शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

डिटॉक्स ड्रिंकचा नवा ट्रेण्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2018 15:27 IST

डिटॉक्स. हा शब्द सध्या तरुण जगाचाही भाग झाला आहे.

- भक्ती सोमणडिटॉक्स. हा शब्द सध्या तरुण जगाचाही भाग झाला आहे. आपल्या शरीरातली अनावश्यक घटक जास्तीत जास्त पाणी पिऊन काढून टाकणं हे यातलं साधं सूत्र. पण ट्रेण्ड आला की, सगळेच जण गुगल करायला लागतात, डिटॉक्स ड्रिंक्स नावाचे ट्रेण्ड फेसबुकसह इन्स्टाग्रामवर झळकू लागतात. खरंतर हे तसं नवीन काहीच नाही. आपल्या आजीच्या काळातलंच सारं फिरून नव्यानं आलंय. मात्र आहे उपयोगी. त्यामुळे या उन्हाळ्यात डिटॉक्स ड्रिंक नावाचं हे पेय प्रकरण एन्जॉय करायला काहीच हरकत नाही.वाळ्या-मोगऱ्याचं पाणीआठवत असेल तर आपली आजी पूर्वी माठातल्या पाण्यात मस्त वाळा घालायची. मोगºयाची फुलं, तुळशीची पानं घालून ठेवायची. ते काय होतं? छान थंड सुगंधीत पाणीच. आताही तेच करायचं आहे. तेही अगदी सोपं. म्हणजे आवडत असेल तर सरळ पाण्यात संत्र्याचं किंवा मोसबीचं साल घालून ठेवायचं. किंवा लिंबाचं साल घातलं तरी चालतं. या पाण्याला मस्त गंध तर असतोच पण उत्तम डिटॉक्स आणि पाचक म्हणूनही हे पाणी काम करतं.ताक आणि शहाळ्याची जादूउन्हाळ्यात भरपूर पाणी पिणं तर महत्त्वाचं आहेच, पण नुस्तं पाणी प्यालं जात नाही म्हणून तर सरबतं आहेत. त्या सरबतांनाही जरा उत्तम रंगरूप दिलं तर तेही डिटॉक्सचं काम करतातच. त्यासाठी म्हणूनच उन्हाळ्यात ठरवून शहाळ्याचं पाणी नेमानं पिणं उत्तम. याशिवाय काळं मीठ-सैंधव घातलेलं ताक, साखर न घालता लिंबू मीठ पाणी हे पारंपरिक प्रकारही शरीरात उत्तम आणि डिटॉक्स म्हणून, शरीराला तकवा राहण्यासाठीही उत्तम. वाचताना हे सारं पारंपरिक वाटेलही; पण कोल्ड्रिंकचा हात सोडला तर हे सारे प्रकारच शरीरासाठी हितकारक ठरावेत.त्वचेवर ‘ग्लो’ हवाय?आजकाल पाणी पिताना तसेच्या तसे न पिता त्यातून शरीराला पोषक घटक मिळावेत, बॉडी हायड्रेट राखली जावी यासाठी विविध घटक पाण्यात मिसळले जातात. उन्हाळ्याच्या दिवसात असे पाणी आवर्जून पिण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. यात साखर मात्र घालायची नाही.त्यातलंच हे एक डिटॉक्स ड्रिंक. काकडीच्या चकत्या, लिंबाच्या चक्त्या, आल्याचे छोटे तुकडे (आवडीप्रमाणे), पुदिन्याची पानं हे सारं रात्री पाण्यात घालून ठेवायचं. दुसºया दिवशी ते दिवसभर प्यायचं. वजन कमी करणं, स्किनवर ग्लो येणं यासाठीही हे पाणी उत्तम. bhaktisoman@gmail.com