शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
2
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
3
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
4
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
5
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
6
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
7
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
8
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
9
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
10
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
11
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
12
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
13
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
14
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
15
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
16
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
18
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
19
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
20
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!

Ðiwali Detox - दिवाळीत ताजेतवाने होण्याचा भन्नाट उपाय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 07:30 IST

दिवाळीचे चार दिवस मस्त खा-प्या, मजा करा आणि ते करताना जरा आपल्या मनावरची, ताणावरची पुटंही काढता आली तर पाहा.

ठळक मुद्देलोकमत ऑक्सिजनच्या सर्व वाचक मित्र-मैत्रिणींना दिवाळीच्या शुभेच्छा.! Happy Diwali.

-ऑक्सिजन टीम

दिवाळीची खरं तर तशी आजच सुरुवात.आज वसूबारस, उद्या धनत्रयोदशी.दिवाळी येणार म्हणून घरीदारी आनंदाचं वातावरण आहे.साफसफाई मोहिमा कधीच झाल्या, जुने माळे खाली आले, त्यातल्या नकोशा वस्तू बाहेर टाकून देण्यात आल्या, सगळीकडे हात फिरला, सगळं कसं लख्खं, चकचकीत आणि देखणं झालं.आता आकाशकंदील उजळलायला लागले. लायटिंगच्या माळा मढून बसल्या आणि सगळीकडे रोषणाईच रोषणाई झाली.या सार्‍या रोषणाईत आणि प्रसन्न प्रकाशात आपल्या मनावरही साचलेला ताण पुसला जावा, मनावरची काजळी निपटून काढावी आणि मस्त तजेलदार प्रसन्न मनानं जगून घ्यावा सण असं आपल्यालाही वाटतंच.हल्ली तर स्ट्रेस, चिडचिड, अ‍ॅन्झायटी आणि उदास झाक ही अधनंमधनं घेरतेच आपल्याला. त्यातून सावरायचं कसं हे अनेकदा कळत नाही. तात्पुरती मोटिव्हेशनल पुस्तकं वाचली तर बरं वाटतं; पण ते काही आत झिरपत नाही, मुरत नाही आणि पुन्हा निराश झाक मनाला कोमेजून टाकते.मग वाटतं दिवाळी आली असेल तर त्या दिव्यांचा मंद प्रकाश आपल्याही मनात आणि आयुष्यात उजळावा. आपल्यालाही लाभावेत चार निवांत क्षण, रिलॅक्स करता यायला हवं, शांत-आनंदी वाटावं.पण ते कसं वाटावं?त्यासाठी आपण जशी घराची साफसफाई करतो तशी आपल्या मनाचीही करायला हवी आणि रांगोळीत रंग भरावेत तशा काही खास गोष्टी मुद्दाम करून, आपल्याही रोजच्या जगण्यात रंग भरावेत.एकीकडे काजळी काढायची, जळमटं झटकायची आणि दुसरीकडे छान  रंग भरायचे तर निदान या दिवाळीच्या दिवसांत तरी काही गोष्टी करायला हव्यात.त्याला म्हणता येईल दिवाळी डिटॉक्स.अलीकडे एक नवीन ट्रेण्ड आहे, ज्यात दिवाळीत भरपूर खाऊन झाल्यानंतर अनेकजण दिवाळी डिटॉक्स करतात. म्हणजे फक्त फळं खातात, ज्यूस पितात, पाणी भरपूर पितात असं बरंच काही करून, जे खाल्लं त्याचा अपराधभाव कमी करण्याचा प्रयत्न करतात.मात्र आता त्याच्या पुढे जात दिवाळीच्या चार दिवसांतच डिटॉक्सचा विचार करणंही सुरू झालं आहे. जे म्हटलं तर पारंपरिक आहे म्हटलं तर आधुनिक.त्या ट्रेण्डमधल्या या काही मुख्य गोष्टी.1. इट ट्रॅडिशनलट्रेण्डचं नाव जरी इंग्रजी वाटलं तरी त्याचा मतितार्थ एवढाच की जे फराळाचे पदार्थ आपल्या आया,आज्या दिवाळीत करतात, ते दणकून खा. फराळाचं नको, वजन वाढतं म्हणून पावभाजी नी सॅण्डविच खाण्यात काही अर्थ नाही. उलट थंडीच्या दिवसांच्या सुरुवातीस लाडू-शंकरपाळे-करंज्या हे स्निग्ध पदार्थ खाणंच उत्तम. त्यामुळे जे पारंपरिक ते खाणं हा या दिवाळीतला नियम.

2.हॅण्डमेडआजकाल ऑनलाइन काय मिळत नाही. बाजार तर वस्तूंनी भरलेले आहेत. त्यामुळे गिफ्ट देताना उगीच बाजारातून आणून काही गिफ्ट देण्यापेक्षा मस्त स्वतर्‍ बनवा. त्यातून दोन गोष्टी होतात, आपण स्वतर्‍ काही बनवलं म्हणून आपल्या कल्पनाशक्तीला चालना मिळते आणि उत्तम वेळ जातो म्हणून मनालाही छान हलकं वाटतं. गिफ्ट ज्याला द्यायचं त्याला स्पेशलही वाटतं. 

3. गप्पांचे अड्डेदिवाळीचे सेल्फी, ग्रुपी काढून भले तर टाका विविध ग्रुप्सवर. पण पूर्वी लहानपणी सगळी भावंडं जमत तसे गप्पांचे फड जमवा, पत्ते कुटा, बदाम सात आणि झब्बू खेळा. त्यातून जे मस्त वाटेल ते सोशल मीडियातल्या लाइक्सने वाटत नाही.

4. अभ्यंग आणि व्यायामदिवाळीत अभ्यंग स्नानाची परंपरा आहेच. तेव्हा उशिरार्पयत झोपून न राहता मस्त तेल मालिश करून, व्यायाम करून दिवाळीचे दिवस सुरू करा. हा एक उत्तम डिटॉक्स आहे.

5. सोशल मीडियाचा उपवास,हा डिटॉक्स तसा अवघड आहे; पण जमल्यास दिवाळीचे चार दिवस सोशल मीडियाचा उपवास करून पाहा. त्यानं खर्‍या आयुष्यातही चांगले लोक आहेत याची ओळख होऊ शकेल.