शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
2
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
3
"काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
4
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
5
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
6
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
7
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
8
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
9
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
10
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
11
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
12
वृषभ संक्रांती: ७ राशींवर सूर्यकृपा, नोकरी-व्यवसायात फायदा; पद-पैसा वृद्धी, लाभाचा काळ!
13
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
14
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
15
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
16
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप
17
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
18
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
20
Chaitra Amavasya 2024: वास्तूला आणि कुटुंबियांना कायम निरोगी ठेवण्यासाठी चैत्र अमावस्येपासून सुरू करा 'हे' व्रत!

मनाची घंटा वाजते, पण ती ऐकाल कशी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 5:54 PM

10 ऑक्टोबर, जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा झाला. ‘तरुणांच्या मानसिक आरोग्याची चिंता’ ही या दिनाची थीम होती. त्यानिमित्त, हा लेख, आपण आपल्याच मनाशी बोलावं म्हणून.

ठळक मुद्देमनातलं बोलायला सुरुवात केली पाहिजे. कदाचित एकदम जमणार नाही. आपल्याच मनाशी काय बोलायचं, इतरांशी काय बोलायचं, हे कळत नाही. पण ते जमतं. कसं? मोबाइलमध्ये आपण काहीतरी डाउनलोड करतो तसं! हळूहळू. एकेक करत बफर होताना पाहतो. शेवटी हवी ती गोष्ट डाउनलोड करून घेतोच! तसंच हे शिकायचं असतं. आपल्या डोक्यात डाउनलोड करून!

- प्राची पाठक

आपल्या आजूबाजूच्या सगळ्यांना चांगले मार्क्‍स मिळतात आणि पटापट भारीतल्या नोकर्‍या लागतात, असं आपल्याला वाटत असतं. मग ते  चटाचट ‘सेटल’ वगैरेही होतात. त्यांचं झटपट लग्न ठरतं, पटकन ते लग्न करून मोकळे! त्यांना मिळालेले जोडीदारसुद्धा भारीतलेच असतात. त्यांचं सगळं कसं शिस्तीत चालतं, एकदम करेक्ट मार्गानं आणि तेही सारं ‘वेळच्या वेळी’ होतं.आणि आपण? आपली गाडी कुठल्या आडरस्त्याला जाऊन खड्डय़ात पडते, कळत नाही. ट्रॅक सोडूनच चालते ती! इतरांची प्रगतीची फास्ट बुलेट ट्रेन असते आणि आपली कायम बैलगाडी.असं आपल्याला वाटतं का?असं येतंच ना मनात की,  ‘त्यांचं’ कसं सगळं मस्त सुरू आहे आणि माझं मस्त सुरू असतं. मग आपलंच असं का? आपलं का काही धड नाही!हे असं आलं ना मनात की, थांबू जरा. विचार करू. विचार करू की, खरंच असं आहे की इतरांचं सगळं भारी चाललंय नि आपलंच गाडं घसरलेलं आहे? जरा विचारू स्वतर्‍ला की आपण सारखंच दुसर्‍यावर भिंग रोखून का बसलो आहोत? त्यांचं भारी असेल किंवा नसेलही चाललेलं पण आपण आपल्या नजरेत भारी ठरायला करतोय तरी काय? कुठे कमी पडतोय आपण ते विचारू स्वतर्‍ला. मनात असूयेचा, तुलनेचा खेळ खेळत बसण्यात काही मजा नाही बॉस! आपल्या फोनमध्ये, क्लासमध्ये, जॉबच्या ठिकाणी आणि एकूणच आयुष्यात सतराशे साठ मित्न आहेत. भरलं घर आहे. तरीही आपण एकटे आहोत असं वाटतंय. दूर कुठेतरी पळून जावंस वाटतंय. असे विचार येतात ना मनात? इतके व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप, सततचे फॉरवर्ड्स काय कामाचे, जर ते आपल्याला आपण एकटं असल्याची भावना देत असतील तर? इतरांच्या आयुष्यात घडणार्‍या भारीतल्या घटना, त्यांचे झकास फोटोज, त्यांनी केलेल्या धमाल पाटर्य़ा निमूट बघत बसणं हेच काय आपलं आयुष्य आहे काय, वाटतं ना असं घरबसल्या? आपल्याला ज्या ग्रुपमध्ये शिरकाव हवा असतो, ते आपल्याला हिंग लावून विचारत नाहीत आणि जे आपल्यापाठी पडलेले असतात, त्यात आपल्याला काही मजा येत नाही. आपली मनातली घालमेल कायम ‘ते’ आपल्याला त्यांच्यात सामावून घेतील का, यासाठीच सुरू असते. फ्लॅशी असं काहीच नाहीये आपल्याकडे असंच सारखं वाटत राहतं. ‘त्यांनी’ आपल्याला त्यांच्यात घेतलं नाही की आपल्या आयुष्याला काही अर्थ उरला नाही, आपल्यात मजेदार असं काहीच नाही, आपली पर्सनॅलिटी धड नाही, असंही बरंच काय काय मनात यायला सुरुवात होते. जणू मनाचा ताबा घेऊन टाकतात हे विषय. दुसरं काही सुचत नाही. झोप उडते. खाण्या-पिण्यावर लक्ष नसते. घरात काही बोलायची सवयच केलेली नसते. त्यामुळे घरातले अणि आपण दोन वेगवेगळ्या ध्रुवांवर चढून बसलेलो असतो. एकटेपण आणखीन वाढत जातं. जीव नकोसा होऊन जातो. त्यात शरीराचं काही वेगळंच सुरू असतं. कधी आपल्या आवाक्यातले केमिकल लोचे असतात, तर कधी आपल्या समजेच्या बाहेरचे आणि नकळत घडणारे. तरुण रक्तच शेवटी. सळसळणारे; पण एकदम हताश सुद्धा होणारे. चटकन धीर सोडून देणारे.  अशा कोणत्याही एकटं पाडणार्‍या क्षणी आपल्या मनातली धोक्याची घंटा वाजली पाहिजे मोठय़ानं. तिचा आवाज आपण नीट ऐकला पाहिजे. मनातलं बोलायला सुरुवात केली पाहिजे. कदाचित एकदम जमणार नाही. पण जसे मोबाइलमध्ये काहीतरी डाउनलोड करताना आपण जे जसं समोर येईल, तसतसं हॅण्डल करत जातो, एकटय़ानं प्रयत्न करत जातो आणि शेवटी हवी ती गोष्ट डाउनलोड करून घेतोच, तसंच हे शिकायचं असतं. आपल्या डोक्यात डाउनलोड करायचा, आपल्याच मनाच्या आरोग्याचा विषय! केवळ मोकळेपणी मनातले बोलायला शिकण्यानं आपल्या मनातल्या अनेक कचकची दूर होऊ शकतात. उगाच एवढय़ा-तेवढय़ा कारणांनी झोप उडायची, निराश व्हायची, तहानभूक विसरायची गरज नसते, ते आपल्याला स्वानुभवातून कळायला लागतं. आपल्यासाठी सगळ्यात सुरक्षित असा शेअरिंगचा वाटा आपल्याच घरात उचलला जाऊ शकतो. सध्या असं कोणी नसेल तर हळूहळू तसे नाते डेव्हलप करायची जबाबदारीसुद्धा आपलीच असते. कोणाशी बोलून आपल्याला छान वाटतं, बरं वाटतं असं आपल्याला वाटतं, ते शोधायचं. त्या व्यक्तीच्या सोयीनुसार दोन घटका मागून घ्यायच्या आणि बोलून टाकायचं जे असेल ते. घरात, विस्तारित कुटुंबात असे संवादाचे चॅनल सुरू झालं तर फारच उत्तम असतं. त्यांना आपल्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आपण न सांगता माहीत असतात. आपल्यासाठी मदतीला धावून येणार्‍यांमध्ये हे असे काही लोक असतात. त्यापलीकडे मग आपले मित्न-मैत्रिणींचे विश्व असतं. तिथंही अगदी दिलखुलास बोलता येईल, असे कोणी असतात. शेजारपाजार्‍यांमध्ये सुद्धा असा मनाचा सोबती कोणी सापडू शकतो. परंतु, कुठेच कोणीच आपल्यासाठी नाहीतच, अशी आपली खात्नीच झालेली असेल तर एखाद्या मानसतज्ज्ञाला, समुपदेशकाला जरूरच गाठावं. आपल्या शरीराला आपण चांगलं ठेवायचा बर्‍यापैकी प्रयत्न करतो. भारीतले कपडे, शूज, गॉगल वगैरे वापरतो. आवडीचे काही खातो, बघतो. नटतो, मुरडतो. मनाच्या सव्र्हिसिंगचं काय करतो? चालता चालता ठेच लागली, रक्त आलं तर आपण जितक्या सहज त्यावर उपचार करतो, डॉक्टरकडे जातो, तितक्याच सहज मनाला लागलेली ठेच बघतो का? त्यावर उपाय करतो का? मनाचे आरोग्यसुद्धा आपल्या अजेंडय़ावर ठेवलं पाहिजे. त्याविषयी बोललं पाहिजे. टेनिस खेळताना टेनिस एल्बो होतो, हात दुखतो, हे आपण जितके सहज हातावर बॅण्ड बांधून आणखीन स्टाइलमध्ये इतरांना दाखवत असतो, तसंच अगदी दाखवलं नाही तरी मनाच्या दुखण्या-खुपण्यावरदेखील सहजच उपाय केले पाहिजेत. करता येतात, हे मनाशी तरी ठेवलं पाहिजे!

*** 

मनाशी बोलायचंय?त्यासाठी काय काय करता येईल?

* मनातलं बोलायचं आहे, हे स्वतर्‍ला बजावणं ही पहिली टीप. * दुसरी टीप म्हणजे मनातलं बोलायची सवय करणं. मनात नेमकं बिनसलं काय, ते नीट मांडता येणं. त्यासाठी ते आपल्याला पुरेसं समजलेलं असणं महत्त्वाचं.*आपल्या आयुष्यात प्रत्यक्ष समोर असतील असे कोणी, ज्यांच्याशी आपण मोकळेपणी बोलू शकू आणि आपली गुपिते तिथे सुरक्षित राहतील असे आपल्याला वाटतं त्यांच्याशी छान नातं डेव्हलप करायचं. त्यात त्यांची सोयसुद्धा बघायची. नाहीतर, मी निवडले ना यांना, तर यांनी वेळ दिलाच पाहिजे, मैत्नी केलीच पाहिजे माझ्याशी अशी सक्ती नको. ही तिसरी टीप. * ठरावीक दिवसांनी स्वतर्‍लाच विचारायचं, काय बाबा, कसं सुरू आहे तुझं? सगळं ठीक ना? जेवण खाणं, झोप, व्यायाम, हाताला-डोक्याला पुरेसे काम आहे ना? रूटीन कसं सुरू आहे? त्यात काय सुधारता येईल? करायची आपलीच एक चेक लिस्ट आणि ती अधिकाधिक उत्तमरीत्या फॉलो करत जायचं.*तरीही आपल्या आवाक्यात नाहीये काही, सतत काहीतरी खुपतं आहे, एकटं वाटतं आहे, जीव नकोसा झालाय, असंच सारखं वाटत राहिलं तर जवळचा समुपदेशक नक्कीच गाठायचा. त्यात जराही कमीपणा बाळगायचा नाही. पोट दुखले- गोळी घेतली, हे जितकं सहज असतं तितकंच सहज मन दुखलं, उपाय केले असं मानायचं.* दुसरं कोणी अशी मदत घेत असतील त्यांच्यासाठी, तर त्यांनाही न हसणं, वेडं न ठरवणं हीसुद्धा आपलीच जबाबदारी असते. त्यातूनच तर एक शरीर-मनानं सुदृढ समाज तयार होत असतो.* मनाच्या आरोग्याची धोक्याची घंटा वाजली की सावध तर व्हायचेच आणि तज्ज्ञांची मदतही घ्यायचीच. लगेच फरक जाणवेल आपला आपल्यालाच. जगायला नवा हुरूप येईल. लाइफ ट्रॅक सोडणार नाही. मग पुढचा प्रवास झकासच होतोय की!