शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

बराक ओबामांचे ट्विटर अकाउंट  हॅक झाले  आणि ...   

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 16:20 IST

भल्याभल्यांचे अकाउण्ट्स हॅक करून हॅकर्सने ट्विटरवर धुमाकूळ घातला आहे. आर्थिक हेराफेरीही केली, आणि ट्विटर सिक्युरिटीचे प्रश्न पुन्हा उपस्थित झाले.

ठळक मुद्देहॅकर्सचा ट्विटरला तडाखा

- प्रसाद ताम्हनकर

बिटकॉइन करन्सीच्या घोटाळ्यासाठी अलीकडेच बिल गेट्स आणि बराक ओबामा यासारख्या सेलिब्रिटीची ट्विटर अकाउण्ट्स हॅक करून वापरण्यात आली. चक्क हॅक झाले त्यांचे अकाउण्ट्स. बिल गेट्सच्या खात्यावर तर हॅकरने पुढील मजकूर ट्विट केला होता, ‘प्रत्येकजण मला सांगतो आहे की मी जितके काही कमावले, ते आता समाजाला परत देण्याची वेळ आली आहे, म्हणूनच मला तुम्हाला सांगायचे आहे, की पुढच्या तीस मिनिटांत मला ज्यांच्या ज्यांच्याकडून पैसे पाठविलेले जातील, त्यांना मी दुप्पट पैसे मी परत करीन. तुम्ही 1000 डॉलर्सच्या बिटकॉइन पाठवाल तर मी 2000 डॉलर परत पाठवीन.’ असं ट्विट जर बिल गेट्सच्या अकाउण्टरवरून झालं तर लोकांचं, त्यातही फशी पडणा:या लोकांचं काय झालं असेल, कल्पना करा.आतार्पयत उपलब्ध माहितीनुसार, हॅकरने या ट्विटर खात्यांच्या हॅकिंगनंतर  एकूण 373 आर्थिक  व्यवहार केले आहेत.ही खरं तर लुबाडणूकच म्हणायला हवी.  एकाच वेळी अशी 13क् ख्यातनाम व्यक्तींची खाती हॅक झाल्यानंतर संपूर्ण जगाचे डोळे सध्या मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरकडे लागले आहेत. 

पुन्हा एकदा हे सोशल व्यासपीठ आरोपीच्या पिंज:यात उभे आहे. नुकतेच अॅपल या टेक जायंट कंपनीच्या ट्विटर हॅण्डलसह बिल गेट्स, बराक ओबामा, अमेरिकेचे अध्यक्षपदाचे उमेदवार जो बिडेन, उबर, टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलोन मस्क यांच्यासह 13क् हाय प्रोफाइल ट्विटर अकाउण्ट्स टार्गेट करण्यात आले. ते हॅक झाले.या हॅकिंगनंतर भारत सरकारच्या सायबर सिक्युरिटी एजन्सी सर्ट-इननेदेखील ट्विटरकडून या हॅकिंगची माहिती मागितली आहे. लवकरात लवकर स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. या हॅकिंगमध्ये बळी पडलेल्या भारतीय ट्विटर वापरकत्र्याविषयी योग्य ती माहिती देण्यासाठी एजन्सीने ट्विटरला सांगितले आहे. याव्यतिरिक्त, एजन्सीने ट्विटरवरून अशा भारतीय ट्विटर वापरकत्र्याविषयीहीदेखील माहिती मागितली आहे, ज्यांनी या हॅकिंगनंतर या हॅक झालेल्या ट्विटर अकाउण्ट्सवरून करण्यात आलेल्या ट्विट्समध्ये देण्यात आलेल्या लिंकला भेट दिली आहे. मात्र या गदारोळानंतरही ट्विटरने अद्याप या संदर्भात भारत सरकारला कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. अर्थात याबद्दल ट्विटर भारत सरकारला माहिती देत नसली तरी या हॅकिंगबद्दल रोज नवीन नवीन खुलासे समोर येत आहेत. हे हॅकिंग कसे घडले याबद्दल अद्याप ट्विटर अचूक माहिती देऊ शकलेले नाही. ट्विटरने म्हटले आहे की या हॅकिंगमध्ये सुमारे 13क् खात्यांना लक्ष्य केले गेले आहे. हॅकरला खात्यांचा पूर्ण अॅक्सेस मिळाला होता, ज्याचा फायदा घेऊन त्याने या खात्यांचा वापर करून ट्विट केले आणि लोकांना बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवले. या हॅकिंगकांडानंतर आता ट्विटर कंपनीने वापरकत्र्याना त्यांचा डाटा डाऊनलोड करण्यासही बंदी घातली आहे. ट्विटरने खुलासा केला आहे, की या हॅकिंगमध्ये ज्या 13क् सेलिब्रिटी खाती हॅक झाली, त्यापैकी आठ वापरकत्र्याचा अकाउण्ट डेटा डाऊनलोड करण्यात झाला आहे. याशिवाय हॅकर्सनी यापैकी 45 खात्यांचे पासवर्डदेखील रिसेट केले आहेत.ट्विटरने म्हटले आहे की, हॅकरने मेसेजेसर्पयतच्या डेटासह इतरही सर्व डेटा डाऊनलोड करण्यासाठी आपले  युअर ट्विट डेटा टूल हे साधन वापरले आहे. यापूर्वी या विषयावर माहिती देताना ट्विटरने म्हटले होते, की वापरकत्र्याची खाती हॅक करण्यासाठी त्यांच्या पासवर्डसचा वापर केल्याचा कोणताही पुरावा अद्याप मिळालेला नाही. अशा परिस्थितीत प्रत्येक यूजरने आपला पासवर्ड बदललेलाच पाहिजे असे म्हणता येणार नाही. ट्विटरने असेही म्हटले आहे की, गेल्या 30 दिवसांत ज्या यूजर्सनी आपले पासवर्ड बदलण्याचा प्रयत्न केला आहे त्या सर्व खात्यांना ट्विटरने तात्पुरते लॉक केले आहे.

(प्रसाद विज्ञानविषयक लेखक/पत्रकार आहे.)