शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
6
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
7
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
8
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
9
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
10
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
11
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
12
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
13
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
14
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
15
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
16
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
17
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
18
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
19
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
20
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द

मोबाइलची चटक तरुणांना गुन्हे करायला भाग पाडतेय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 08:00 IST

पुण्यात आनंदवन नावाचं मोबाइल व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र आहे. मोबाइलचं व्यसन आहे आणि ते इतर व्यसनांइतकंच घातक आहे, त्यानं आयुष्य भरकटायला लागलं याची जाणीव झालेले अनेक पालक आणि तरुण या केंद्रात येतात. त्या केंद्रानं राज्यभरातून सायबर पोलिसांकडून मागवलेली ही सायबर गुन्ह्यांची आकडेवारी.

ठळक मुद्देहे सगळे गुन्हे सरसकट मोबाइल वापरामुळेच झाले असं म्हणता येत नाही, मात्र तरीही मोबाइलचा वापर, व्यसनाधिनता आणि गुन्हे याचं दृष्टचक्र तरुणांना गाठतं आहे.

- हर्षल पंडित

मोबाइलचं अ‍ॅडिक्शन असलेल्यांचं प्रमाण चिंताजनक आहेच. रोज आमच्याकडे 14 ते 22 या वयोगटातील अनेक तरुण-तरुणी सल्ला-समुपदेशनासाठी येतात. नववी-दहावीत शिकणारी ही मुलं. आईवडील मोबाइल घेऊन देतात आणि त्यानंतर एकदम व्यसनाधिनतेच्या गर्तेत जावं तशी ही मुलं मोबाइलच्या व्यसनाधिनतेत ढकलली जातात. विशेषतर्‍ सध्या पबजी या खेळाचं व्यसन अनेक तरुणांमध्ये आढळतं. मोबाइल गेम्ससह इंटरनेटचा वापर, पोर्न पाहण्याचं व्यसन मोठय़ा प्रमाणात दिसून येत आहे. ही मुलं तासंतास मोबाइलवर असतात. दिवसाला सुमारे 14 ते 15 तास मोबाइलवर असणं, गेम खेळणं हे सर्रास दिसतं. त्यामुळे त्यांच्यात वर्तन समस्या निर्माण होता. चिडचिड होते. झोप होत नाही. अभ्यासावरचं चित्त उडतं, परीक्षेत नापास होणं सुरू होतं.त्याहून भयंकर म्हणजे अनेक तरुण आणि तरुणींनाही मोबाइल-इंटरनेटमुळे पोर्न पाहण्याचं व्यसन लागतं आणि ते पाहून त्याप्रमाणे शरीर संबंध ठेवण्याचा प्रय} अनेकजण करतात. त्यातून शरीरसंबंधांच्या विकृत कल्पनाही त्यांच्या मनात घर करतात. घरोघर मोबाइल भांडणाचंही कारण ठरताना दिसत आहे. अनेक मुलं मोबाइल वापरावरून पालकांशी भांडतात. हुज्जत घालतात. काहीजण तर पालकांवर हात उगारण्यार्पयत भान सोडतात. त्याशिवाय घर सोडण्याच्या धमक्या देणं, घरातून निघून जाणं, आत्महत्या करण्याची दमबाजी करणं हे सारं सुरू होतं.हातातला मोबाइल हे एक भयंकर व्यसन ठरतं आहे, तरुणांसाठी घातक आहे हे दिसत होतंच. मात्र महाराष्ट्रात त्यातून घडणारे गुन्हे किती हे वास्तव शोधायचं म्हणून आम्ही राज्यभरात सायबर पोलिसांकडे माहिती मागितली आणि त्यातून जी आकडेवारी समोर आली, ते आजचं तरुण मुलांच्या मोबाइल वापराचं आणि व्यसनाचं वास्तव आहे.

*** 

मोबाइल, इंटरनेटचा वापर यामुळे किती आत्महत्या झाल्या? खून/अपघात किंवा गैरसमजुतीमुळे झालेले वाद याचं प्रमाण काय यासंदर्भातील माहिती पुण्यातील आनंदवान डीअ‍ॅडिक्शन सेंटरचे समुपदेशक हर्षल पंडित यांनी राज्यभरात माहिती अधिकारांतर्गत सायबर पोलिसांकडे मागितली होती. त्यानुसार हाती आलेली ही आकडेवारी. अर्थात ही माहिती सरसकट दाखल झालेल्या सायबर गुन्ह्यांच्या संदर्भातील आहे. 

कोल्हापूर-100अमरावती-175औरंगाबाद (शहर) -630भंडारा -142चंद्रपूर -291लातूर -128नागपूर ( शहर ) -477नाशिक (शहर)- 246नाशिक ( ग्रामिण) -120पालघर-136

रायगड -239रत्नागिरी -203सातारा-181ठाणे ( शहर) -1,019ठाणे ( ग्रामीण) 246वर्धा -169यवतमाळ- 325बुलडाणा-120पुणे (ग्रामीण) -139जळगाव-154मुंबई -793

*** 

पुण्याचा नंबर पहिला

एकटय़ा पुणे (शहर) परिसरात सायबर पोलिसांनी13,357 गुन्हे दाखल केले.त्यातून 12,683 गुन्हे निकाली निघाले असून,बाकीच्यांचा तपास सुरू आहे.

आनंदवन व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र, पुणेanandvan09@gmail.com