शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
6
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
7
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
8
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
9
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
10
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
11
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
12
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
15
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
16
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
17
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
18
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
19
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
20
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा

पोकेमॉन

By admin | Updated: July 21, 2016 15:50 IST

मोबाइल गेमसारखा एक गेम. पण मग त्याची जगभर एवढी क्रेझ का आहे? तरुण जन्ता या खेळाच्या मागे इतकी का दिवानी झाली आहे.

मोबाइल गेमसारखा एक गेम.
पण मग त्याची जगभर एवढी क्रेझ का आहे?
तरुण जन्ता या खेळाच्या मागे इतकी
का दिवानी झाली आहे.
आणि अनेक देशात ‘नो पोकेमॉन प्लीज’ चे
बॅनरही का लागायला लागलेत?
 
गेल्या आठवडय़ापासून एकही दिवस असा गेला नाही की, ‘पोकेमॉन गो’बाबत काही बातमी वाचनात आली नाही. एक मोबाइल गेम संपूर्ण जगाला वेड लावतोय, लोक जिवाची पर्वा न करता हा खेळ खेळण्यात गुंग झाले आहेत. स्क्रीनमध्ये डोळे घुसवून धावणा:या गाडय़ा आणि रेल्वेची तमा न बाळगता आबालवृद्ध मंडळी‘पोकेमॉन’च्या शोधात दिवसरात्र शहरभर फिरताहेत.
 
अनेक ठिकाणी तर पाटय़ा लावल्या आहेत की इथं पोकेमॉनला शोधू नये. ड्राइव्ह करताना, स्मशानात, दवाखान्यात ‘पोकेमॉन इथं खेळू नका’ अशा पाटय़ा कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया अशा देशांत लागल्या आहेत. सुदैवानं आपल्याकडे अजून हा पोकेमॉन आलेला नाही. पण आलाच तर माणसं कामधाम शोधून पोकेमॉन खेळत राहतील.
 
नव्वदच्या दशकात बालपण गेलेली पिढी, जी आज प्रौढ आहे, ‘पोकेमेनिया’ अनुभवून मोठी झालेली आहे. ‘पोकेमॉन गो’ने बालपणातील त्या रम्य आठवणी पुन्हा एकदा जागवल्या आहेत. हाच ‘नॉस्टेल्जिक फॅक्टर’ कदाचित तरुणांना या गेमकडे अधिक आकर्षित करत आहे. लहानपणापासून असलेली ‘अल्टीमेट पोकेमॉन फॅण्टसी’ सत्यात उतरणार म्हटल्यावर साहजिकच लोकांचा उत्साह शिगेला पोहचला आहे. आणि पब्लिक या पोकेमॉनच्या मागे पागल झालेली आहे. 
 
‘पोकेमॉन गो’मध्ये आभासी आणि वास्तव जगाचा सुरेख संगम अनुभवयाला मिळतो. दैनंदिन गोष्टींमध्ये गेमिंगचे थ्रिल अनुभवण्याची संधी ऑगेमेंटेड रिअॅलिटीमुळे शक्य झाले आहे. कॅलिफोर्नियातील मीडिया सायकोलॉजी रिसर्च सेंटरच्या संचालक पॅमेला रटलेज सांगतात की, ‘ख:याखु:या मानवी इच्छा-आकांक्षांना हा गेम साद घालतो, आकर्षित करतो. आणि म्हणून ते आव्हानही आपलंसं वाटतं, खरं वाटतं. आणि पोकेमॉन जगण्यात असलेल्या एका मोठय़ा पोकळीची जागा व्यापतो.’
 
स्पर्धा आणि प्रभुत्व हे मानवी प्रवृत्तीचे महत्त्वपूर्ण अंग आहेत. ‘पोकेमॉन गो’मध्ये या दोन्ही गोष्टींचा कस लागतो. भोवतालच्या परिसरातील पोके मॉन पकडून त्यांना सेवक बनवून लढाई करणं हा या गेमचा उद्देश. ‘एआर’ फीचरमुळे आपण जणूकाही ख:या आयुष्यातच हे साहस करत आहोत ही भावनाच या गेमबद्दलचे आकर्षण वाढवते.
 
अमेरिकेतील मानस शास्त्रज्ञ आणि कॉम्प्युटर वैज्ञानिकांच्या एका चमूने 2013 साली केलेल्या संशोधनानुसार, ऑगमेंटेड रिअॅलिटी आपल्याला वास्तव आयुष्यापासून वेगळे न करता स्वप्नवत अनुभव किंवा फॅ ण्टसी जगाची सफर घडवून आणते. बहुधा हे तथ्य ‘पोकेमॉन गो’च्या पथ्यावर पडले. मोबाइल गेम म्हणजे एकटेपण, एकटय़ानं खेळणं. पण हा गेम आता माणसांना जवळ आणत आहे, यावर कुणी विश्वास ठेवेल का?
 
मात्र या गेमच्या निमित्ताने अनोळखी लोक एकत्र येत आहेत. त्यांच्यामध्ये संवाद प्रस्थापित होत आहे. अध्ययनातून असे दिसून आले आहे की, अनोळखी लोकांसोबत केलेले अगदी फुटकळ संभाषणदेखील आपल्या मानसिक आरोग्याला चालना देणारे असते. ज्या लोकांशी मी कधी बोलले नसते अशा लोकांशी माझी भेट होतेय, त्यांच्याशी चर्चा होतेय, असे अनेक गेम प्लेयर्स सांगताहेत. 
सोशल मीडियापेक्षा एकदम निराळे चित्र ‘पोकेमॉन गो’च्या निमित्ताने पाहायला मिळत आहे.
 
आणि म्हणूनच हा गेम सोशल मीडियाला एक आव्हान म्हणून उभा राहील अशी जगभरात चर्चा आहे.
मुख्य म्हणजे यांत्रिक तोच तो पणा जाऊन नवीन काहीतरी व्हच्यरुअल पण वास्तव असं अनेकांच्या आयुष्यात जागा करील अशी एक नवीन लाट आहे. भारतात मात्र अजून हा पोकेमॉन आलेला नाही. आल्यावर तो काय धुमाकूळ घालेल याची कल्पनाच केलेली बरी!
 
 
हा गेम खेळतात कसा?
 
‘पोकेमॉन’ हे कार्टून सिरीज जपानी. पण जगभर तिची क्रेझ होती. 
त्या फॅण्टसीवर एक तरुण पिढी पोसली गेली. आता नव्या काळात नवं रूप घेऊन हा पोकेमॉन आला आहे.
 
आपल्या मोबाइलवर हा गेम डाउनलोड केला की तो खेळताना आपलं इंटरनेट आणि जीपीएस आणि कॅमेरा चालू ठेवावा लागतो. मग आपण जिथं जाऊ म्हणजे कुठंही बाजारात, रस्त्यात, दवाखान्यात, समुद्रात, ऑफिसात हे पोकेमॉन तिथं दिसतात. आणि ते आपल्याला पकडायचे असतात. आजवर मोबाइल गेमचा एक यांत्रिक फील होता. आता मात्र आपला भवताल, रस्ते, आपलाच परिसर, आपले रोजचे कामाचे ठिकाण इथं कुठंही हे पोकेमॉन दिसू शकतात. पकडता येतात. अभासी खेळातला हा वास्तव सहभाग हेच या गेमचे खरे आकर्षण आहे.
 
 जेवढे जास्त पोकेमॉन्स पकडले तेवढी तुमची लेव्हल आणि पॉवर जास्त. असे सोपे गणित.  स्मार्टफोनमधील जीपीएस आणि कॅमे:याचा वापर करून ‘पोकेमॉन गो’मध्ये असा आभास निर्माण करण्यात येतो की जणू काही आपल्या अवतीभोवती पोकेमॉन्स आहेत. तुमचे लोकेशन आणि वेळेनुसार तुमच्या आजूबाजूच्या परिसरात पोकेमॉन्स डोकावतात. तुमच्या परिसराची जशीच्या तशी प्रतिकृती या गेममध्ये दिसते. 
 
ख:या जगात तुम्ही जसे फिरणार त्याचप्रमाणो गेममधील तुमचा अवतार (ट्रेनर) फिरणार. तुम्ही कोठे आहात त्यानुरूप पोकेमॉन्स तुमच्या समोर येणार. म्हणजे तुम्ही जर तलाव किंवा समुद्राजवळ असाल तर जलचर पोकेमॉन्स किंवा रात्रीच्या वेळी निशाचर पोकेमॉन्स तुम्हाल दिसतील. ख:या जगात तुम्ही फिरून जास्तीत पोकेमॉन्स शोधावेत असा या गेमचा मूळ उद्देश आहेत.
 
 
ऑगमेंटेड रिअॅलिटी म्हणजे काय?
‘पोकोमॉन गो’ हा काही व्हीआर गेम नाही. तो ऑगमेंटेड रिअॅलिटी गेम आहे. व्हिडीओ गेम आणि वास्तविक जगाची सांगड म्हणजे ‘ऑगमेंटेड रिअॅलिटी’. यामध्ये तुम्ही ख:या जगातच जणू कही व्हिडीओ गेम खेळत आहात असा आभास निर्माण करण्यात येतो. पोकेमॉन व्हिडीओ गेम आल्यापासून अनेकांना वाटत होते टीव्ही शोमधील अॅश केचमसारखे आपणही जर ख:या जगात पोकेमॉन शोधू शकलो तर? त्यांना कैद करून जिम लिडर्सला हरवून चॅम्पियन बनू शकलो तर? कंपनीने हेच ओळखून अखरे तंत्रज्ञानाचा अनोखा उपयोग करत पोकेमॉनला ‘ऑगमेंटेड रिअॅलिटी’द्वारे रिअल जगात आभासीपणो जिवंत केले.
 
पोकेमॉन खेळण्यात वैताग काय आहे?
 
हा गेम खेळण्याचा सर्वात मोठा तोटा म्हणजे बॅटरी संपणो. जीपीएस, कॅमेरेचा लगातारा वापर करावा लागत असल्यामुळे मोबाइलची बॅटरी झपाटय़ाने उतरते. गेमचा पुरेपूर आनंद घ्यायचा असेल तर पोर्टेबल चाजर्र आणि एक्स्ट्रा बॅटरीज् सोबतच ठेवाव्या लागतील.
परिसरातील ज्या जागा ‘पोकेस्टॉप्स’ आहेत तेथे लोकांची गर्दी वाढत आहे. ऑस्ट्रेलियामध्ये तर खासगी इमारती/परिसरात लोक शिरकाव करत आहेत. त्यामुळे पोलिसांना लोकांना असे न करण्याचे आव्हान करावे लागले.
 
अमेरिकेतील मिसुरी शहरात कथित चार चोरटय़ांनी यूजर्सना पोकेमॉन्स मिळवून देण्याच्या आमिषाने ‘पोकेस्टॉप्स’पाशी येण्यास आकर्षित करून त्यांची लूट केल्याचेदेखील वृत्त आहे.
 नाझी छळछावणीत मृत्यू झालेल्या पीडितांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बांधण्यात आलेल्या ‘यूएस होलोकॉस्ट मेमोरिअल म्युङिायम’ आणि ‘आर्लिग्टन नॅशनल सेमेटरी’ने लोकांना अशा पवित्र जागी पोकेमॉन न शोधण्याची विनंती केली आहे.
 
एका तरुण मुलीला तर पोकेमॉन शोधात फिरत असताना अडगळीच्या ठिकाणी मृतदेह आढळून आल्याची घटनादेखील घडली आहे. चित्रपटगृह, स्मशानभूमी, धोक्याची किंवा अवजड कामे करत असताना, खासगी प्रॉपर्टी,  हॉस्पिटल, वर्दळीच्या ठिकाणी आणि जिथे इतरांना त्रस होणार नाही व स्वत:ची सुरक्षा धोक्यात येणार नाही अशा ठिकाणी पोकेमॉन खेळू नये असे आव्हान जगभर केले जात आहे.
 
 
- मयूर देवकर
( लेखक लोकमतच्या मराठवाडा आवृत्तीत उपसंपादक/वार्ताहर आहेत.)