शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

PUBG - मनानं नव्हे, डोक्यानं खेळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 06:00 IST

गेम डिझायनर्सनी आपलं ‘टार्गेट’ अचूक हेरून मोबाइलवरचा गेम आखला, पण आपण त्यात किती फसणार, सांगतोय एक गेम डिझायनर!

ठळक मुद्देउठता- बसता, खाता- पिता, अगदी कमोडवर बसूनसुद्धा तुम्ही तेच ते करत राहता?

-  प्राची पाठक 

  ‘पबजी’ या मोबाइल खेळानं भारतभरच्या यूजर्सना वेडं केलं आहे, हे तर खरंच; मात्र गेमिंग तज्ज्ञ आणि सर्वसामान्य गेम प्लेअर्स या खेळाचं कौतुक करतात, त्याचं यूजरफ्रेण्डली असणं ही त्याची हातोटी असं सांगतात. कोणत्याही पीसी अथवा मोबाइल व्हिडीओ गेमसाठी त्या त्या गेमचे नियम अतिशय सोपे असायला लागतात. कोणत्याही वयोगटातल्या कोणत्याही खेळाडूला ते नियम चटकन समजायला हवे, ही गेमिंगची पहिली पायरी. इतकं सोपं आणि त्यासह गेमर्सचा इंटरेस्ट दीर्घकाळ टिकवून ठेवणारे, त्यात खेळाडूंना गुंतवून ठेवणारे असे गेम्स बाजारात जास्त टिकतात, असं ढोबळमानाने म्हणता येतं. पबजी हा गेम नेमके हेच साध्य करतो. तो समजायला अतिशय सोपा आहे. काठिण्य पातळी वाढत गेली की जास्त वेळ खेळाडू त्यात गुंतून पडतील, अशी पुरेपूर रचना त्यात केलेली आहे, हे तर सहज लक्षात येतं.मात्र गेमिंगमध्येच करिअर करणारा आर्य भारतीय पबजी विषयी सांगतो, की  ‘हा खेळ मनानं नाही, तर डोक्यानं खेळायचा खेळ आहे. त्यात गुंतायचं नाही, हेच खरं मोठं आव्हान आहे. आपल्या दर दिवसाच्या खेळाचं लिमिट ठरवून घ्यायचं. तितकाच वेळ गेम खेळायचा. आधी हा गेम पीसीवरून सबस्क्रि प्शन घेऊन खेळायचा गेम होता. त्यांनी मोबाइल व्हर्जन आणलं ते भारतातलं मार्केट बघून आणि त्यातही फ्री डाउनलोड! मग काय, विचारूच नका. ‘बॅटल रोयाल’ ही गेम्समधील विशिष्ट शाखा आहे. त्यातील हा महत्त्वाचा व्हिडीओ गेम आहे. 2017 सालापासून यांचा बोलबाला गेमिंग मार्केटमध्ये सुरू आहे. गेम डिझायनर्स लोकांना टार्गेट्स दिलेली असतात. कोणत्या वयोगटातील लोकांना तो गेम जास्त भावेल, याच्यानुसार त्या-त्या गेम्सवर बारीकसारीक काम केलं जातं. मग तुमच्या प्लेअर्सला कपडे कोणते घालायचे, त्यांचा प्रकार, त्याचा रंग इथपासून ते बॅटल ग्राउण्डवर कोणती हत्यारे निवडायची, कोणती गन वापरायची असे सर्व ऑप्शन्स त्यात खुबीने टाकलेले असतात. जेणेकरून, यूजर्स त्यात अधिकाधिक काळ गुंतून पडतील. म्हणूनच यूजर्सने गेम मनाने खेळायचा नाही, तर डोक्याने खेळायला हवा. आपल्या मित्न मैत्रिणींना, आई वडिलांना सांगून ठेवायचे,   ‘अर्धा तास झाला की मला थांबवा.’ त्यांचं काटेकोरपणे ऐकायचं. तरच अभ्यास, करिअर सांभाळून, रोजच रूटीन सांभाळून तुम्ही गेम्स खर्‍या अर्थाने एन्जॉय करू शकतात. ’एखादा माणूस मैदानावर एकटाच क्रिकेट खेळत बसणार नाही. बसला, तरी चोवीस तास आणि दिवस दिवस असं करणार नाही. तो खाण्यासाठी, झोपण्यासाठी ब्रेक घेईल. इतर लोक त्याला टोकत राहतील. कोणी घरात कॅरम खेळायला आवडतो, म्हणून सतत आणि  दिवस दिवस कॅरम खेळत बसणार नाही. पीसीवरून खेळतानासुद्धा आपल्याला एका जागी जाऊन बसावं लागेल. जरा भान राहील आजूबाजूचं. ते सुटलं म्हणून आपल्या आयुष्याचाच एक गेम करून टाकायचा नाही. म्हणून आर्यसारखे गेम डिझायनरच आता सांगतात की, हे पबजीसारखे गेम्स डोक्यानं खेळा, मनाने नाही!(पर्यावरण आणि मानसशास्त्रतज्ज्ञ)

***

 चोवीस तास?-तेच! हे थांबवा!मोबाइल व्हिडीओ गेम्समुळे तुम्ही असाल तिथं तुमच्या हातातला खेळ सुरू करून ठेवता येतो. उठता- बसता, खाता- पिता, अगदी कमोडवर बसूनसुद्धा तुम्ही तेच ते करत राहता, हा त्यातला सर्वात काळजीचा भाग असतो. म्हणूनच डायव्हर्जन फार महत्त्वाचं आहे. आपली लिंक तोडायची. त्यात प्रमाणाबाहेर गुंतून पडायचं नाही. आजूबाजूच्या लोकांना आपल्याला डायव्हर्ट करा असं सांगून ठेवायचं. जेवणखाण, झोप, करिअरचं रु टीन नीट फॉलो करायचं. ते करताना गेमचा आनंद घ्यायला हरकत नसते.-आर्य गेम डिझायनर