शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

वन वे तिकीट

By admin | Updated: April 26, 2017 13:43 IST

घरंदारं सोडून मोठ्या शहरात स्वप्नांच्या मागे धावणारा प्रवास

मुलीला कशाला शिक्षणासाठी दूर पाठवता? तिला कशाला एवढं शिकवायचं, असं म्हणणारे लोक असतीलही, पण माझ्या बाबांनी मात्र वेगळा विचार करत वयाच्या बाराव्या वर्षी घरापासून दूर शिक्षणासाठी पाठवलं, आता मला ध्यास आहे, त्यांची स्वप्न पूर्ण करण्याचा..
 
 
नेरपिंगळाई हे अमरावती जिल्ह्यातील एक छोटंसं गाव. गावाजवळच पिंगळदेवीचा गड असल्यामुळे गावाच नाव पिंगळाईदेवीच्या नावावर ठेवण्यात आलं. गाव लहान असलं तरी गावात जवळपास सगळ्या सुखसुविधा उपलब्ध आहेत. परंतु शिक्षणाच्या बाबतीत म्हटलं तर अजुनही थोडं पिछाडलेलचं. गावात फक्त बारावी आर्ट्सपर्यंतच शिक्षण उपलब्ध आहे. दहावी नंतर कुणाला सायन्सला अ‍ॅडमिशन घ्यायची असेल तर शहरात जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.
शिक्षणासाठी स्थलांतर करणाऱ्या अशा विद्यार्थ्यांमधली मी एक. दहावी नंतर शिक्षणासाठी शहरात जात असत. परंतु माझ्या बाबतीत हे जरा लवकरच घडलं माझं इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतच शिक्षण गावातल्या जिल्हा परिषद कन्या शाळेमध्ये झालं. पाचवीमध्ये असताना मी नवोदयची परीक्षा पास झाले. त्यामुळे मला माझं प्राथमिक शिक्षण संपल्यानंतरच जवाहर नवोदय विद्यालय, नवसारी, अमरावती येथे जावं लागलं. हे माझं पहिल स्थलांतर होतं. येथील शाळेतील वातावरण भलतच आधुनिक होतं. मोठमोठ्या इमारती, हिरवागार परिसर, खेळाच मैदान सगळ काही चकचकीत शिक्षण खेळ, संगीत, शिस्त इ. सगळ्याच गोष्टीत विद्यार्थ्याला इथे निपुण केलं जायचं. तसेच इथे प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला होस्टेल अनिवार्य असायचं. याच कारणामुळे मला घर सोडून जावं लागणार होतं. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे आता आपल्या मुलीस पुढील शिक्षण शहरातल्या एका चांगल्या शाळेत विनामूल्य होणार हे ऐकून बाबा जाम खुश होते. येवढ्या लहान वयात पहिल्यांदा मी आई वडिलांना सोडून एका अनोळखी ठिकाणी राहायला जाणार होते.
नवोदयमध्ये प्रवेश केल्यानंतर तिथलं सगळकाही माझ्यासाठी नवीन होतं. नवीन वातावरण, नवीन मैत्रिणी, नवीन शिक्षक त्यामुळे सुरुवातीला थोडं एकटं वाटायचं. सगळ्यांसोबत ओळखी झाल्यानंतर मात्र मी तिथल्या वातावरणात चांगलीच रुळले. नंतर रोजचा दिनक्रम सुरु झाला सकाळी गेम्स, शाळा, स्टडी, गेम्स आणि पुन्हा रात्रीची स्टडी अशा प्रकारे पूर्ण दिवस पॅक असायचा. कळायचंसुद्धा नाही कधी दिवस उजाडला आणि कधी संपला. वाटायचं की शाळा जणू काही कुटुंबच आहे आपलं. माझ्या आयुष्यातील हे पहिलं स्थलांतर खूप महत्वाचं होतं. स्वत:च्या चुका ओळखायला आणि स्वत:मध्ये बदल करायला, मला या स्थलांतरानी शिकवलं. रक्ताच्या नात्यांपेक्षाही मैत्रीची नाती किती घट्ट असतात हे इथं अनुभवलं अनेक नवीन नाती इथेच जोडल्या गेली. महत्वाचं म्हणजे कुठल्याही परिस्थिीत कुठल्याही प्रकारच्या लोकांशी जुळवून घ्यायला मी इथे शिकली. नवोदयमध्ये पुढील ५ वर्ष काढली आणि या ५ वर्षामध्ये खूप काही चांगल्या सवयी मला लागल्या. त्यापैकी एक म्हणजे स्वत:ची सगळी कामे दिलेल्या वेळेवर आणि निटनेटकी करणं तिथे आपल्याला स्वत:ची जबाबदारी स्वत:च घ्यावी लागते. सकाळी उठ, अंघोळ कर, जेवण कर, औषध घे, अभ्यास कर असं सांगणार कुणी नसत या सगळ्या गोष्टींमुळे आपण स्वावलंबी बनतो.
स्थलांतरातील दुसरा टप्पा म्हणजे माझा पॉलिटेक्नीक ला प्रवेश. मी डॉ. पंजाबराव देशमुख पॉलिटेक्नीकल गाडगेनगर, अमरावती येथे अ‍ॅडमिशन घेतली हे ही एक प्रकारे स्थलांतरच होतं. कारण आता मला नवोदयच होस्टेल सोडून ‘पी.डी.गर्ल्स’ या होस्टेलला जावं लागणार होतं. आयुष्यात पुन्हा एक उलथापालथ झाली. एक क्षणात सगळं काही बदलत पुन्हा नवीन शिक्षक, नवीन जागा, नविन मैत्रिणी, नवीन होस्टेल सगळं काही नवीन. मात्र या गोष्टीचा अनुभव अगोदरच असल्यामुळे या सगळ्या नवीन गोष्टींसोबत जुळवून घ्यायला मला जास्त वेळ लागला नाही. काही दिवसातच मी इथल्या वातावरणाशीही एकरुप झाले. 
इंजिनिअरींगसाठी शक्यतो सगळे शिक्षणासाठी एका मोठ्या शहरातून दुसऱ्या मोठ्या शहरात जातात. परंतु माझ्याबाबतीत इथे थोडं उलटच घडलं माझं दुसरं स्थलांतर होत अमरावती ते वर्धा. डिप्लोमा कम्लीट झालेला होता आणि मी चांगले मार्क घेऊन पासही झाले होते. प्रश्न होता पुढच्या शिक्षणाचा. ओपन कॅटेगरी असल्यामुळे इंजिनिअरींगची फी, मेसचा आणि राहण्याचा खर्च माझ्या वडिलांना परवडण्यासारखा नव्हता. पुढील शिक्षण जर पूर्ण करायचं असेल तर या गोष्टीवर उपाय काढणं फार गरजेच होतं. आणि उपाय निघाला माझी वर्ध्याला इंजिनिअरींगला अ‍ॅडमिशन झाली. फी चा प्रश्न सुटला थोडा. वर्धा हे शहर माझ्यासाठी अनोळखी होतं. सुरुवातीला थोडा त्रास झालं. काहीच माहीत नसल्यामुळे सगळ्या गोष्टी स्वत:लाच शोधाव्या लागल्या. मदत करु शकणारं कुणी नव्हतं. मात्र अनोळखी लोक खूप जिव्हाळ्याचे झाले. याच लोकांनी प्रत्येक अडीअडचणीत भरपूर मदत केली. जीवलग मैत्रिणी मिळाल्या आणि अशाप्रकारे सध्याच्या स्थितीत मी माझं इंजिनिअरींग सुरळीतपणे पूर्ण करत आहे. इथंही मी होस्टेललाच राहते.
माझ्या स्थलांतराच्या प्रवासात मी जवळपास आतापर्यंत दहा वर्षे होस्टेलमध्ये काढलेली आहेत. जेवणाच्या बाबतीत म्हटलं तर मेसही प्रत्येकवेळी बदलत गेल्या. घरच्या सारखं मेसमध्ये मिळू शकत नाही हे खरं आहे मात्र मेसवाल्या मावशीच्या, भैय्याच्या प्रेमळ स्वभावामुळे आणि त्यांच्या काळजीपूर्वक विचारपुसमुळे घरच्यांची कमी मला कधी जाणवली नाही. येवढ्या वर्ष बाहेर राहून एक आत्मविश्वास आला आहे. वाटतं आता आपण कुठल्याही अनोळखी ठिकाणी राहू शकतो आणि तिथल्या परिस्थितीशी जुळवून घेऊ शकतो. या प्रवासात खूप प्रकारची माणसं , चांगली वाईट माणसं भेटली. त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळालं. या प्रवासाने मला खरी दुनियादारी शिकवली.
मुलीला कशाला बाहेर पाठवता एवढ्या दूर? तिला कशाला एवढं शिकवावं लागतं? अशा विचारांचे लोक असतात मात्र माझ्या बाबांच्या डोक्यात हा विचार कधीच नव्हता. १२ वर्षांची असतांना घराबाहेर पडले तेव्हापासून तर आजपर्यंत त्यांना माझ्या प्रत्येक निर्णयाला पाठिंबा दिला. उलट नेहमी त्यांनीच मला अजून पुढे जाण्याची प्रेरणा दिली. 
आता मला त्यांची सारी स्वप्न पूर्ण करायची आहेत..
 
ऐश्वर्या ईश्वरसिंग तवर
मु.पो.नेरपिंगळाई, ता. मोर्शी,
जि. अमरावती
 
 
छोटीसी बात
किती ठरवलं होतं लवकर निघायचं म्हणून. तरीसुद्धा चांगलाच उशीर झाला परत यायला. ही शेवटची ट्रेन मिळाली ते तरी बरं. नाहीतर इतक्या रात्री एवढ्या लांब कसं आलो असतो काय माहीत!
हं ...या स्टेशनवर मी एकटाच उतरलो का? असंच दिसतंय - आजूबाजूला कुणीच नाहीये. सगळंच बंद आहे. गाड्या नाहीयेत. माणसं नाहीयेत. रस्त्याकडेचे दिवेच तेवढे काय ते मिणमिणताहेत. अधून मधून वाऱ्याची एखादी झुळूक येतेय थंडगार. मस्तच माहोल आहे एकदम. नेहमीचाच रस्ता - स्टेशन ते घर. 
पण किती वेगळा वाटतोय आत्ता. 
केवढी शांतता आहे! फक्त माझ्या चालण्याचाच तो काय आवाज ऐकू येतोय..हा हा! किती दिवस झाले बरं असं स्वत:चं चालणं ऐकून? 
..पण मी इतक्या भरभर का चालतोय? सगळी कामं संपवलीयेत. कुठलीही ट्रेन पकडायची नाहीये. किल्ली खिशात आहे. घरी जाऊन झोपायचंय फक्त. 
मग ही घाई कशाची? 
इथे आल्यापासून नकळतच लागलेली सवय . भरभर चालायची. सततची धावपळ. पण आत्ता असं - सा - व - का श जाऊयात. हळू हळू. 
हं ..आता जमतंय ..पूर्ण रस्ता रिकामा आहे. एवढं रस्त्याच्या कडेकडेनी कशाला चालायचं?आणि नुसतं चालायचं का? एक उडी मारूयात. अशी! हा हा!! कोणी पाहिलं तर वेडा म्हणतील पण पाहायला कोणी जागं आहेच कुठे?! - सगळेजण झोपलेत. 
आत्ता पूर्ण रस्ता माझा आहे. मी काहीपण करू शकतो - अजून एक उडी मारू शकतो - किंवा अशा तीन गिरक्या घेऊ शकतो. इतकंच काय दोन्ही हात लांब करून असं विमानासारखंपण चालू शकतो. हा हा!!
इथे वळलं की आलं घर. 
संपली गंमत. 
या आधी का नाही ट्राय केलं रात्री भटकणं? 
एक मिनिट, आत्ता केलंय तर जरा अजून वेळ मजा करूया का? जरा लांबच्या रस्त्यानं जाऊयात की घरी.
असंच, गिरक्या घेत, उड्या मारत..
- प्रसाद सांडभोर
sandbhorprasad@gmail.com