शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

मेन्स्ट्रुपीडिया : तिनं ठरवलं आपण जगजाहीर बोलायचं आणि जनजागृती करायचीच  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2017 14:42 IST

अडचण. हा एक शब्द त्या चार दिवसांविषयी बोलतो. पण असे किमान ५००० शब्द आहेत, जे मासिक पाळी हे दोन शब्द उच्चारायचे नाहीत म्हणून वापरले जातात. न बोलता टाळत राहावं असं ‘नकोसे’पण या विषयाला का आहे?

- प्रज्ञा शिदोरेआपल्यामध्ये असे अनेक विषय असतात ना की ज्याबद्दल बोलणं, चर्चा करणं याला (कुणी न सांगताही) मनाई असते. म्हणजे खरं तर हे विषय बोललो तर चालणार असतं, पण शी हे काय बोलायचे विषय आहेत का, असं म्हणून टाळलं जातं बोलणं! आणि त्यामुळेच अशा विषयांना अनेक गैरसमजांनी ग्रासलेलं असत. त्यापैकीच एक, खरं तर ज्याबद्दल सतत चर्चा व्हायला हवी असा विषय म्हणजे ‘ मासिक पाळी’. हा विषय आला की अनेकदा तोंडाला कुलूपच लागतात. शाळेत, साधारण सातवी किंवा आठवीमध्ये असताना अचानक मुलांना वर्गाबाहेर जायला सांगितलं जायचं किंवा त्यांना खेळायला पाठवलं जायचं आणि मुलींचा वर्गात ‘सेक्स एज्युकेशन’चा वर्ग घेतला जायचा. अर्थातच याबद्दल खुली चर्चा किंवा मोकळेपणाने बोलणं नाही. सारं कसं शांत शांत. त्या चार दिवसांविषयी काय ते मुलींनाच पटकन सांगून टाकलं जातं. पुढे तो विषय ‘अडचण’ या कॅटेगरीत ढकलून दिला जातो.

आदिती गुप्ता. तिच्या बाबतीतही वेगळं काही झालं नाही. वयाच्या बाराव्या वर्षी पाळी सुरू झाली. तेव्हा हे कोणालाही सांगू नको आणि बाहेर वाच्यता तर करूच नको असं घरच्यांनी तिलाही बजावलं. देवळात जाऊ नको, ताटं वाढू नको असंही सांगण्यात आलं होतं. म्हणजे थोडक्यात काय तर या ४-५ दिवसांमध्ये तू अशुद्ध आहेस असंच तिला सांगितलं गेलं. आदिती म्हणते, या अशा गोष्टींमुळेच मुलींच्या मनात लहानपणापासून आपण कुठेतरी कमी आहोत अशी शरमेची भावना यायला लागते. आता आदितीचा हा अनुभव काही तसा विरळा, वेगळा नाही. बहुतांश मुलींना हे सारं सहन करावं लागतं. ‘वेगळं बसायची’ पद्धत पाळावी लागली असेल. आणि पुन्हा मासिक पाळी सुरू आहे हे असं स्पष्ट सांगायची सोय नाही. सगळा कोडवर्डचा मामला.

खोट वाटेल, पण ‘पाळी’ याचे अनौपचारिक भाषेमध्ये समानार्थी किंवा त्या अर्थी सांगायचे जवळजवळ ५०० शब्द आहेत असं एक अभ्यास सांगतो. पण याबद्दल मोकळेपणाने बोलले मात्र जात नाही. मेन्स्ट्रुअल हायजिन डे निमित्त २०१६ साली एक अभ्यास करण्यात आला. या अभ्यासाचा निष्कर्ष हेच सांगतो की, दक्षिण आशियामधील ३० टक्के मुलींना त्यांची पाळी सुरू होईपर्यंत याबद्दल काहीही माहिती नसतं. आणि ज्याबद्दल माहिती नसते त्याबद्दल शंका, भीती असणं हे साहजिकच आहे!

तर ही सारी माहिती हाताशी घेऊन गेल्या ५ वर्षांपासून आदिती या विषयात काम करते आहे. ही ३३ वर्षीय झारखंडमध्ये राहणारी इंजिनिअर तरुणी. ती म्हणते की ग्लोरिया स्टाइनम नावाच्या अमेरिकेतील स्त्रीवादी लेखिका, अभ्यासक, पत्रकार हिचा एक लेख तिच्या वाचनात आला आणि सगळी कोडी सुटायला लागली. लेखाचं नाव आहे, ‘पुरु षांना पाळी येत असली /असती तर...? ’ (हा लेखही जरूर वाचा बरं का!)पाळी आणि त्याला जोडलेल्या विषयांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आदितीने ५ वर्षांपूर्वी ‘मेन्स्ट्रुपीडिया’ नावाची वेबसाइट सुरू केली. या वेबसाइटवर १० भारतीय भाषांमध्ये लिहिल्या गेलेल्या सचित्र पुस्तिका आहेत. मराठीतल्या या कॉमिक्सचं शीर्षक ‘मुलींसाठी मासिक पाळीविषयीची हसतखेळत मार्गदर्शिका’. यामध्ये मुलींच्या आणि मुलांच्या वाढत्या वयामध्ये होणारे शारीरिक आणि मानसिक बदल, पाळी का येते? त्याविषयीची माहिती, तसेच मुला-मुलींनी या वयामध्ये कसा आहार घ्यावा याविषयी सुद्धा लिहिले गेले आहे. या पुस्तिकांमधली ‘प्रियाताई’ आपल्याला याविषयी सांगत असते.२०१३ साली आदिती आणि तिचा तेव्हाचा बिझनेस पार्टनर आणि आत्ताचा लाइफ पार्टनर यांनी गुजरातच्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ डिझाइनमध्ये शिकत असताना, या चित्र पुस्तिकेच्या कामाची सुरुवात केली. यामध्ये प्राथमिक कल्पना म्हणजे मुला-मुलींना अतिशय साध्या, सोप्या, त्यांच्या भाषेत हा विषय समजावून सांगावा. म्हणजे, याविषयी ते आपापसात बोलतील आणि गैरसमज आपोआपच दूर होतील.क्र ाउड फण्डिंगमधून पैसे उभे करून या जोडीने यू-ट्युब चॅनेलही सुरू केले. ज्यामधल्या पहिल्याच व्हिडिओमध्ये ते याबद्दलची प्राथमिक कल्पना विस्ताराने सांगतात. पुढच्या व्हिडिओज मध्ये १० भारतीय भाषांमधून ते टप्प्याटप्प्याने हा विषय समजावून सांगतात.हा अतिशय नाजूक विषय समजावून सांगण्यासाठी यापेक्षा प्रभावी माध्यम काय असणार.तर ‘मेन्स्ट्रुपीडिया’ तुम्ही वाचा. हे व्हिडीओ पाहा. आणि आपल्या लहान बहीण-भावांनाही बघायला, वाचायला द्या!पाहा‘मेन्स्ट्रुपीडिया’चे यू-ट्युब चॅनेल - https://www.youtube.com/channel/UCj69ZCeeyl820rBHwjTX7Ewवाचा‘मेन्स्ट्रुपीडिया’ची वेबसाइट https://www.menstrupedia.com/