शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

NOT Your डायरी

By admin | Updated: February 15, 2017 18:05 IST

आपल्या भावना, चिडचिड, आपला उद्वेग नियंत्रित करता येत नाही. म्हणून मग भडभडून बोलावं तसं अनेकजण आपल्या व्यक्तिगत जगण्याचा पसारा फेसबुकवर मांडून बसतात. साऱ्या दुनियेला सांगतात आपबिती.

 - आॅक्सिजन टीम

आपल्या भावना, चिडचिड, आपला उद्वेगनियंत्रित करता येत नाही. म्हणून मग भडभडून बोलावं तसं अनेकजण आपल्या व्यक्तिगत जगण्याचा पसाराफेसबुकवर मांडून बसतात.साऱ्या दुनियेला सांगतातआपबिती.परिणाम,कधी लोक उपदेश देतात,कधी सहानुभूती व्यक्त करतात,तर कधी टिंगल करतात.आणि कधी तर त्या साऱ्यावरूनब्लॅकमेलही करतात..हे फेसबुक आहे, तुमची पर्सनल डायरी नव्हे..- असं वयात येणाऱ्या मुलांना आता शाळाशाळांत जाऊन सांगायची वेळ आली आहे अशी चर्चा गेले काही दिवस समाजमाध्यमतज्ज्ञ आणि समाजवर्तनतज्ज्ञांत जोर धरते आहे..त्या चर्चेला पुन्हा तोंड फोडलं ते अलीकडच्या एका घटनेनं..एक किशोरवयीन मुलगी, अडनिड्या वयातली. तिनं फेसबुकवर लिहिलं की, मला मरावंसं वाटतंय!त्यावर तिच्या मित्रयादीतल्या लोकांनी काय लिहिलं तर, मर पटकन. गो, किल युवरसेल्फ. तसाही जगून काय उपयोग? मेलीस तर कुणी अत्यंदर्शनालाही येणार नाही..मानसिकदृष्ट्या एकाकी असलेली ही मुलगी. आपण कुणालाच आवडत नाही. आपण मेलो तरी लोकांना फरक पडणार नाही या विचारानं अशा वाटेवर पुढं निघून गेली की तिनं आत्महत्त्याच केली..ही अशी एक घटना. पण जे आत्महत्त्या करत नाहीत, मात्र सोशल मीडियात सतत होणाऱ्या हेटाळणीनं त्रस्त असतात त्यांचं काय? जे आपल्या मनात जे जे येतं ते, आपल्यासंदर्भात जे जे घडतं ते ते सारं सोशल मीडियात शेअर करतात. ते कशामुळे?डायरी लिहिल्यासारखं स्वत:विषयी (आणि संपर्कातल्या इतरांविषयीही) टाइमलाइनवर लिहून काढतात. आणि मग त्या शेअर करण्याची सवय लागते. मात्र हे ओव्हरशेअरिंग करून आपण जगाला स्वत:विषयी काय काय सांगतो आहे याचं मात्र भान राहत नाही. द वॉल स्ट्रीट जर्नल या वृत्तपत्रात अलीकडेच या विषयांवर एक मालिका प्रसिद्ध झाली. एलिझाबेथ बर्नस्टेन या पत्रकाराने लिहिलेली ही अभ्यासमाला. त्यांनी सोशल मीडियात रोज शेअर होणाऱ्या स्टेटसचा अभ्यास तर केलाच; पण इतरांनी लिहिलेली माहिती रोजच्या रोज वाचणाऱ्यांचाही अभ्यास केला. त्यांचं म्हणणं आहे की, आपल्या मनावर या गोष्टीचा दोन प्रकारे परिणाम होतो. ओव्हरशेअरिंग या नव्याच आजारानं आपल्याला गाठलेलं आहे. ओव्हरशेअरिंग करणाऱ्यांचा पहिला प्रकार म्हणजे काहीजण वाट्टेल ते लिहित सुटतात. त्यातले अनेकजण डिप्रेस्ट. आपल्या दु:खाच्या, अपमानाच्या, वेदनांच्या कहाण्या सांगतात. आणि लिहून, पोस्ट करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतात. खरंतर अशा माणसांना आपल्या भावना, चिडचिड, आपला उद्वेग नियंत्रित करता येत नाही. म्हणून ते भडभडून बोलावं तसं भडभडूनच लिहितात.आणि दुसरा प्रकार वाचणारे. असे अनेकजण जे उगाच हे सारं वाचत राहतात. ती निगेटिव्हिटी स्वत:च्या मनात भरून घेतात. त्यावर विचार करत दु:खीही होतात.हे असं बहुसंख्यांच्या बाबतीत घडतं. पण त्यामुळे इतरांच्या दु:खालाही गांभीर्यानं न घेण्याची आणि ‘टेक केअर’ म्हणून विषय अत्यंत कॅज्युअली घेण्याची वृत्ती वाढते आहे.त्यातून मग अनेकदा अपमान, भावनांची खिल्ली उडवली जाणे, फुकट उपदेश असेही प्रसंग घडतात.परिणाम?एकाकीपणा वाढतो. मन जास्त उदास होतं. आणि आपण आपल्या आयुष्याची डायरीच चव्हाट्यावर उघडून ठेवतो..ती उघडायची की नाही, हा निर्णय सुदैवानं अजून तरी आपल्या हातात आहे..