शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
6
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
7
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
8
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
9
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
10
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
11
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
12
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
15
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
16
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
17
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
18
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
19
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
20
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा

राधाची एस्टी

By admin | Updated: July 22, 2016 15:03 IST

राधा जगताप. सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातलं उपळवाटे हे तिचं गाव!

राधा जगताप.

सोलापूर जिल्ह्याच्या
माढा तालुक्यातलं उपळवाटे
हे तिचं गाव!
मुख्य रस्त्यापासून दूर असलेलं.
फाटय़ावरून निघून 
मुलं-माणसं 
दोन किलोमीटर चालत गावात जा-ये करतात.
राधा बारावीत शिकते.
रोज पायपीट करकरून ती वैतागली.
शेवटी तिने चंग बांधला,
आता गावात एसटी आलीच पाहिजे.
आणि तिने आणली गावात एस्टी!!
 
उपळवाटे हे माढा तालुक्यातले, टोकावरचे जेमतेम अडीच हजार लोकवस्ती आणि 60 उंब:यांचं गाव़ टेंभुर्णी आणि केम या गावांना जोडणा:या रस्त्यावर उपळवाटे फाटय़ापासून दोन किलोमीटर आत वसलेलं गाव. इतर कुठल्याही खुर्द-बुद्रूक  गावासारखंच एक. उपळवाटे फाटय़ावर ना स्टॅण्ड, ना पत्र्याचे शेड, नाही काही आसरा़ उन्हात तापण्या आणि पावसात भिजण्याशिवाय पर्याय नाही़ गावातील सुमारे सव्वाशे मुलं रोज शिक्षणासाठी अप-डाउन करतात़ यामध्ये मुलींची संख्या मोठी़ मात्र शाळा-कॉलेजात जायच तर जाताना दोन आणि येताना दोन अशी चार किलोमीटर पायपीट ठरलेली़
उपळवाटेत केवळ आठवीर्पयतच शाळा. पुढील शिक्षणासाठी दुस:या गावाला जावं लागतं. पण गावात बसची सोय नाही़ मग रोजचीच पायपीट़ असं किती दिवस हे सहन करायचं? गावात बस आलीच पाहिजे असा आक्रमक पवित्र एका तरुण मुलीने घेतला आणि तिच्या त्या आक्रमकतेपुढे एसटी महामंडळाला नमतं घ्यावं लागलं. 
 
उपळवाटेत ग्रामस्थांना हरेक गोष्टीसाठी बाहेरगावी म्हणजे केम, टेंभुर्णी, माढा या गावांना जावं लागतं. शिक्षण घेऊ इच्छिणा:यांना तर अनेक संकटांचा सामना करावा लागतो़ त्यात मुलींनी शिक्षण घेणं तर महाकठीणच़ आठवी झाल्यानंतर अनेकांना शिक्षणाची दारं बंद होतात़ पुढील शिक्षण घ्यायचं तर बाहेरचा रस्ता धरावा लागतो़ सध्या गावातील सुमारे  सव्वाशे विद्यार्थी रोज केम, टेंभुर्णी, इंदापूर, अकलूज, कुडरूवाडी या ठिकाणी ये-जा करतात़ 
गावात एसटी सुरू करावी, अशी मागणी विद्याथ्र्यानी व ग्रामस्थांनी अनेकवेळा केली. मात्र तात्पुरती बस सुरू होऊन बंद होणंही नेहमीचंच होतं. विद्याथ्र्याचे हाल सुरूच होत़े गावपुढा:यांनी सोलापूर येथील आगार व्यवस्थापकार्पयत धडक मारली, मात्र पदरी निराशाच़
***
राधा मोहनराव जगताप़
 इयत्ता- बारावी आर्ट्स, 
उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेज, केम (करमाळा)
माळकरी असलेल्या मोहनराव जगताप यांना चार मुली आणि एक मुलगा़ मोठय़ा तीन मुलींची लग्नं झाली. राधा अभ्यासात आणि वागण्या-बोलण्यातही चुणचुणीत. राधा पाचवीपासून अप-डाउन करत़े तिचा धाकटा भाऊ प्रसाद त्याच शाळेत इयत्ता आठवीत शिकतो. मात्र दोघांच्या वेळा वेगवेगळ्या आहेत़  राधाचं कॉलेज सकाळी 8 ते 11, तर प्रसादची शाळा 10.30 ते 5 असत़े 8 वाजता कॉलेज असलं तरी राधाला सकाळी साडेसहा-पावणोसातला घरातून निघावं लागतं. एवढय़ा सकाळी काही खायचं होत नाही़ चहा घेऊन काहीतरी डब्यात घेऊन ही ‘सावित्रीची लेक’ निघते, दोन किमी पायपीट करत़  हे गेल्या आठ वर्षापासून सुरू आह़े कारण, राधा पाचवीपासून केमला जातेय शाळेला़ 
***
 8 जुलै 2016.
नेहमीप्रमाणो राधासह इतर मुलं-मुली केम-टेंभुर्णी एसटीमध्ये बसले.उपळवाटे फाटा आल्यानंतर सर्व विद्यार्थी उतरू लागले, मात्र राधाने बसमधून उतरण्यास नकार दिला़ वाहक व चालकास एसटी उपळवाटे इथे न्यायला सांगितली. अन्यथा आपण बसमधून उतरणार नसल्याचं बजावलं. बस तशीच पुढील गाव दहिवलीकडे मार्गस्थ झाली़ तोर्पयत राधाने गावातील  मंडळींना  फोन करून हा प्रकार सांगितला़ मुलींसह बस पुढे गेल्याची वार्ता सर्वत्र पसरली़ दहिवली येथे कुडरूवाडी आगारप्रमुखास संपर्क साधून घडलेला प्रकार सांगण्यात आला़ तरीही चालक आज नको, उद्यापासून एसटी उपळवाटेत घेऊन येतो, असं सांगत होते. मात्र राधानं तिचा आग्रह सोडला नाही. अखेर परत सहा किलोमीटर अंतर कापून एसटी उपळवाटे येथे नेण्यात आली़ राधानं एक लढाई जिंकली होती़
**
‘तू काय म्हातारी आहेस का? जा की चालत’, असं मला कंडक्टर म्हणाले. पण मी त्यांना म्हटलं, प्रश्न माझा नाही, मी जाईन चालत, मी लहानच आह़े पण एस्टीत बसलेल्या या आजीबाईचं काय या प्रश्नाचं मात्र त्यांच्याकडं उत्तर नव्हतं, असं राधा सांगते.
‘उपळवाटे फाटय़ापासून गावात ये-जा करण्यासाठी खासगी वाहनही नाही़ केवळ  दुस:यांच्या टूव्हीलरवरून ‘लिफ्ट’ घेण्याचाच आधाऱ मात्र कितीही उशीर झाला तरी चालतच यायचं, दुस:या कुणाच्या गाडीवर यायचं नाही, अशी आपली सक्त ताकीद राधाला आहे,’ असं तिचे वडील मोहनराव सांगतात़  राधाही पाचवीपासून बारावीर्पयत म्हणजे गेली 8 वर्षे वडिलांचा सल्ला ऐकून पायीच यायची.
राधाच्या धाडसानंतर आता गावात रोज एस्टी येत असली तरी प्रशासनाची अनास्था कायम असल्याची खंत राधा व्यक्त करत़े बघू किती दिवस तुझी जिद्द खरी होते, अशी खिल्ली उडविणा:या कंडक्टर-ड्रायव्हर मंडळींचं आव्हान राधाने स्वीकारलं आह़े मी पण खंबीर आहे, बघाच तुम्ही - असं प्रतिआव्हान आपण दिल्याचं राधा सांगत़े मी घाबरत नाही कुणाला़ अगदी आई-बाबांनाही नाही घाबरत़ उलट आईच आपल्याला टरकून असते, असंही राधा सांगत़े
 बस दहिवलीच्या बदल्यात थेट टेंभुर्णीला आली असती तर काय केलं असतं? - या प्रश्नावर ‘मी डेपो मॅनेजरशी भांडून त्याच बसमधून गावाला गेले असते’, हे  उत्तर तिच्याकडे तयार आह़े
राधाच्या धाडसाची चर्चा आज पंचक्रोशीत आह़े एसटीत बसलेल्या अनेक महिलांच्या तोंडून तिनं ‘त्या राधाच्या’ धाडसाच्या कथा ऐकल्या आहेत़ ते ऐकताना आनंद झाल्याचं ती सांगत़े या कौतुकापेक्षाही गावातील वडीलधारी मंडळी, आजारी माणसांची आणि आपल्यापेक्षाही लहान असलेल्या विद्याथ्र्याची सोय झाली याचं समाधान असल्याचं राधा म्हणत़े 
मुलांपेक्षाही मुलींच्या अडचणी वेगळ्या आहेत़ याचीही राधाला जाण आह़े म्हणूनच ज्या गावात एसटी येत नाही त्या गावातील मुलींनी कणखर व्हायला हवं  आणि एसटी सुरु करण्याची मागणी करायला हवी - असंही ती सांगते.
राधाला विचारलं, तुला पुढं कोण व्हायचं आहे, तर ती म्हणते, ‘पुढं काय व्हायचं ते ठरवलं नाही खूप शिकायचं आहे, हे नक्की!’
 
- चन्नवीर मठ
(लेखक लोकमतच्या सोलापूर आवृत्ती उपमुख्य उपसंपादक आहेत.)