शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

कैसाय बंटाईत? -भेटा धारावीतल्या जिगरबाज तारुण्याला!

By meghana.dhoke | Updated: October 17, 2019 11:31 IST

धारावीतल्या कामराज हायस्कूल आणि माटुंगा लेबर कॅम्पच्या अड्डय़ांवर बसून ‘लोकमत दीपोत्सव’ने शोधून आणली आहे एक ‘तरुण’ कहाणी! ..त्याबद्दल!!

ठळक मुद्देही पोरं धारावीत राहातात, धारावी हे त्यांचं घर आहे. ती सांगतात, ‘आय एक्झिस्ट’! मी आहे. मी असणार आहे.

-मेघना ढोके

गल्ली बॉय तुम्ही पाहिला असेल. नसेलही.पण या दोस्तांना भेटा.ही पोरं म्हणजे गल्ली बॉयमधला मुराद नाहीत.असतील त्याच्याच वयाचे किंवा काहीसे लहानही. विशीतले जेमतेम. मुरादइतकं इन्स्टण्ट यशही त्यांच्या वाटय़ाला येत नाही, आणि आपण मुरादसारखं झटकेपट पॉप्युलर व्हावं असंही काही त्यांच्या मनात नाही.मुळात त्यांची कुणाशी स्पर्धा नाही, ना त्यांना कुणाच्या पुढे जायचंय, ना त्यांना काही सिद्ध करायचं आहे.त्यांना फक्त सांगायचं आहे, ठणकावून. ‘आय एक्झिस्ट’! मी आहे. मी असणार आहे.तुम्ही असाल किंवा नसाल, मोठे असाल किंवा श्रीमंत असाल, मध्यमवर्गीय असाल नाही तर सोफिस्टिकेटेड असाल, स्कायस्क्रॅपर्समध्ये राहत असाल, सबर्बमध्ये राहत असाल नाहीतर सोबोमध्ये. तुम्ही कुणीही असाल, आम्ही तुम्हाला मोजतच नाही जा.आणि तुम्ही आम्हाला मोजावं, आम्हाला काही भलं म्हणावं, दया दाखवावी किंवा सहानुभूती दाखवावी किंवा आमचं काही भलं करावं अशी अपेक्षाही नाही आमची!तुम्ही तुमच्या जगात सुखात राहा, नाहीतर खड्डय़ात जा. वी डोण्ट केअर!व्हाय?बिकॉज वी आर लाइक धीस.आम्ही असेच आहोत आणि असेच राहणार आहोत.- कोण ही मुलं? कुठं राहतात? अशी उद्धट का बोलतात?- तर ती उद्धट नाहीत, स्पष्ट बोलतात. बेदरकार नाहीत, ते बेधडक आहेत. जोशात आहेत, बेहोशीत नाहीत!ते राहतात धारावीत.धारावी म्हटलं की काय येतं डोळ्यासमोर? आशिया खंडातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी. सर्वत्र दरुगधी. घाण. गल्लीबोळ. कलकलाट. आणि स्लमडॉग मिलेनिअरसह तमाम हिंदी सिनेमात पाहिलेलं वस्तीचं रूप.हे सारंच डोळ्यासमोर येतं कारण धारावी म्हणजे हेच सगळं असं माध्यमांनी आजवर ठसवलं आहे!पण हे म्हणजे धारावी नाही!!मग धारावी काय आहे?तर धारावी हे या तरुण मुलांचं घर आहे आणि आपण इथं राहतो याचा अभिमानच आहे, असं ते आता सार्‍या जगाला ठणकावून सांगत आहेत.त्यांच्या मनात अंगार, शब्दात आग आहे आणि अंगात लय आहे..ते आहेत रॅपर्स. हिपहॉपर्स.आणि त्यांचा पत्ता आहे, मुंबई 17.धारावीतल्या 70 फूट रोडवर कामराज हायस्कूलसमोर जाऊन उभं राहिलं किंवा माटुंगा लेबर कॅम्पमध्ये लावलेल्या ‘आय लव्ह धारावी’ या मोठय़ा बोर्डसमोर बैठकच मारली तर.- तर कदाचित भेटतात ही मुलं!पण त्यांना भेटणं सोपं नाही, कारण ते फार बिझी असतात. आपापल्या फोनमध्ये नजर घालून आणि कानात हेडफोन किंवा इअरफोनच्या वायरी घालून जगभरातलं रॅप ऐकत असतात. आपल्याच तंद्रीत असतात. एकेका शब्दाचा, एकेका बीटचा तासन्तास खल करतात.कुणी भेटलंच ओळखीचं तर आवाज देतात, ‘कैसाय बंटाईत? क्या सीन है?’त्यावर पलीकडचाही. ‘क्या मापूस’ म्हणून नमस्कार घालतो आणि जो तो आपापल्या कामाला लागतो.बंटाईत, मापूस ही खास धारावीतली भाषा, या शब्दांचा अर्थ होतो दोस्त!आणि हे दोस्त आता हिपहॉपचा हात धरून आपल्या जगण्याला शब्द देत आहेत. त्यांच्यात रॅपर्स आहेत, हिपहॉपर्स आहेत, बी-बॉयर्स आहेत आणि बीट बॉक्सर्सही आहेत.जगभरात हिपहॉपच्या जगात काय चाललंय याची त्यांना खडान्खडा माहिती आहे. ते बोलतात उत्तम इंग्रजी, मराठी, हिंदी, कानडी, तमीळ, तेलुगू आणि यासगळ्याची मिळून अशी बनलेली त्यांची अशी खास धारावीची भाषा.त्यांच्या या खास घडवलेल्या भाषेला मीडियावाले धारावी स्लँग म्हणतात हे या पोरांच्या डोक्यात जातं. ते म्हणतात तुमची ती भाषा आणि आमची ती स्लॅँग असं नाही चालणार. आम्ही येतो का तुमची भाषा सुधरवायला मग तुम्ही कोण आमच्या भाषेला आणि जगण्याला नावं ठेवणारे.?या तरुण रॅपर्ससह धारावीतल्या तारुण्यानंही आता आपण झोपडपट्टीत राहतो याचा खल मनात बाळगणं सोडून दिलं आहे!त्यांच्या आईवडिलांच्या पिढीत आपण गरीब, दुसर्‍यांच्या घरी राबणारे असं बिच्चारेपण होतं, या तरुण मुलांनी मात्र ठणकावून सांगायला सुरुवात केली आहे की, मुंबई चालते ती आमच्या कष्टांच्या जोरावर, आम्ही मेहनतीचं खातो, सव्र्हिस देतो, तुम्ही आम्हाला पैसे मोजता तर काही उपकार नाही करत, आम्ही नसलो तर हा मुंबईचा डोलारा डळमळेल!ते राहतात एकदम फॅशनेबल, रंगवलेले केस, टॅटू, कमावलेली शरीरं, गॉगल्स आणि तोंडात मसालेदार तडकामारू भाषा.आता त्याच भाषेत ते रॅप लिहू लागलेत.आपली सुख-दुर्‍ख रॅपच्या भाषेत मांडत जगभरातल्या वंचित आणि कष्टकरी वेदनांशी स्वतर्‍ला जोडून घेत खर्‍या अर्थानं ग्लोबल होत आहेत.रॅप ही त्यांची पॅशन आहेच, हिपहॉप श्वास आहे आणि त्याबळावर एक नवं जग त्यांना उभं करायचं आहे, जे त्यांना माणूस म्हणून स्वीकारेल. त्यांच्या जगण्याचा सन्मान करेल!आणि तो सन्मान नवीन जग त्यांना देणार नसेल तर नव्या जगाचा भाग होण्याचीही त्यांची इच्छा नाही.ते म्हणतात, हम अपनेमेंही एक दुनिया है!!त्या त्यांच्या दुनियेच्या पोटात शिरून, त्यांच्याशी गप्पा मारून, त्यांच्या रॅपच्या तालाशी ताल मिळवून बरेच दिवस कामराज हायस्कूल आणि माटुंगा लेबर कॅम्पच्या अड्डय़ांवर बसून एक खास कहाणी ‘लोकमत दीपोत्सव’ने शोधून आणली आहे र्‍मुंबई 17या पत्त्यावर जा आणि अनुभवा तरुण धारावी रॅपर्सचं भन्नाट, रसरशीत आणि जहाल जिवंत जगणं!  ‘दीपोत्सव’ या ‘लोकमत’च्या दिवाळी अंकात!

( लेखिका लोकमत वृत्तसमूहात मुख्य उपसंपादक आहेत.)meghana.dhoke@lokmat.com

***************

अंकाविषयी अधिक माहिती deepotsav.lokmat.comअंक कसा आणि कुठे मिळेल?1. ऑनलाइन खरेदी र्‍ deepotsav.lokmat.com2. व्हॉट्सअ‍ॅप मेसेज पाठवून प्रत मिळवा र्‍ 955-255-00803. ई-मेल र्‍ sales.deepotsav@lokmat.com4. स्थानिक वृत्तपत्र विक्रेत्याकडे मागणी नोंदवा

टॅग्स :lokmat deepotsavलोकमत दीपोत्सव