शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
5
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
6
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकड्यांचा फज्जा
7
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
8
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
9
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
10
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
11
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
12
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
13
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
14
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
15
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
16
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
17
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
18
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
19
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...
20
"पाय खूप सुजतात, नीट जेवणही नशिबात नसतं"; केदारनाथच्या पिठ्ठूची डोळे पाणावणारी गोष्ट

कॅन्सरच्या लढाईतली मेडल्स

By admin | Updated: May 20, 2016 11:02 IST

टाटा हॉस्पिटलच्या पोटात रेडिएशन विभाग होता. मोठ्ठाले लांबलचक पॅसेज पार करत रेडिएशन विभागात पोहोचलो तर एखाद्या बँकेत आल्यासारखं वाटलं. एक मोठी वेटिंग रूम होती. तिथंच बसून मी कॅन्सरमुक्त होण्याची वाट पाहू लागले. रेडिएशन हा माङया उपचाराचा शेवटचा टप्पा होता. त्यानंतर पुन्हा एकदा तपासणी झाली की टाटामधून माझी कायमची सुटका होणार होती. मी त्या दिवसाच्या दिशेनं पावलं टाकायला खरंतर कधीच सुरुवात केली होती.

कॅन्सर डेज्
 
ऐन विशीत कॅन्सरशी सामना करून मिळवलेल्या हिमतीची जिगरबाज गोष्ट
 
सर्जरी झाली आणि किमोथेरपीही संपली होती. रेडिएशन फक्त बाकी होतं. 
हत्ती गेला, शेपूट बाकी होतं. 
कॅन्सरची गाठ काढून टाकली होती. किमोथेरपीनंही कॅन्सरच्या पेशी नष्ट करण्यात आल्या होत्या. आता तरीही काही बाकी असेल तर अखेरचा वार म्हणजे रेडिएशन. सर्जरीच्या वेळी झालेली जखम (म्हणजे खिसा) अजून पूर्णपणो भरली नव्हती, त्यामुळे रेडिएशन सुरू करू नये, थोडं थांबावं असं डॉक्टरांनी ठरवलं. रेडिएशनसाठी मार्किग करून झालं होतं. आरशासमोर उभं राहिलं की छातीवरच्या उभ्या-आडव्या काळ्या रेषा दिसायच्या. या रेषांचा आणि रेडिएशनचा काय संबंध असणारे, अशा विचारात मी तासन्तास गढून जायचे. रेडिएशनच्या साइड इफेक्टची डॉक्टरांनी कल्पना दिली होती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रेडिएशन घेताना काहीही दुखणार नाही, सुई टोचणार नाही अशी हमी डॉक्टरांनी दिली होती. त्यामुळे मी भलतीच खुशीत होते. इनफॅक्ट थोडी एक्सायटेड होते. 
टाटा हॉस्पिटलच्या पोटात रेडिएशन विभाग होता. मोठ्ठाले, लांबलचक पॅसेज पार करत पहिल्या दिवशी मी आणि बाबा रेडिएशन विभागात पोहोचलो, तेव्हा एखाद्या बँकेत आल्यासारखं वाटत होतं. ब:यापैकी मोठी अशी वेटिंग रूम होती. भरपूर टय़ूबलाईट्स, पंखे आणि टीव्ही बघत असलेले पेशंट्स. मला तर आवडली ती वेटिंग रूम. प्रत्येकाच्या हातात एक टोकन होतं. आणि भिंतीवर डिजिटल स्क्र ीन. नंबर स्क्र ीनवर झळकल्यावर पेशंट उठून काउंटरवर जाई. टोकन जमा करून रेडिएशन रूममध्ये जाई. बँकेतील कॅश घ्यायची सिस्टीम असते तशीच. इथले पेशंट्स विशेष त्रसलेले मला तरी दिसले नाहीत. ते सगळे हसत होते, एकमेकांशी गप्पा मारत होते. कारण रेडिएशनचे उपचार वेदनारहित होते. (निदान माङो तरी होते.) दिवसभर हॉस्पिटलमध्ये थांबावं लागत नव्हतं. त्यामुळे असेल कदाचित. 
मी टोकन घेऊन बसले. दहा मिनिटात माझा नंबर आला. मी अवाक्. इतक्या लवकर नंबर! बाबांनाही हे अपेक्षित नव्हतं. ते एक डुलकी काढण्याच्या बेतात होते. आम्ही दोघे धावतच काउंटरपाशी गेलो. आमच्या चेह:यावरचा आनंद पाहून तिथल्या माणसाच्या चेह:यावर आश्चर्य उमटलं. मी रेडिएशन रूममध्ये गेले. बाबा बाहेरच थांबले. एक मोठ्ठी थंडगार, काळोखी खोली होती आणि त्या काळोखात एक भलमोठं यंत्र गुपचूप उभं होतं. मी कपडे बदलले. एक मावशी आल्या. त्यांनी मला हात कुठे धरायचे, मान कुठे वळवायची सगळं समजावून सांगितलं. मी तसं केलं. त्या गेल्या. खोली बंद. मी आणि थंडगार मशीन. दोघंच. मग मशीनचा लाईट लागला. ते मशीन सुरू झालं. काही किरणं माङया शरीराच्या आरपार जाऊ लागली. 
ओह!! असं असतं रेडिएशन! माझं कुतूहल शमण्याआधीच मशीन थांबलं. ‘झालं’ कुणीतरी म्हणालं. मी मनात म्हटलं, वावॅ दॅट्स इट! 
 मी आणि बाबा घरी आलो. मी बाबांना म्हटलं, हे इतकं कमी वेळ चालणारं असेल तर तुम्ही नका येऊ रोज. मी येईन एकटी किंवा काकू, बहीण, बाकी दोस्त मंडळी आहेतच की. बाबा बरं म्हणाले. सोमवार ते शुक्रवार असं वीस-पंचवीस दिवस रेडिएशन घ्यायचं होतं. मी रोज वेगवेगळ्या पर्यटकांना (काकू-बहीण, बॉयफ्रेंड, दोस्त कंपनी) बरोबर घेऊन टाटा दाखवायला जायचे. रेडिएशन रूम, ब्रेस्ट ओपीडी, इथे औषधं मिळतात, इथे ब्लड टेस्ट होते, इथे चांगली कॉफी मिळते असे साईट सीन करत आमचं रेडिएशन चालायचं. एकदा तर मैत्रीण म्हणाली की, मी गाडी पार्ककरून येते, तू जा पुढे. तिला पार्किंग मिळून ती टाटाला पोहोचेर्पयत माझं रेडिएशन संपलं होतं. इतकं क्विक. 
रेडिएशनचे साईड इफेक्ट तसे मायनर होते किंवा किमोच्या साईड इफेक्ट्सपुढे ते फिके पडले. रेडिएशन संपेर्पयत मार्किंग केलेल्या भागाला पाणी लागू द्यायचं नव्हतं. त्यामुळे अर्धीच अंघोळ करायची होती. दोन-तीन दिवसांनी रेडिएशन दिलेली त्वचा लालसर दिसू लागली. जसजसं रेडिएशन वाढू लागलं तसतसा त्वचेचा रंग बदलू लागला. आधी लालसर दिसणारी त्वचा हळूहळू मरून, ब्राऊन अशा शेड्सचा प्रवास करत करत शेवटी काळी ठिक्कर पडली. अर्धी छाती गोरी आणि अर्धी काळी. मला मी बुद्धिबळाचा पट असल्यासारखं वाटतं होतं. मग त्या काळ्या पडलेल्या त्वचेचे हळूहळू पापुद्रे सुटू लागले. मला ते हलक्या हातानं काढायचं काम आवडू लागलं. पाणी पिताना घोट घशात अडकू लागला. स्वत:च्या अंगातून गरम झळा बाहेर पडताहेत असं वाटायचं; वाटायचं काय, तशा गरम झळा बाहेर पडतच होत्या. शरीराचं तपमान एकदम वाढलं. मला मी सूर्य असल्यासारखं वाटतं होतं. उकाडा सहन करण्याची कपॅसिटी कमी झाली. रेडिएशन संपल्यावर त्वचा पूर्ववत झाली. पण आजही पाणी पिताना घोट अडकतोच. रेडिएशनसाठी केलेल्या मार्किंगच्या गोंदवलेल्याच्या खुणा आजही माङया  त्वचेवर आहेत. कॅन्सरबरोबरच्या माङया लढाईत, मला मिळालेल्या मेडल्ससारख्या. रेडिएशन हा तर माङया  ट्रिटमेंटमधील शेवटचा टप्पा होता. रेडिएशननंतर माङो उपचार संपणार होते. मी कॅन्सरमुक्त होणार होते. म्हणून खरंतर हा रेडिएशनचा काळ मी खूप एन्जॉय केला. रेडिएशन संपल्यानंतर माङो सगळे रिपोर्ट पुन्हा एकदा कसून तपासले जाणार होते. माझी तपासणी होणार होती. नंतरच टाटामधून माझी कायमची सुटका होणार होती. मी त्या दिवसाच्या दिशेनं पावलं टाकायला खरंतर कधीच सुरुवात केली होती. आता मी वाट पाहत होते त्या अखेरच्या पावलाची आणि अखेरच्या दिवसाची. 
 
- शची मराठे
shachimarathe23@gmail.com
 
( कॅन्सरशी यशस्वी लढा देऊन आशावादी जगणं जगणारी शची ही एक मुक्त पत्रकार आहे. आणि न्यूज चॅनलमध्येही तिनं काम केलेलं आहे.)