शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

मोबाइल उपवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2018 15:02 IST

कोल्हापूरच्या महाविद्यालयांत मोबाइलपासून प्रयत्नपूर्वक दूर राहणाऱ्या मुला-मुलींचा एक ‘शांत’ अनुभव.

-संदीप आडनाईक

अन्न-वस्त्र-निवारा-मोबाइल आणि डेटा या सध्याच्या जीवनावश्यक गरजा आहेत. त्यातही तरुणांच्या जगात तर शेवटच्या दोन गोष्टी प्राधान्यक्रमात पहिल्या दोनांत याव्यात. मात्र दुसरीकडे याच स्मार्टफोनच्या चर्चांत परस्पर संवाद हरवत चालल्याची, एकटेपणाचीही चर्चा आहे. सोशल मीडियात दोन हजार मित्र प्रत्यक्षात कुणीच नाही हे चित्रही भयाण आहे. त्यावर उपाय शोधायला हवा असं ज्याला-त्याला वाटतं. मात्र चर्चांच्या पलीकडे जाऊन कोल्हापुरात एक नवीन उपक्रम आकार घेतो आहे.त्याचं नाव, मोबाइल उपवास.कोल्हापुरातील एका प्राध्यापकाने तीन वर्षांपूर्वी हा एक उपाय शोधत मोबाइलचा वापर कमी करता येईल का, असा प्रयत्न करून पाहिलाय. एरव्ही उपवास धार्मिक कारणांसाठी, श्रद्धेपायी केला जातो आता नव्या डिजिटल काळात मोबाइलचा उपवास करण्या-करवण्याची चर्चा सुरू होताना दिसतेय. हा कोल्हापूरमधला उपक्रमही त्यातलाच एक.कोल्हापुरातली सायबर अर्थात छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट आॅफ बिझनेस एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च ही उच्चशिक्षण देणारी संस्था. या संस्थेच्याच दिनकरराव शिंदे समाजकार्य विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. दीपक भोसले यांच्या मनात या मोबाइलच्या उपवासाची कल्पना आली. मोबाइल न वापरता, त्याचा उपवासच करण्याच्या या आपल्या कल्पनेला नव्या ‘कनेक्टेड’ जगात कुणी साथ देईल का, असा त्यांनाही प्रश्नच होता. सुरुवातीला त्यांच्या या कल्पनेची अनेकांनी थट्टाच केली; मात्र मोबाइलचा अतिवापर, त्याच्यावरचं अवलंबित्व, त्यानं तुटलेला परस्पर संवाद हे सारं त्यांनी आसपासच्या माणसांना समजावून सांगायला सुरुवात केली. आपल्या घरापासूनच सुरुवात केली. पत्नी, मुलं यांना सारं तपशिलात समजवल्यावर यांनी मोबाइल उपवास करायचं ठरवलं. घरच्यांनी साथ दिली; पण महाविद्यालयात तरुण मुलांना समजावून सांगणं, राजी करणं काही सोपं नव्हतंच. दीड वर्षापूर्वी त्यांनी यासंदर्भात प्रयत्न सुरू केले. पण एकवेळ गर्लफ्रेंडला बाजूला करतील, परंतु मोबाइल दूर ठेवणार नाही अशी तरुणांची मानसिकता. मात्र हळूहळू भोसले सरांच्या प्रयत्नांना यश आलं, मुलांनाही त्यांच्या म्हणण्यात तथ्य वाटू लागलं. आणि अनेक मुलं या मोबाइल उपवास उपक्रमात सहभागी व्हायला तयार झाले. आता हा उपक्रम कोल्हापुरातील सर्वच महाविद्यालयात कसा राबविता येईल यासाठी भोसले सर प्रयत्न करत आहेत.प्रा. दीपक भोसले सांगतात, मोबाइल अ‍ॅडिक्ट होणाऱ्या तरुण पिढीशी आपला संवाद हरवत चाललाय. हे चित्र बदलायला हवं, त्यासाठी काहीतरी करायला हवं असं मला वाटत होतं. मोबाइलचा अतिवापर ही सध्या मोठी समस्या बनते आहे. तरुण मुलांचं मोबाइलचं अवलंबित्व वाढतं आहे, इतकं की त्यांना त्याशिवाय जगणंच मुश्कील व्हावं. म्हणून मग वाटलं की, निदान काहीकाळ तरी ही मुलं मोबाइल स्वत:पासून लांब ठेवू शकतील का? तसा त्यांनी तो ठेवावा. तोच हा मोबाइल उपवास. म्हणून मग मुलांशी बोलून, त्यांना समजावून सप्टेंबर २0१६ पासून माझ्याच महाविद्यालयात हा उपक्रम सुरू केला. विशेष म्हणजे या सगळ्याची गरज लक्षात आल्यावर मुला-मुलींचा त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. दिवसेंंदिवस त्यांचा या उपक्रमातला सहभागही वाढत आहे. जूनपासून हा उपक्रम शहरातील विविध महाविद्यालयांत राबवता येतो का, यासाठीही आम्ही प्रयत्न करणार आहोत.यानिमित्तानं मोबाइल उपवास करणाºया मुला-मुलींशीही बोलणं झालं. त्यातलं तात्पर्य एकच की, ठरवलं तर काही काळ मोबाइलपासून लांब राहता येतं. लांब राहिल्यानं काही बिघडत नाही. उलट त्यावेळेचा सदुपयोग करण्याची शक्यता निर्माण होते. कोल्हापूरकर तरुण-तरुणींनी सुरू केलेल्या या उपवासातून निदान पर्याय तरी पुढं येतोय. नुस्त्या चर्चेपेक्षा हा पर्याय अधिक कृतिशील आहे.

मोबाइल उपवास कसा करतात?या उपवासाची सगळ्यात पहिली अट म्हणजे महाविद्यालयाच्या वेळेत मोबाइलचा वापर करणार नाही. हीच या उपवासाची सुरुवात.महाविद्यालयाच्या वेळापत्रकानुसार दर महिन्याला ‘मोबाइल उपवास’ केला जातो. ज्यात दिवसातील पाच तास किंवा त्याहून अधिक वेळ मोबाइलपासून दूर राहण्याचा प्रयत्न करणं अपेक्षित आहे.मोबाइल न वापरल्यानं कट्ट्यावर पुन्हा गप्पांचे फड रंगू लागलेत. परस्पर संवाद वाढतोय.वर्गात शिक्षक शिकवत असताना मोबाइल न वापरल्यानं अभ्यासाकडेही लक्ष वाढलंय.

मोबाइल उपवास करणारीमुलं काय म्हणतात...समाजकार्य पदवीचा दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी प्रवीण चौगुले सांगतो, या मोबाइल उपवास उपक्रमात मी गेल्या दोन वर्षांपासून सहभागी आहे. या उपक्रमामुळे माझा मोबाइलचा अतिवापर कमी झाला. मी मित्रांशी, नातेवाइकांशी, शिक्षकांशी थेट बोलायला लागलो.**मनीषा ठाणेकर सांगते, ज्या दिवशी मोबाइल हातात नसतो, त्यादिवशी काहीतरी चुकल्यासारखं वाटतं; पण त्या दिवशी मैत्रिणींसमवेत भरपूर गप्पा होतात.**किरण बनसोडे. पदवी घेऊन तो कॉलेजमधून बाहेर पडलाय. स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याच्या तयारीत आहे. तो सांगतो, अजूनही मी एक दिवस मोबाइल उपवास ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न करतो आहे. आतापर्यंत तरी तो यशस्वी ठरलाय. शांत वाटतं. मोबाइलवर खेळणं कमी झाल्यानं कामाकडे लक्ष वाढलं.**प्रियांका घाटगे सांगते, मोबाइलचा अतिवापर होतोय हे खरं. विशेषत: सोशल मीडिया आणि मोबाइलचा वापर वाढला आहे. यामुळे नातीगोती, मैत्री विसरून आम्ही स्वत:मध्ये गुरफटून गेलो आहोत. एक दिवस जर मोबाइल बंद ठेवला तरी त्याचा फायदा होतो. मुख्य म्हणजे शांत वाटतं.**पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी केनियातून कोल्हापुरात आलेल्या केविन ओकिओ. तो सांगतो, ‘मोबाइल उपवास’ ही संकल्पना मला फारशी पटली नव्हती. सध्या तंत्रज्ञानाचं युग असताना मोबाइलपासून दूर राहणं हा विरोधाभास वाटत होता. मात्र, अन्य विद्यार्थी मित्रांचे अनुभव ऐकल्यानंतर मीदेखील या उपक्रमात सहभागी झालो.**रेखा डावरे म्हणाली, हा माझ्यासाठी अतिशय भन्नाट अनुभव होता. मोबाइलशिवाय कधी एखादा दिवस दूर राहावे लागेल, ही कल्पनाच मला सहन झाली नसती; परंतु मित्रांच्या आग्रहाखातर मी एकदा हा प्रयोग करून पाहिला. त्यानंतर सातत्याने वर्षभर मी जाणीवपूर्वक मोबाइलपासून दूर राहतेय. त्याचा फायदा मला आणि माझ्या कुटुंबीयांना झालाय.**तृप्ती पाटील सांगते, मोबाइल हे एक व्यसन झालं आहे. मोबाइल दूर ठेवल्यामुळे मी स्वत:लाच जास्त वेळ देऊ लागले. हा व्यक्तिमत्त्व विकासाचाच भाग आहे. माझी इतरांना ऐकण्याची क्षमता आणि संयमही वाढला आहे.( लेखक लोकमतच्या कोल्हापुर आवृत्ती उपमुख्य उपसंपादक आहेत. sandip.adnaik@gmail.com)