शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
3
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
4
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
5
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
6
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
7
'तो' वाद जीवावर बेतला! अवघ्या २० रुपयांसाठी काँग्रेस नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या
8
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
9
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
10
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
11
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
12
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
13
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
14
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?
15
सरकारी कर्मचारी आणि पेन्शधारकांना मोठी दिवाळी भेट! पगारात होणारी इतकी वाढ
16
'आपलं अफेअर विसरून जा'; फॉर्महाऊसवर नेऊन अत्याचार केल्याचा तरुणीची आरोप, पोलीस निरीक्षकावर गुन्हा
17
पुणे विमानतळावर पंढरपुरातील नेत्याच्या बॅगेत बंदुकीसह सापडली काडतुसे; तो नेता कोण?
18
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
19
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
20
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले

खुल्लमखुल्ला

By admin | Updated: January 29, 2015 16:39 IST

सगळंच जगजाहीर करत, सेल्फ बोल्ड होणारा एक खतरनाक सेल्फी ट्रेण्ड.

‘व्हाय नॉट?’ ‘लागते कशाला प्रायव्हसी, खुल के जिओ’ असं का म्हणताहेत, सेल्फी-ग्रुपी काढणारे तरुण मुलं?

 
सेल्फीज् हा शब्दच माहिती नाही, असा कुणी सापडणं चालू वर्तमानकाळात तसं अवघडच आहे. कुणाला माहिती नाही? ज्यानं ‘स्मार्टफोन’ पाहिलाय, वापरलाय, त्याला ‘सेल्फी’ हा शब्द माहिती असतोच!
सेल्फी ( २ी’ा्री२)  म्हणजे काय तर स्मार्टफोनने, 
किंवा वेबकॅमने स्वत:च स्वत:चा काढलेला आणि कुठल्याही सोशल नेटवर्किंग साइटवर टाकलेला फोटो.
२0१३ या वर्षानं जगाला भेट दिलेला हा शब्द. त्यावर्षीच जगभरातल्या माणसांच्या हातात सर्वाधिक स्मार्टफोन आले आणि त्या स्मार्टफोनच्या फ्रण्टकॅमेर्‍यानं जो तो आपापले फोटो स्वत:च काढू लागला. त्या वर्षी ‘सेल्फी’ या शब्दाचा वापर १७ हजार टक्के वाढला. आणि ऑक्सफर्ड डिक्शनरीत या शब्दाचा समावेशही करण्यात आला!
आता तर काय ‘सेल्फी’ काढणं ही एक लेटेस्ट फॅशन आहे, क्रेझ आहे आणि ट्रेण्डही. ओबामांपासून-मोदींपर्यंत वर्ल्ड लीडर्स जिथे या ना त्याप्रसंगी स्वत:च ‘सेल्फी’ काढू लागले, तिथे बाकीचे किस झाड की पत्ती?
सेल्फी. स्वत:वर अपरंपार प्रेम करायला आणि जे जगजाहीर व्यक्त करायला शिकवणारा एक नवं ऑब्सेशनच!
 
 
कपली
 
कुणाही जोडप्यानं स्वत:चा काढलेला सेल्फी म्हणजे हा कपली. खरं तर याचा इंग्रजी उच्चार करतात ‘कपलीज्’. सेलिब्रिटी कपल्सच्या सेल्फीज्ना कपलीज म्हणण्यापासून या ट्रेण्डची सुरुवात झाली आणि आता तर कुणीही कपल आला फोटो ‘कपली’ म्हणूनच शेअर करतो.
 
 
 
मिरर सेल्फीज्
काहींना असतेच ना तासन्तास स्वत:ला आरशात पहायची सवय. आरशासमोर उभं राहून स्वत:चं प्रतिबिंब टिपण्याची हौस. आरशासह स्वत:चा फोटो काढणं आणि तो अपलोड करणं म्हणजे मिरर सेल्फीज्.
 
 
डेल्फी 
 
आता हे डेल्फी म्हणजे काय ऐकाल तर उडालच तुम्ही.
डेल्फी (delfies) म्हणजे  सेल्फी विथ डॉग. अनेकांना आपल्या कुत्र्याला कुत्रा म्हटलेलं आवडत नाही. ते सतत त्या कुत्र्याबरोबर फोटो काढत शेअर करतात, तेच हे डेल्फी.
 
 
ग्रुपी.
 
सेल्फी हा सगळ्यात हॉट आणि तरुण शब्द आहे असं म्हणता म्हणता ‘सेल्फी’ हा तसा ‘नॉट सो कूल अँण्ड ट्रेण्डी’ गटात जाऊन पडला. आता त्याची जागा घेतली आहे ती ‘ग्रुपी’नं.  सोप्या शब्दात ग्रूपचा फोटो म्हणजे ग्रुपी ( groupie) . मागच्या वर्षी ऑस्कर सोहळ्याच्या वेळी तमाम बड्या स्टार्सचा ग्रुपी जगभर गाजला, आणि मसार्‍या जगातच ग्रुपीची क्रेझ आली. आता तर व्यायाम करण्यापासून पार्टी करण्यापर्यंत ग्रुपचं पागलपण या ‘ग्रुपी’नं जगजाहीर होऊ लागलं.
 
 
 
यूजीज्
 
तरुणांच्या ट्रेण्डी भाषेचा अभ्यास करणार्‍यांचं म्हणणं आहे की, सेल्फीज् हा शब्दच फार जनरलाईज्ड आहे. सेल्फीज् हा शब्दच आता जुना झाला. आता जमाना आहे यूजीज्चा. आता हे यूजीज् म्हणजे काय तर एकाहून अधिक माणसांचा कुणीतरी फ्रण्टकॅमेर्‍यानंच काढलेला फोटो. मात्र ज्यानं काढला त्याचा तो सेल्फी म्हटला तर बाकीच्यांचा काय? बाकीचे त्या फोटोतले ‘यूजीज्’. (Usies) फोटो सगळ्यांचा, सगळ्यांच्या ‘यूज’चा म्हणून बाकीचे यूजी. एकेकट्यांचे सेल्फीज् बोअर करतात, पण हे अनेकांचे किंवा कुणा दोघांचे यूजीज् म्हणजे धमाल असा नवीन ट्रेण्ड आहे.
 
 
बेल्फी
 
बेल्फी (celfies)  म्हणजे स्वत:च स्वत:चा पाठमोरा काढलेला फोटो. चेहरा न येऊ देता, पाठमोरे, एकाबाजूचे फोटो काढत शेअर करणं आणि इतरांना बुचकळ्यात पाडणं हा सध्या अनेकांचा छंद. ते म्हणजेच बेल्फी.
 
बाथरूम सेल्फीज्
 
बाथरूममध्ये अंघोळ करताना, ब्रश करताना कुणी स्वत:चे फोटो काढेल का?
लोक काढतात आणि ते सोशल नेटवर्किंगवर टाकतातही. त्यालाच म्हणतात बाथरूम सेल्फीज. सध्या सगळ्यात फेवरिट हॅशटॅग कोणता हे शोधलं तर बाथरूम सेल्फीज आघाडीवर आहेत.