शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

#metoo जगाचा एक भेसूर चेहराच आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2017 09:42 IST

जगभरात तरुणी, महिलांनी आपल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराची, छेडछाडीची जाहीर कबुली दिली आणि जगाचा एक भेसूर चेहराच समोर आला.

- प्रियदर्शिनी हिंगे #metoo हा हॅशटॅग सोशल मीडियात पाहिलाच असेल तुम्ही.गेले काही दिवस अनेकजणींनी आपल्याला आलेले लैंगिक अत्याचारांचे, छेडछाडीचे अनुभव हा हॅशटॅग लावत मोकळेपणानं व्यक्त केले. सोशल मीडिया हे एक वेगळं व्यासपीठ म्हणून यानिमित्तानं समोर आलं. ज्याविषयी बोलायची, तोंड उघडायचीच चोरी ते विषय जाहीर लिहिण्याची हिंमत जगभरात अनेक बायकांनी, मुलींनी केली.निमित्त झालं, हॉलिवुड प्रोड्युसर हार्वे विन्स्टेन यांच्या विरोधात काही महिलांनी पुढाकार घेऊन लैंगिक छळवणुकीची तक्रार दाखल केली. विन्स्टेन यांच्या विरोधात तब्बल साठ जणींनी तक्रार केली. त्यामुळे कंपनीने कारवाई करत त्यांना बाहेरचा रस्ता दाखवलाच; पण त्यांना आॅस्करच्या पॅनलवरूनही हटवण्यात आलं. दरम्यान प्रसिद्ध अभिनेत्री अलिसा मिलेनने १६ आॅक्टोबर रोजी ट्विटर हॅण्डलवरून ट्विट केलं. ज्या महिला लैंगिक छळवणुकीच्या बळी आहेत त्यांनी आपल्या व्यथा #metoo या हॅशटॅगनं लिहाव्यात असं आवाहनही केलं. अमेरिकेतच नाही आणि ग्लॅमर वर्ल्डमधल्याच नाही तर जगभरातल्या, विविध क्षेत्रात काम करणा-या अनेक महिलांनी आणि पुरुषांनीही लैंगिक छळाबद्दलच्या व्यथा मांडल्या.

लैंगिक छळ, छेडछाड, कार्यालयात किंवा सार्वजनिक ठिकाणी, प्रवासात आणि घरातही होणारे त्रास हे सारं बायका सहजी बोलत नाहीत. जाहीर सांगणं तर दूरच. त्यानं बाईचीच बदनामी होते असा एक जुनाट समज असतोच. मात्र या हॅशटॅगनं जगभरातल्या अनेकजणींनी खुलेपणानं आपली वेदना मांडली. #मीटू म्हणत फेसबुक, इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट या प्रकारच्या सर्व सोशल मीडियात ही मोहीम पसरली.आणि घरात जवळच्या नातेवाइकांनी केलेल्या बळजबरीपासून ते चोरटे स्पर्श, कार्यालयातले अपमान, जीवघेण्या नजरा याविषयी स्पष्ट लिहिलं. जगभर महिलांच्या लैंगिक छळाचं प्रमाण किती मोठं आहे हे यानिमित्तानं समोर आलं. या मोहिमेची व्याप्ती व तीव्रता बघत अनेक पुरु षांनीही लैंगिक छळाच्या विरुद्ध उभं रहायचा निर्णय घेतला. अनेकांनी लिहिलं की बायकांच्या या त्रासाची आपण कल्पनाही केली नव्हती. यापुढे असं वागणा-या अनेकांच्या विरोधात आम्हीही उभं राहू.जगभर गाजणा-या मीटू या हॅशटॅगचा वापर जरी मिलन या अभिनेत्रीने केला असला तरी या शब्दांचा उगम मात्र २००६ मध्ये सामाजिक कार्यकर्त्या तराना बुरेक यांनी पहिल्यांदा केला होता. एका १३ वर्षीय मुलीनं आपल्यावर बलात्कार झाल्याचं त्यांना सांगितलं. मात्र तेव्हा त्या तिला मदत करू शकल्या नाही. मात्र मी तुझ्या दु:खात सहभागी आहे. मीही या प्रसंगातून गेले आहे. हे सांगण्यासाठी त्यांनी मीटू या शब्दाचा प्रयोग केला. त्यानंतर बलात्कार तसेच लैंगिक छळवणुकीला सामोरे गेलेल्या महिलांसाठी त्यांनी संस्था सुरू केली. सोशल मीडियावर मीटू ही मोहीम सुरू केली. याच मोहिमेला मिलेनने एक नवा आयाम दिला.

(priya.dhole@gmail.com)