शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

आमच्या कष्टांचं मोल कुणाला?- तरुण शेतकऱ्यांचा  सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2020 5:48 PM

ज्याच्या हातात तंत्रज्ञानतो टिकेल, फायदाही कमावेल; पण तेवढा स्मार्टनेस ज्यांच्याकडे नाही, ते टिकतील की हरतील या स्पर्धेत?

- शिवाजी पवार

शेतात-मातीत उतरून काम करणा:या, शेतमाल विक्रीसाठी जिवाचं रान करणा:या काही तरुण दोस्तांना गाठलं.आणि त्यांनाच विचारलं की, तुमचं काय मत आहे या नव्या कृषी कायद्याविषयी. प्रत्यक्ष शेतीचा, उत्पादन आणि विक्रीचा अनुभव असलेले हे तरुण दोस्त.त्यातला एकजण म्हणाला, माझं नाव नसाल प्रसिद्ध करणार तर मोकळेपणानं बोलतो.त्याचं म्हणणं की, शेतमाल खरेदी-विक्र ीची जुनी व्यवस्था एकदम वगळण्यापूर्वी नवी व्यवस्था हळूहळू उभी करायला हवी होती. जर कृषी सुधारणा करायच्याच होत्या तर स्टेप बाय स्टेप जायला हवं होतं. शेती क्षेत्नातला हा मोठा बदल स्वीकारणं छोटय़ा शेतक:यांना शक्य होणार नाही. त्यांना संपवण्याच्या दिशेने हा प्रवास आहे. 

अभियांत्रिकीचे शिक्षण घेत शेती करणारा हा तरुण तो म्हणतो, नव्या कायद्यामुळे आपल्याला यापुढे कॉर्पोरेटला शेतमाल विकावा लागणार आहे, हे आता ध्यानात घ्यावं लागेल. कॉन्ट्रॅक्ट करावे लागतील. बडय़ा विक्री साखळ्या-ब्रॅण्ड यांच्यासाठी आता उत्पादन करावं लागणार आहे. बटाटय़ाचे उत्पादन हे चिप्स बनवण्यासाठी, टोमॅटो सॉसकरिता लावावे लागतील. या कंपन्यांना त्या साईझचा, विशिष्ट चवीचा, खास रंगाचा आणि ढंगाचा बटाटा शेतात पिकवून दाखवावा लागेल. बाजार समितीत काय सोनही विकलं जातं आणि पितळही विकलं जातं. अगदीच क्र ीम आणि एक्स्पोर्ट क्वॉलिटीचा डाळिंब विकला जातो आणि स्पॉट असलेला डाळिंबही खरेदी होतो. कार्पोरेटला मात्न असं काही चालणार नाही. त्यामुळे शेती क्षेत्नातल्या या सुधारणांचा इम्पॅक्ट खूप मोठा असणार आहे.मात्र त्यांचं असंही म्हणणं की, जो तरुण शेतकरी स्मार्ट होईल, वेबसाइटवरून ऑनलाइन सेल करेल अशा टेक्नोसॅव्ही शेतक:याला या स्पर्धेतही चांगले दिवस येतील. एखाददुसरा जण अॅप लॉँच करून शेतमालाचं मार्केटिंग करणारे तरुण असतीलही, पण अजूनही आठवडे बाजारात विक्र ी करणारे शेतकरी आहेतच की, त्याचं काय? मात्र पारंपरिक शेती करणारा, टेक्नोजगापासून लांब असलेल्या शेतक:यांचं काय होणार, त्याचा विचार सरकारने करायला हवा असंही हा तरुण सांगतो. आपल्या या प्रश्नांची उत्तरंच अजून मिळत नाहीत, असं तो सांगतो.मात्र काही तरुण शेतक:यांचं तसं मत नाही.त्यांना नव्या टेक्नोजगात तंत्रज्ञानाचे फायदे समजलेले आहेत, आपल्या हिमतीवर बाजारपेठेत माल उतरवू, असं ते म्हणतात.त्यांची धोके पत्करायची तयारी आहे.त्यांचं हे म्हणणं त्यांच्याच शब्दांत.

नाशिक जिल्ह्यातील कंपन्यांच्या माध्यमातून मी द्राक्षांची निर्यातही केली आहे. नेपाळ, बांगलादेश येथील काही व्यापा:यांकडूनही द्राक्षांची विक्र ी करतो. ज्यावर्षी द्राक्षांची निर्यात कमी होते त्यावेळी लोकल मार्केटमध्ये भाव पडतात आणि जेव्हा द्राक्षाला युरोप आणि गल्फमधून मागणी वाढते तेव्हा लोकल मार्केटला द्राक्ष आंबट होतात.  मात्न ही निर्यात सोप्पी नक्कीच नाही. थोडा जरी केमिकलचा अंश मिळून आला तर माल रिजेक्ट होतो. केवळ क्र ीम माल एक्स्पोर्ट होतो. मात्न सर्व शेतक:यांचा माल हा एक्स्पोर्ट क्वॉलिटीचा नसतो. स्थानिक हवामान, पाणी ओढय़ाचं की विहिरीचं, बोअरवेलचं की कालव्याचं हेदेखील मॅटर करतं. त्यामुळे उद्या जर द्राक्ष खरेदीत कार्पोरेट कंपन्या उतरल्या, तर छोटे-मोठे व्यवसायिक, छोटय़ा कंपन्या एकतर संपतील किंवा या कॉर्पोरेट कंपन्या त्यांना खरेदी करतील.  सुरुवातीच्या काळात चांगला द कार्पोरेट देतील. मात्न एकदा त्यांची मक्तेदारी तयार झाली की मग शेतक:यांचे हाल होतील. देशातील इतर अनेक क्षेत्नांमध्ये सध्या झालेल्या मक्तेदारीचा आपण बरा-वाईट अनुभव घेत आहोतच.उद्या कॉर्पोरेट गहू खरेदी करतील. त्यात व्हॅल्यू अॅडिशन करून मैदा आणि पीठही बनवतील; पण त्यातून शेतक:यांसाठी व्हॅल्यू अॅडिशन होईल का, या प्रश्नांची उत्तरंही तपासून पाहिली पाहिजेत.

- अनिरुद्ध खर्डे 

***

मी या नव्या कायद्याचं स्वागत करतो. त्यात काही गोष्टी आहे, ज्याचा लाभ शेतक:याला होऊ शकतो असं मला वाटतं. मी स्वत: शेतमालाचे उत्पादन घेतो आणि त्याची विक्र ीही करतो. त्या अनुभवातून सांगतो, आडत मुक्ती होणं हे खरंच गरजेचं होतं. खुल्या अर्थव्यवस्थेमध्ये हा निर्णय अपेक्षित होता. साखळी करून मालाचे भाव पाडणं हे मी अनेकदा भोगलंय. शेताच्या बांधावर येऊन जर कोणी माल खरेदी करत असेल, पेमेंटची गॅरंटी असेल, सिक्युरिटी असेल आणि एमएसपीला जर धक्काही लावला जात नसेल तर अडचण काय? मागील आठवडय़ात बाजार समितीत मूग घेऊन गेलो, तो भिजला या नावाखाली अतिशय कमी दराने खरेदी केला गेला. आडत्यांनी भाव पाडले. दुसरं म्हणजे साखर कारखानदारांच्या मक्तेदारीला आता चाप बसणार आहे. नवे कारखाने उभी राहिले तर स्पर्धेतून आपोआपच शेतक:यांना चांगले दर मिळतील. 5क् वर्षापासून बाजार समित्यांचा अनुभव आपण घेतच आहोत, त्यात बदल तर झालाच पाहिजे. या नव्या शेती सुधारणांचा अनुभव घ्यायला हरकत काय? त्याचे परिणाम दिसायला थोडा वेळ लागेल; पण नव्या गोष्टींचा विचार, स्वीकार करून पाहू. - महेश लवांडे (तरुण प्रयोगशील शेतकरी)