शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
2
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
3
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
4
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
5
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
6
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
7
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
8
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना
9
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
10
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
11
Jalgaon Suicide: बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना
12
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
13
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
14
सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा १० ग्रॅम सोनं खरेदी करायला किती खर्च करावा लागणार?
15
Video: हॉर्न वाजवण्यास रोखल्याने तो संतापला; सुरक्षा रक्षकाला थारखाली चिरडले...
16
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
17
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन
18
"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला
19
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
20
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?

मु. पो. परभणी

By admin | Updated: March 1, 2017 13:43 IST

गंगाखेडहून परभणीला आले. शाळेतल्या मुली माझ्या राहणीमानाला, बॅगला दप्तर, रिफीलला कांडी आणि इरेझरला खोडरबर म्हणण्याच्या सवयीला हसायच्या. तिथून सुरुवात झाली आणि स्थलांतरानं शहरी नजर शिकवली...

- वैष्णवी श्रीकांत तर्कसेमी मुळची गंगाखेडची. आमचं गंगाखेड हा परभणी जिल्ह्यातला एक तालुका. मी लहानाची मोठी तिथेच झाले. भरपूर माणसांच्या मोठ्या कुटुंबात अतिशय लाडात, कौतुकात वाढले. सुरुवातीपासून अभ्यासात जेमतेमच होते. इयत्ता चौथीपर्यंत तर शाळासुद्धा कधी नियमित केली नाही. माझी मोठी बहीण माझ्या अगदीच विरु द्ध, अभ्यासात खूप हुशार. ती दहावीला चांगल्या मार्कांनी पास झाली. मग आईबाबांनी तिच्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी गंगाखेड व्यतिरिक्त दुसरा पर्याय निवडण्याचा निर्णय घेतला आणि पुढील शिक्षणाकरिता परभणीला स्थायिक व्हायचं असं निश्चित झालं. बाबा वकिली व्यवसायात असल्यामुळे त्यांना गंगाखेड सोडून परभणीला येणं शक्य नव्हतं. मी गंगाखेडच्या श्री सरस्वती विद्यालयात शिकत होते. आणि त्यावेळी सहाव्या वर्गाची परीक्षा दिली होती. मलासुद्धा शिकायला परभणीला घेऊन यायचं हा ताईचाच अट्टाहास. तिने तो शेवटपर्यंत सोडला नाही. मग आई आम्हा दोघींना घेऊन परभणीला राहणार असं ठरलं. आम्ही गंगाखेडहून परभणीला स्थलांतर केलं आणि एका नव्या आयुष्याची खऱ्या अर्थाने सुरु वात झाली. परभणीला आल्यावर मला बाल विद्यामंदिर या नामांकित विद्यालयात सातव्या वर्गात प्रवेश मिळाला. सुरुवातीला शाळेत थोडा त्रास झाला. शाळेतल्या काही मुलींनी मला खूप लवकर त्यांच्यात सामावून घेतलं. पण इतर अनेक मुली माझ्या राहणीमानाला, माझ्या बॅगला दप्तर, रिफीलला कांडी आणि इरेझरला खोडरबर म्हणण्याच्या सवयीला हसायच्या. मला वाईट वाटायचं. पण आज मागे वळून पाहिल्यावर कळतं की तोसुद्धा एक अनुभवच होता. पुढे आठवी - नववीच्या वर्षांत शाळेमध्ये खूप रमत गेले. इतर अनेक गोष्टींमध्ये भाग घेऊ लागले, पण अभ्यासात डोळे दीपवून टाकणारं यश वगैरे फारसं कधी मिळालं नाही.बाबांना सोडून परभणीला राहत असल्यामुळे त्यांची आठवण वारंवार यायची. ते आठवड्याच्या सुटीला परभणीला यायचे. ते दोन दिवस आमच्यासाठी जणू पर्वणीच असायची. दहावीच्या वर्षी खूप प्रचंड अभ्यास केला आणि माझ्याकडून मला स्वत:लाच जेमतेम पास होण्याची अपेक्षा असताना मी ७६ टक्के मिळविले. माझ्या स्वत:च्याच नजरेत माझी किंमत वाढली होती. यशाचा आलेख आता उंचावत न्यायचा असं मनाशी निश्चित केलं होतं. अकरावी-बारावीच्या वर्षांतसुद्धा खूप अभ्यास केला; पण अपेक्षित असं यश मिळू शकलं नाही. त्यामुळे थोडं नैराश्य आलं. आणि निराश झालेले सगळेच विद्यार्थी जसं बीएससी करण्याचा निर्णय घेतात तसाच मीपण घेतला. मायक्रोबायोलॉजी, बॉटनी, केमिस्ट्री असे तीन विषय निवडले. सुरुवातीपासूनच मायक्र ोबायोलॉजी विषयाबद्दल मनात आवड निर्माण होऊ लागली.त्याच महाविद्यालयात मायक्रोबायोलॉजीचे प्राध्यापक डॉ. शिवा आयथल सर भेटले. माझ्या आयुष्यावर त्यांचा प्रचंड प्रभाव आहे. त्यांनीच मला खऱ्या अर्थाने जगायला शिकवलं. आयुष्यात फक्त चांगले मार्क्स मिळवणं म्हणजेच सगळं काही नव्हे हे त्यांनी मला पटवून दिलं. माझ्यात सुप्तावस्थेत असलेल्या लेखनाच्या गुणाला त्यांनी जागृत केलं आणि मला माझा लेखनाचा छंद जोपासायला भाग पाडलं. त्यांच्याचकडून मला लेखनाची प्रेरणा मिळत गेली. मला स्वत:चीच नव्याने ओळख झाली. सुरुवातीला माझं लिखाण मी माझ्यापुरतं आणि शिवा सरांपुरतंच मर्यादित ठेवलं होतं; पण मागच्या काही वर्षांपासून मी माझे लेख फेसबुकवर पोस्ट करते आणि तिथे माझ्या लिखाणाला मिळणारा प्रतिसाद पाहून माझं मन गहिवरून येतं. लेखनाबरोबरच मला शिवा सरांमुळे वाचनाची आवड निर्माण झाली आणि मी मराठीसोबतच इंग्लिश पुस्तकंसुद्धा वाचू लागले. वाचनामुळे आपले विचार प्रगल्भ होतात, याचा अनुभव मला स्वत:ला आला. आता मी मायक्र ोबायोलॉजी विषयात एमएससी करत आहे. येत्या दोन- चार महिन्यानंतर स्थलांतरणाची अजून एक संधी मिळणार आहे. गंगाखेड ते परभणी या स्थलांतराने मला आयुष्य जगायला शिकवलं. स्थलांतर करण्याचं धाडस केलंच नसतं तर इतकं सगळं शिकायचं राहून गेलं असतं.या सगळ्यात परभणी शहराविषयी मनात प्रेम निर्माण झालं. या शहराने मायेने जवळ घेतलं म्हणूनच इथे राहणं शक्य झालं. म्हणूनच स्थलांतरणाचा हा निर्णय खरोखरच आयुष्य बदलणारा ठरला. - परभणीअनाऊन्समेण्टछोटीशी गावं.त्यापेक्षा मोठी पण छोटीच शहरं.या शहरात राहणारी जिद्दी मुलं.आपल्या स्वप्नांचा हात धरून,संधीच्या शोधातमोठ्या शहरांकडे धावतात.काय देतात ही मोठी शहरं त्यांना,कसं घडवतात-बिघडवतात?आणि जगवतातही..??-ते अनुभव शेअर करण्याचाहा नवा कट्टातुम्ही केलाय असा प्रवास?आपलं छोटंसं गाव, घर सोडून मोठ्या शहरात गेला आहात शिकायला?मोठ्या शहरात? दुसऱ्या राज्यात? परदेशातही?काय शिकवलं या स्थित्यंतरानं तुम्हाला?काय अनुभव आले?कडू-वाईट?हरवणारे-जिंकवणारे?त्या अनुभवांनी तुमची जगण्याची रीत बदलली का?दृष्टिकोन बदलला का?त्या शहरानं आपलं मानलं का तुम्हाला?तुम्ही त्या शहराला?की संपलंच नाही उपरेपण?या साऱ्या अनुभवाविषयी लिहायचंय?तर मग ही एक संधी!लिहा तुमच्या स्थलांतराची गोष्ट.
१. लिहून पाठवणार असाल, तरपाकिटावर ‘वन वे तिकीट’ असा उल्लेख करा.सोबत तुमचा फोटो आणि पत्ता-फोननंबरहीजरूर लिहा...पत्ता-  संयोजक, ' ऑक्सिजन', लोकमत भवन, बी-३, एम.आय.डी.सी, अंब, नाशिक - 422010
 
2. ई-मेल-  oxygen@lokmat.com