शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

एका छत्रीचं मान्सून स्टेटमेण्ट

By admin | Updated: June 25, 2015 14:22 IST

छत्री किती रंगीली आहे यावरून तुमची वृत्ती ओळखता येऊ शकते. ट्रेकला जाणारा रेनकोटच घेतो, छत्रीच्या मागे लागत नाही. नखरेल मुली नाजूक छत्र्या घेतात. तर रांगडे, बेफिकीर गडी छत्री चुकूनसुद्धा घेत नाहीत. काहीजण स्वत: छत्री आणत नाहीत, कायम इतरांच्या छत्रीत घुसतात.

छत्री ही यापूर्वीच्या पिढय़ांसाठी एक गरज होती, एक पावसाळी गरज! आज तशी स्थिती नाही.
सध्या एक नवीनच ट्रेण्ड चर्चेत आहे. त्याचं नाव आहे, ‘युवर अम्ब्रेला इज युवर मान्सून स्टेटमेण्ट’.
एक काळी छत्री घेतली, निघाले पावसात हा जमाना आता जुना झालाय!
हा नवीन ट्रेण्ड म्हणतोय की, तुम्ही पावसालाच नव्हे, तर मान्सूनला कुठल्या वृत्तीनं सामोरे जाता हेच तुमची छत्री सांगते. त्यामुळे छत्री ही नुस्ती फॅशन नाही, तर तुमचं मान्सून स्टेटमेण्ट आहे.
मनावरची मरगळ उतरवून पावसाकडे, त्यातल्या रोमान्सकडे तुम्ही कसं पाहता हे सांगणारी एक वृत्ती आहे.
कुणी म्हणोल की, काहीही काय, छत्रीचा आणि पावसाळी मानसिकतेचा काय संबंध?
पण हा नवा तरुण ट्रेण्ड म्हणतोय की, हा संबंध आहे. कारण अनेकजण पावसाकडे वैताग, रिपरिप, चिखल, राबडी, राडा म्हणून पाहतात. 
काही जणांना पाऊस म्हटलं की नुस्त्या कविताच आठवतात.
काही जणांना फक्त पावसाळी  ट्रेक आठवतात.
काहीजण उठतात आणि चहाभजी पाटर्य़ा करतात.
आणि काहीजण पाऊस पडायला लागला की, चहा-कॉफीचा मग घेऊन फक्त गाणी ऐकत बसतात.
काहीजण फक्त पुस्तकं वाचतात.
जो तो पावसाला आपापल्या वृत्तीप्रमाणो आणि मूडप्रमाणो रिअॅक्शन देत असतो.
आणि त्या रिअॅक्शन देण्याचं एक प्रतीक असतं आपली छत्री!
तुमची छत्री किती रंगीली आहे यावरून सहज तुमची वृत्ती ओळखता येऊ शकते.
ट्रेकला जाणारा रेनकोटच घेतो, छत्रीच्या मागे लागत नाही. 
नाजूकसाजूक मुली नाजूक छत्र्या घेतात, तर रांगडे, बेफिकीर गडी छत्री चुकूनसुद्धा घेत नाहीत.
काहीजण स्वत: छत्री आणत नाहीत, कायम इतरांच्या छत्रीत घुसतात.
रआपल्या अवतीभोवती पाहा, अशा अनेक वृत्ती दिसतील. 
आणि तुमच्या स्वत:च्याही छत्रीकडे पाहा.
तुमची पावसाला असलेली रिअॅक्शनही सहज दिसेल!
ती वाचा आणि म्हणा, धीस इज माय मान्सून स्टेटमेण्ट!!
- श्रवणी बॅनर्जी
 
सध्या फॅशनेबल असलेल्या छत्र्यांचे 5 प्रकार
 
1) कव्हर्ड हॅण्डल
पूर्वी असे गोलाकार वळालेल्या दांडय़ाच्या छत्र्या असत. जुन्या काळ्या, आजोबा स्टाईल. ती फॅशन आता परत आली आहे.
 
2) हेड अम्ब्रेला
दांडा नसलेली, डायरेक्ट डोक्यात टोपीसारखी घालायची छत्री सध्या बरेच जण वापरतात.
 
3) फुलाफुलांची झालर छत्री
 छत्रीला बाहेरून छोटय़ा-मोठय़ा झालरी असतात. एकदम मंडप असावा तशा.
 
4) छोटय़ात छोटी फोल्डिंग छत्री
एकदम छोटी घडी होईल अशा अनेक फोल्डिंग छत्र्या सध्या मिळतात.
 
5) पर्सनल छत्री
स्वत: रंगवलेली, त्यावर स्वत:चं नाव, एखादा मॅसेज किंवा एखाद्या फोटो अशा पर्सनलाईज्ड छत्र्या सध्या हीट आहेत.