शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

सागरी कासवांचे जिगरी दोस्त

By admin | Updated: April 3, 2017 18:47 IST

कासवांच्या संवर्धनासाठी नोकरीही सोडली..

सागरी कासवांचे सागरी पर्यावरणातले अनन्यसाधारण महत्त्व वेगळे सांगायला नको. मात्र संपुर्ण जगात कासवांना मारले जाते, त्यांची अंडी पळवली जातात त्यामुळे सागरी कासवे धोक्यात आली आहेत. सागरी पर्यावरणही त्यामुळे मोठ्या प्रमाणात धोक्यात आले आहे. मात्र कासवांना वाचवण्याचा वसा कोकणांत काही तरुणांनी घेतला आहे. मोहन उपाध्ये व अभिनय केळस्कर ही त्यातील आघाडीची नावं. त्यांच्या प्रयत्नांमुळे कासवांची हानी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे आणि लोकांमध्येही जनजागृती होते आहे. त्यानिमित्त पाच एप्रिल रोजी त्यांनी ‘कासवमित्र’ पुरस्कारानं गौरविण्यात येणार आहे. 
त्यांच्या प्रयत्नांची ही कहाणी..
‘सह्याद्री निसर्ग मित्र’, चिपळूण ही संस्था 
कासवांच्या संरक्षण, संवर्धनासाठी सुमारे पंधरा वर्षांपासून काम करीत आहे. २००२-०३ साली सह्याद्री निसर्ग मित्रने वनविभागाच्या सहकार्याने काम चालू केले. आज सदर मोहिम यशस्वी होताना दिसत आहे. २००२ ते २०१३ सालापर्यंत सह्याद्रीच्या वतीने महाराष्ट्रातील ८० गावांमध्ये सदर मोहिम राबवण्यात आली. यासाठी वनविभागाचा मोलाचा पाठिंबा होता. कासवांची अंडी चोरणाºयांनाच प्रशिक्षण देऊन त्यांना संवर्धनाच्या कामात जोड्ण्यात आले, हे संस्थेचे सर्वात मोठे यश.
 
कासव संवर्धनासाठी कोकणातील वेळास येथे कासव महोत्सवही चालू करण्यात आला. तसेच त्यांच्या होस्टेलचीही सुरूवात करण्यात आली. दहा वर्षाच्या यशस्वी कामानंतर सदर मोहिम सातत्याने शाश्वत स्वरूपात चिरकाळ चालावी यासाठी ती स्थानिक लोकांच्या ताब्यात देण्यात आली. वनविभागाच्या सहकार्याने तसेच स्थानिक ग्राम पंचायतीमुळे ती यशस्वी होत आहे. 
सागरी कासव संवर्धनाचे हे काम १५ वर्षे सातत्याने चालू आहे. संपूर्ण महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर या कामातून कासवांची एक हजारहून अधिक घरटी संरक्षीत करण्यात येऊन ४५ हजार पेक्षा जास्त पिल्ले समुद्रात सोडण्यात यश आले आहे. 
कासवांच्या संवर्धनात काही तरुणांचा मोठा सहभाग आहे. कासवाचे एकही अंडे चोरीला जाऊ नये किंवा कासवांची शिकार होऊ नये, जन्माला आलेली पिले पुन्हा समुद्रात जावीत यासाठी या तरुणांनी कायम संघर्ष केला आणि जीवतोड मेहनत केली. त्याचं प्रत्यंतर आता येऊ लागलं आहे. 
त्यांच्या याच कामानिमित्त दोन कासवमित्रांना निसर्ग संवर्धन मंडळाने कासव मित्र पुरस्कारानं गौरवित करण्याचं ठरवलं आहे. 
वेळास येथील मोहन उपाध्ये व आंजर्ला येथील  अभिनय केळस्कर यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. सदर पुरस्कार पाच एप्रिल रोजी आंजर्ला येथे होणाºया एका विशेष कार्यक्र मात प्रदान करण्यात येणार आहे. रोख रु पये पाच हजार, मानपत्र व स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
कासवांच्या संवर्धनासाठी मोहन उपाध्येनं तर मुंबई येथील नोकरी सोडून तो वेळास मध्ये परत आला. वेळासमधील ग्रामस्थांना बरोबर घेऊन नवनवीन कल्पना अमलात आणल्या. वेळास बरोबर आजुबाजूच्या गावात कासव संरक्षण यशस्वी केले. वेळासचा कासव महोत्सव व होमस्टे या सर्व कामात त्याचा पुढाकार होता.
अभिनय केळस्करनं २००६ साली आंजर्ले येथे सह्याद्रीच्या कासव संरक्षण मोहिमेत सहभाग घेतला. कामामध्ये सातत्य दाखवुन आजुबाजूच्या गावातसुद्धा कासव संरक्षण यशस्वी केले. आंजर्ले येथे गेल्या वर्षीपासून कासव महोत्सवास सुरु वात केली. या सर्व कामात त्याने ग्रामस्थ्यांना बरोबर घेतले.
 
या सर्वच गोष्टींचा विधायक परिणाम होऊन कासवांच्या संख्येत वाढ होत आहे. 
या दोन्ही तरुणांच्या धडपडीमुळे आणखीही तरुण कासव संवर्धनाच्या कामात ओढले गेले आहेत.