पोलो नेक
हा शब्द गेल्या काही दशकांत बादच झाला. कुणी फारसे पोलो नेक टीशर्ट्स, स्वेटर्स वापरताना दिसत नव्हतं.
फॅशनप्रेमींना तर पोलो नेक म्हणजे एकदम गुजरे जमाने की बात असंच वाटायचं.
कॉलेजातही पोलो नेकच्या वाटेला कुणी जात नसे.
पण म्हणतात ना, गेलेली फॅशन एक चक्र पूर्ण करून परत येतेच.
तसेच आता हे पोलो नेक परत येत आहेत.
किमान शंभर वर्षाची फॅशन परंपरा असलेले हे पोलो नेक अर्थात मानेलाच चिकटलेल्या वतरुळाकार कॉलर्स.
अत्यंत देखणो, रुबाबदार दिसतात ते.
विशेष म्हणजे ते खास ‘पुरुषी’ असले तरी पुरुषांइतक्याच महिलाही ही फॅशन आनंदाने कॅरी करू शकतात.
आता पुन्हा जगभरात पोलो नेकचे चर्चे आहेत. येत्या विण्टर फॅशनमधे पोलो नेक पुन्हा फॉर्मात येईल असा कयास आहे.
त्यातही कॉलेज गोईंग मुलंमुली आता नव्यानं पोलो नेक ट्राय करून पाहत आहेत.
त्यामुळेच तुमच्या कपाटात जर जुना पुराना पोलो नेक टीशर्ट, स्वेटर असेल तर ते शोधा.
तातडीनं!