ण झाली.. एखादा सिनेमा येतो नी जातो, त्यात काय विशेष? पण काल ट्विटरवर अनेकांनी आमीरला शुभेच्छा देत लगानच्या आठवणी जागवल्या!सेलिब्रेट केलं ‘गोऱ्यां’विरुद्ध एक क्रिकेट मॅच जिंकणं.आज तिशीत असलेल्या कुणालाही आपल्या कॉलेजच्या काळात थिएटरात फुल चिअर करत लगान पाहिल्याच्या आठवणींविषयी विचारा..जोरदार कॉमेण्ट्रीच सुरू होते.आणि आपणच जिंकल्याचा आनंद साजरा होतो..रे भैय्या छुटे लगान म्हणत तीनगुना लगान मधून सुटका झाल्याचा आनंदच साजरा होतो..का?कारण त्याकाळचा तरुण तो/ती स्वत:ला त्या भूवनमध्ये शोधत राहतो. खमका, रिस्क घ्यायला तयार असलेला, सगळ्यांना सोबत घेऊन अशक्य ते शक्य करुन दाखवायला निघालेला आणि प्रस्थापित सत्तेच्या नजरेत नजर घालून पाहणारा..भूवन म्हणतो ना, ‘गोरे पतलून पहनके इ खेल को क्रिकेट कहते है, और हम लंगोटी बांधके गिल्ली दंडा!’त्यावेळी अनेकजण स्वत:ला सांगत असत मनातल्या मनात की, कपडेलत्ते, इंग्रजी अ‍ॅक्सेण्ट महत्वाचं नाही, तुला तुझं काम नीट करता येतंय ना ते महत्वाचं!’म्हणून तर ‘हिंमत ना हारेंगे, सबको बतादेंगे, हम लोगोंका दर्जा है क्या..’ असं म्हणणारा कचराही आपल्याच मनातल्या भावना बोलत राहतो.हे असे किती प्रसंग, किती कहाण्या भेटतात..ज्या सिनेमापुरत्या नाही तर त्याकाळी तरुण होत असलेल्या आणि खेडीपाडी, छोटी शहरं सोडून मोठ्या शहरांची वाट धरलेल्या अनेकांच्या होत्या. प्रस्थापित दुनियेत स्वत:चा लगान चुकता करायला निघालेल्या अनेकांना वाटलं होतं की, हिंमत केली तर भूवनसारखी ही मॅच आपणही जिंकूच..त्या जिंकण्याची प्रेरणा म्हणजे तो भूवन आणि त्याची टिम होती..जी जिंकली..आणि ती सिनेमात काय जिंकणार आहेच..पण तिनं जिंकायचं स्वप्न ज्यांना दाखवलं त्यांच्या स्वप्नांना काल सोळावं लागलं, आणि तरुण व्हायला निघालीत ती स्वप्न पुन्हा नव्यानं..चिन्मय लेले