शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
5
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
6
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
7
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
8
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
9
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
10
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
11
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
12
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
13
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
14
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
15
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
16
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
17
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
18
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
19
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाइन आलं की काम; ऑफलाइन गेलं की आराम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 11:00 IST

नाशिकसारख्या शहरात बदलत्या ‘कल्चर’नं घडवलेल्या जीवनशैलीनं तंत्रज्ञानाचा हात धरला तेव्हा.

ठळक मुद्देया रनर्सनाही हे बाइकवरचं धावतं आयुष्य जगण्याचे धडे देत बरंच काही शिकवत असणार, घडवत असणार हे नक्की !

अझहर शेख

..अहो, साहेब नोकर्‍या आहेत कुठं? मग, करणार काय? हे काम बरं आहे ना आपलं..? आपण आपल्या मनाचा राजा ! ऑनलाइन गेलो की डय़ूटी सुरू, ऑफलाइन गेलो की डय़ूटी बंद, सोपं ना एकदम..!’एक स्मार्ट लूकवाला भाऊ एकदम ‘स्टाइलमध्ये’ सांगत होता. डोक्याला झिकझिक नाही, काम केलं तर पैसे, नाही केलं तर काय कोण छळत नाही असं एकदम नाशिक ठसक्यात सांगणारा हा दोस्त. तो आणि त्याच्यासारख्या अनेक दोस्तांना भेटायचं म्हणून मी त्यांचा मिटिंग पॉइण्ट गाठला होता. नाशिकचा कॉलेजरोड तसा एकदम तरुण. बुंगाट गाडय़ा चालवत सुसाट फिरणार्‍या पोरांचा वेग तसा या कॉलेजरोडला काही नवीन नाही. त्याच कॉलेजरोडवर आता ही नवी बायकर्स पोरं दिसतात. कोण ही पोरं?मुंबई-पुण्यात तर तशी आम झालीत आणि आता नाशिक-औरंगाबाद-नागपूरमध्येही गल्लोगल्ली दिसतात की ही पोरं ! पाठीवर कंपनीचं नाव असलेलं पोतडं, हातात मोबाइल, कानात एअरफोनच्या लटकलेल्या वायरी, डोक्यावर हेल्मेट की निघाले ते कामाला! ‘रनर्स’ म्हणतात त्यांना! पण नेमकं करतात कसं ही तरुण मुलं हे काम? का करतात? त्याकडे नोकरी म्हणून, चारघटकाचं काम म्हणून पाहतात, की करिअर म्हणून? आहेत कोण ही मुलं? त्यांना भेटून गप्पा मारून, जरा त्यांच्या बाइकवर बसून दिवसभर फिरलो तर उलगडत गेली नव्या जीवनशैलीतून, तंत्रज्ञान आणि सव्र्हिस इंडस्ट्रीच्या नव्या गुळपीठातून जन्माला आलेली एका नव्या जॉबची गोष्ट.पहिले त्यांच्या नियमित भेटण्याच्या अड्डय़ावर पोहचलो. कट्टाच तो, काहीजण रेंगाळले होते. काही गप्पा मारत होते. काही आपल्या मोबाइलमध्ये डोकं घालून होते. तितक्यात एकाच्या फोनवर ऑनलाइन ऑर्डरची बेल वाजली. तसा तो चटकन निघाला. एक सेकंद वाया न घालता त्यानं डोक्यात हेल्मेट घातलं आणि तडक गाडीला किक मारून निघाला. दुसर्‍या एकाशी बोलायचा प्रय} केला तर तोही असाच घाईत, मग भेटतो म्हणाला. लक्षात आलंच की, यांचं सगळं काम असं घडय़ाळाला बांधलेलं. एकेक मिनिट महत्त्वाचा. मग मागे वळून बघत नाहीत ही पोरं. असे अनेक बाइकवर पळणारे रनर्स दिवसभर शहरात नजरेस पडतात. पाठीवर बॅग, डोक्यावर हेल्मेट कानात इअरफोन किंवा ब्ल्यू टूथ अंगावर कंपनीने दिलेला विशिष्ट रंगाचा टी-शर्ट, त्यांना पाहिलं की कुणालाही कळतं, गडी निघाला ऑर्डर घेऊन!त्यातल्याच काही रनर्सशी दोस्ती केली. म्हटलं, दोस्तांनो जरा उलगडून सांगा तुमच्या एकदम हटके नि नव्या जॉबची गोष्ट. जरा कॉन्फिडन्स वाटल्यावर एकजण म्हणाला, ‘आमच्या कामाविषयी रिसपेक्ट आहे ना तुम्हाला, हेच पाहून लय भारी वाटलं !’त्यांच्याशी गप्पा मारताना लक्षात आलं की, डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणारी सगळीच तरुण मुलं काही कमी शिकलेली नाहीत. रिकामटेकडी होती नि चिकटली नव्या कामाला असंही काही झालेलं नाही. बहुतांश मुलं शिकलेली आहेत. कोणी बारावी तर कोणी पदवी तर कोणी पदव्युत्तर पदवीर्पयत शिक्षण घेतलेलेही आहेत. प्रत्येकाची हे काम स्वीकारण्याची कारणं मात्र वेगळी आहेत. काहीजण आपल्या आई-वडिलांना हातभार लावावा म्हणून या नव्या कामाकडे वळले, तर काही शिकणारे; पण आपला खर्च स्वतर्‍ भागविण्याच्या इराद्यानं या नोकरीकडे आले. कुटुंबाची आर्थिक घडी अधिक मजबूत करायची म्हणूनही काहीजण हा पार्टटाइम  जॉब करत आहेत. सगळ्यांना माहिती आहे, हे काम आपण कायमचं, लॉँगटर्म करू, यातून काही मोठी संधी मिळेल, करिअर घडेल असं काही नाही. मात्र आज चार पैसे मिळवून देणारं काम मिळतं आहे, ते कामही तंत्रज्ञानामुळं पारदर्शक आहे. जेवढं काम केलं, त्याचे पैसे चोख, कुणाची सहानुभूती नाही, की उपकार केल्यासारखी दयेची भावना नाही. काम केलं, पैसे मिळाले, हिशेब संपला, असाच एकूण दृष्टिकोन. दिवसाला दहा ते पंधरा ऑर्डर नाशिकसारख्या शहरात अनेक रनर्सच्या वाटय़ाला आताशा येतात. ऑर्डर घेऊन किती लांब जायचंय त्या अंतरानुसार त्यांना ती ऑर्डर पोहचविण्याचे पैसे मिळतात. दिवसाकाठी काही रनर्स हजारभर रु पयेही कमिशनपोटी कमवतात. कधी कधी तर काहीजण त्याहून जास्तही कमावतात.  एक रनर असलेला दोस्त भेटला राहुल काळे. तो सांगत होता, ‘मी आयटीआय, बारावी उत्तीर्ण झालो. आता कॉलेजात पहिल्या वर्षाला शिकतोय. वडील चहा स्टॉल चालवितात. घरची परिस्थिती जेमतेम. मी एकुलता एक; पण मला दिसतंय घराचा सगळा भार वडिलांवर येतोय. त्यामुळे शिक्षण घेत असतानाच घराला थोडा हातभार लावावा म्हणून महिनाभर झाला ही पार्टटाइम नोकरी करतोय. ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपन्यांमुळं मार्केटमध्ये जरा चांगली कंडिक्शन झाली, नाहीतर नाशिकसारख्या छोटय़ा शहरात कमी शिकलेल्या पोरांना कुठं जॉब होते? भले भले शिकलेले बेरोजगार आहेत, मग माझ्यासारख्यांना कोण नोकरी देणार? पण आता हे काम मिळालं आहे, त्यामुळे रिकाम्या बसणार्‍या पोरांचं प्रमाणही कमी होतंय !’तो म्हणतोय ते खरंच आहे, हे काम मिळवायचं तर तसं ‘क्वॉलिफिकेशन’ तरी काय हवं? ज्यांना अ‍ॅण्ड्रॉइड मोबाइल फोन वापरता येतो, ज्यांच्याकडे बाइक आहे, जी चालवता येते, त्यांना हे काम सहज मिळू लागलं. अर्थात गाडीचे कागदपत्रं हवेत, लायसन्स हवं पक्कं अशा अटी आहेतच. पण ते असलं तर पार्टटाइम, फुलटाइमही हे काम करता येतो. हे रनर्स सांगतात, ‘नोकरी आहे; पण डोक्याला ताप नाही, आपली मर्जी. ऑनलाइन आलं की काम, ऑफलाइन असलं की काम नाही. मुळात ही नोकरी करताना आपण आपल्या मनाचा राजा असतो. एकदा ऑफलाइन गेले की, तुमची डय़ूटी संपली. घरच्यांनाही काही काळजी नाही की, पोरगा नेमकं काम काय करतोय ! आपण चांगले वागलो तर लोकदेखील रिस्पेक्टनं वागतात!’सादिकही हेच सांगतो. तो कॉमर्सचा पदवीधर.पार्टटाइम नोकरी म्हणून सादिकनं हे काम करायला घेतलं. चार महिने झाले तो रनर म्हणून ऑर्डर पोहचवतोय. तो म्हणतो, ‘यार ये सबकुछ ऑनलाइन होनेसे सच में कमाल कर दिया, बेकारो को कामवाला बना दिया!’या रनर्सनाही हे बाइकवरचं धावतं आयुष्य जगण्याचे धडे देत बरंच काही शिकवत असणार, घडवत असणार हे नक्की !(अझहर लोकमतच्या नाशिक आवृत्तीत उपसंपादक आहे.)