शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

..कृपया इंतजार करें !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2018 15:08 IST

पूर्वीच्या काही प्रेमकथांत नायक-नायिका दहा-दहा, वीस, पंचवीस वर्षे आपल्या प्रियकराची/प्रेयसीची वाट पाहायचे म्हणे. इथं आता वीस दिवस फोन/व्हॉट्सअ‍ॅपवर बोलणं झालं नाही, तर खतम सगळं !

- श्रेणिक नरदेआपल्या रोजच्या जगण्यात वाट बघण्यातच भरपूर वेळ जातो... पाण्याची बाटली भरताना बाटली नळाला लावल्यापासून भरेपर्यंतचा वेळ.. एखाद्या एटीएमच्या रांगेत नंबर येईपर्यंत घालवलेला वेळ.. असा बराचसा वेळ रोज बिनकामाचा, बिनअर्थाचा जात असतो. आता त्या काळात असं आपण काय महान काम तर करणारच नसतो. बाटली भरेपर्यंत किंवा रांगेत नंबर लागेपर्यंत या काळात काय भव्यदिव्य होत नाही; मात्र एक होतंय की आपण सगळे लोक त्यादरम्यान मोजत असतो आणि अजून एवढा वेळ जाणार, एवढा वेळ लागणार, पुढची लोक किती आहेत ते मोजत असतो.एका माणसाने एटीएमपुढं दोन मिनिटे घेतली तर पुढं असलेली लोक गुणिले दोन मिनिटे अशी गणितं मनातल्या मनात मांडू लागतो. नेमक्या किती वेळाने आपली सुटका होणार हे मोजत असतो. तर आपण तसाही वेळ घालवत असतोच, त्यावेळी आपल्याला काही वाटत नाही; पण तरीही एखाद्या गोष्टीची वाट बघत जो वेळ जात असतो, तो काही आनंददायी नसतो.आज इनस्टंट जमान्यात व्हॉट्सअ‍ॅपवर जरी मेसेज रीड करूनही समोरच्याचा रिप्लाय आला नाही तरी ती चिडचिड होते. ती चिडचिड आपण रोजची अनुभवतोय. आपल्याला रिप्लायची वाट पाहायची नसते. अशा काळाबरोबर जगण्याच्या ओघात आपणाला वाट बघायला सवड नाही. आणि ती आवडही नाही. झटपट निर्णय, येस आॅर नो दोन्ही पैकी एक पर्याय निवडा आणि पुढे व्हा..! हा आजचा भवताल झालाय. त्यात एखाद्या नकाराला होकारात बदलण्याची इच्छा असणं, त्यावर काम करणं, आशा असणं या गोष्टी आज कमी प्रमाणात होतात.नातेसंबंधातही या गोष्टी आज होताना दिसत नाही. कारण थांबण्याचा किंवा वाट बघण्याचा, एकमेकांना जाणून घेण्याला लागणाऱ्या वेळेचा कंटाळा येतो. पूर्वीच्या काही प्रेमकथांत नायक-नायिका दहादहा- वीस, पंचवीस वर्षे आपल्या प्रियकराची, प्रेयसीची वाट बघितल्याचं वाचून धक्का बसतो. आता एक वर्ष हा कालावधी जरी मोठा धरला तरी दहा-वीस, पंचवीस दिवस जर काही संवाद झाला नाही तर ते नातं संपल्यात जमा होतं. फोन, मेसेज, व्हॉट्सअ‍ॅप, मेसेंजर, व्हीडीओ कॉलिंग आदी माध्यमातून रोजचा संवाद चालू असतोच. संवाद म्हणण्यापेक्षा संवादाचा भडीमार चालू असतो.अतिसंवादाने आदर, नात्यातील प्रेम कमी होतं आणि या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून गैरसमज जोरात पसरतात. इथं ‘कायमचं’ असं काही नाही. रोज बदलणारे ट्रेण्ड आणि प्रवाहात राहण्यासाठी आपण केलेली धडपड यातून भवतालात गैरसमजुती वाढावयास लागलेल्या दिसून येतात. काही नाती आभासी सुरू होऊन आभासातच संपून जातात. त्यातून आलेल्या नैराश्यातून आज काय काय होतंय हे आपण बघतोच. विश्वासाने संवाद व्हायचा, तो आता शंकास्पद होतोय.विविध माध्यमातून फोटो, व्हीडीओ अगदी केलेले मेसेज आहेत, पण जर त्यातून संवाद संपत असेल किंवा नात्यात कटुता येत असली तर आपण काय काय मेसेज पाठवलेय, कॉलवर काय काय बोललोय ते कॉल रेकॉर्ड तर झाले नसतील? आपल्या मेसेजचा स्क्र ीनशॉट बॅकअप तर घेतला नसेल? आपण पाठविलेले फोटो, व्हीडीओ तिकडे स्टोअर असतील? पुढचा माणूस ते पसरवणार तर नाही ना? अशा लाख चिंता आजच्या संवादातून येतात. ही काळजी जर संवादात येत असली तर तो संवाद एखाद्या मर्यादेपलीकडे जात नाही.किंवा तो संवाद जरी प्रेमापोटीचा असला तरी नंतर निर्माण होणाºया काळजीने आजचे लोक चिंतित दिसतात. तिथं विश्वास, समर्पण, प्रेम, दिल खोलके बात याही गोष्टी किती प्रमाणात होत असतील ही तशी शंकाच.आज सोशल मीडिया हा जगभरातील संवादाचं साधन होत असून, दिवसाची सुरुवात मोबाइलपासून ते शेवटही मोबाइल बघून होते. पण, तो कसा हाताळावा, काय करावं, काय करू नये हा ज्याचा त्याचा अधिकार जरी असला तरीही भावनाआवेगात किंवा दुसºयावरच्या प्रेम, विश्वासापोटी आपण काय देतोय, काय नाही याची थोडीशी कल्पना असावी.गेसिंग पासवर्ड, व्हॉट्स स्कॅन अ‍ॅप्लिकेशन आणि इतर हॅकिंगच्या सोप्या-सहज उपलब्ध असणाºया पर्यायानं आपल्यावर सतत कुणाची तरी नजर असू शकते. ही शक्यताही गृहीत धरायला हवी. पण स्ट्राँग पासवर्ड आणि इतर काळजी घेणं हे प्रत्येकाला ठाऊक असेलच असं नाही. त्या माहिती नसण्याचा गैरफायदा घेऊन एखाद्याचं जीवनही बरबाद होतं. किंवा चिंतेत जगणं होतं, नैराश्य येतं, गुन्हेगारी विचार येतात आणि यातून काही जणांची पावलं नको तिकडे वळून भलतंच काही होतं. आज या जवळपास मानवी जीवन व्यापलेल्या गोष्टींवर कुणी गांभीर्याने विचार करताना दिसत नाही. जलदगतीने संवाद जवळपास सर्व प्रकारचा मीडिया (टेक्स्ट, फोटो, व्हीडिओ) कुठूनही कुठंही पाठवता येतो हे जरी फायदेशीर असलं तरीसुद्धा त्याची दुसरी बाजू ही तितकीच भयंकर रूप दाखवते.हे एवढं सारं, ते आजच्या प्रेमातही झिरपत आलंय.. shreniknaradesn41@gmail.com