शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
4
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
5
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
6
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
9
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
10
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
11
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
12
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
13
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
14
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
15
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
16
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
17
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
18
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
19
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
20
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी

प्रेम = स्ट्रेस! हा कुठला प्रेमाचा नवाच घोळ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 7:00 AM

प्रेमात पडणं म्हणजे फक्त सेल्फी काढणं आणि रिलेशनशिप स्टेट्स बदलणं नव्हे, त्यापलीकडे या नात्याचा काही विचारच होत नाही आणि मग प्रेमात पडून स्ट्रेसने जीव नको केलाय असं अनेकजण सांगतात. त्यांचं खरंच असतं एकमेकांवर प्रेम? की नुस्ता प्रेमाचा आभास? त्यांना नेमका स्ट्रेस कशाचा येतो?

ठळक मुद्देप्यार का इमोशल लोचा हे कोणतं नवीन समीकरण जुळवतंय?

प्राची पाठक    

माझं व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्स पाहिलं नाही?- तू माझ्याकडे मुद्दाम दुर्लक्ष करतोस. माझ्या डीपीला भारी म्हटलं नाही?तुला माझं काहीच आवडेनासं झालंय. तुझ्या डोक्यात वेगळं काही सुरू असेल, लक्षात येतंय मला.मी मेजेस केला की ते ब्लू टिकमार्क अलीकडे खूप उशिराने दिसतात. माझे मेसेजेस तू चटकन वाचत नाहीस. आधीसारखी उत्तरं देत नाहीस.. मला सध्या जास्त पॅकेज नाही जॉबमध्ये, म्हणून तू असं वागत आहेस.मी सांगितलेला ड्रेस मुद्दाम घालत नाहीस तू, कळतंय मला.     ****ही वाक्यं कोण कुणाला म्हणाली हे महत्त्वाचं नाही, महत्त्वाचं आहे ही वाक्यं अलीकडे सतत बोलली जातात. ‘ऑक्सिजन’साठी लेखमाला लिहीत होते तेव्हा अनेकजण आपल्या प्रेमातल्या ताणतणांबाबत हेच सारं लिहून पाठवायचे. हे ‘असं’ वागणं आहे, माझ्यासाठी वेळच नाही, आम्ही ब्रेकअप करू का वगैरे सल्ले विचारायचे.ते विचारणार्‍यांच्या मनात एक ना अनेक लहानमोठय़ा शंका असतात. आपण ज्याच्या प्रेमात आहोत त्याच्या प्रत्येक कृतीविषयी, वागण्याबद्दल काहीतरी मत तयार झालेलं असतं. या सर्व शंका मनात येतात आणि मग त्यामुळे आधी सुरळीत असलेलं नातं कुरतडायला लागतं असं अनेकजण सांगतात.  आधी सगळं नीट सुरू होतं. हे हे आणि हे अमुक ढमुक घडलं म्हणून सगळं हातातून जात चाललं आहे, अशी फिलिंग मनात येते. माझी किंमत तुला दाखवूनच देईन, असे खेळ मनात सुरू होतात. प्रत्येक कम्युनिकेशनमध्ये मला कसं वागवलं, नीट भाव दिला की नाही, नीट वेळ दिला की नाही, यावर मनात आपलीच मतं, नात्यातली असंख्य गणितं, हेवेदावे, शंका- कुशंका यांचं तांडव नृत्य सुरू होतं. ठरवून वेगळं वागणं सुरू होतं. मनात जे सुरू असतं, ते समोर दाखवायचं नाही, नीट मनमोकळं बोलायचं नाही. वरतून, समोरच्याने काय करावं, कसं वागावं याची आपल्या सोयीनुसारची भली मोठी जंत्नीच सतत तयार असणं.हे सारं असं असेल तर त्या नात्यामध्ये तेढ निर्माण होईल नाहीतर काय?आणि त्याचा परिणाम काय होतो?मग येतो तो स्ट्रेस. मला वाटतंय तेच खरं आहे, असं जाणवून देणारी एखादी घटना घडली, तरी आधी एकदम ‘जनम जनम का साथ’ वगैरे वाटलेलं नातं पटरीवरून खाली घसरतं. मग ते घरात गुमसुम वगैरे बसून राहणं, काहीच सुचेनासं होणं, काही करावंसं न वाटणं, झोप उडणं, भूक उडणं सगळं चक्र  आलंच. निमित्त काय असतं, तर माझ्या मेसेजला ब्लू टिक उशिरा आल्या. त्या त्या वेळी ते ते कारण अतिशय महत्त्वाचं आणि अतिशय मोठ्ठं असतंसुद्धा. पण नंतर मात्न हे आपल्याच मनात फुगवलेलं कारण असू शकतं कदाचित, अशीही विचारांची गाडी जराशी फिरून यायला हवी. नसेल वेळ मिळाला, वेळ मिळूनही नसेल वेळेत उत्तर द्यायला जमलं, वाट पाहू जरा किंवा चक्क स्पष्ट बोलूनच सॉर्ट आउट करून घेऊ हे सगळं असं सारं बोलणं होतंच नाही. बोलणं झालं तर डायरेक्ट आरोप आणि भांडणंच. कारणं नाहीच डायरेक्ट निकालच.आणि त्यामुळे होतं काय की मनातला कडवटपणा वेगाने वाढत जातो. त्यात आणखीन आपल्याच मनात ठाण मांडून बसलेल्या शंका-कुशंका- दुसर्‍याकडूनच्या अपेक्षा आणि स्वतर्‍चं ते सर्व बरोबरच आहे, असं ठामपणे वाटणं. फारच केमिकल लोचा होऊन जातो हा! त्यामुळे प्रेमप्रकरण असो नाहीतर प्रेमभंग काही गोष्टींची उत्तरं आपण आपल्याला द्यायला हवी. म्हणजे अतिरेकी घुसमट आणि अतिरेकी स्ट्रेस हे टाळता येऊ शकेल.या मुद्दय़ांचा नीट विचार केला, तर नात्यांमधला अनावश्यक स्ट्रेस कमी व्हायला नक्कीच मदत होईल. जरा लार्जर, बिगर आणि  बेटर आयुष्य आपण समजून घेऊ शकू. छोटय़ा छोटय़ा गोष्टी आणि लहान सहान मुद्दे कुरतडण्यापासून जरा दूर जाऊ ! मुळात आपलं एकमेकांसोबत जमतंय ते का याची चांगली स्पष्टता येईल. हा सगळा ‘केमिकल लोचा’ एकमेकांच्या प्रगतीसाठी वापरता येईल !प्रेमानं जगणं समृद्ध करावं ते नैराश्याच्या टोकावर नेणार असेल तर ते प्रेम आहे का?या प्रश्नासह आणखी काही हे प्रश्न स्वतर्‍ला विचारून पहा.* मुळात कोणी आपल्याला कसं आणि का क्लिक होतं याचा तरी नीटसा विचार केलेला असतो का? * अमुक व्यक्ती आपल्याला आवडते, तर का आवडते? आपण तिला आवडतो का? *या आवडीनिवडी पलीकडे आयुष्य बरंच मोठं आहे, तर त्यातले काय काय आपण एकमेकांच्या साथीने एकमेकांसाठी करू शकतो? * आपलं शिक्षण, आपलं करिअर, आपल्या सवयी आणि आपल्याला आवडणारी व्यक्ती याबद्दल किती स्पष्टता आहे आपल्या मनात? * आपल्याला आवडणार्‍या व्यक्तीच्या साथीने आपण काय-कसं जगणार आहोत, याबद्दल विचार करतो का आपण? * केवळ आता कुणीतरी आवडलं आहे ना कोणी मग आता आपले सेल्फी कसे येतात आणि कोणी आपलं स्टेट्स पाहिलं/न पाहिलं, मला काय खायला आवडतं आणि समोरच्याला काय आवडत नाही, यासारख्या साध्या-क्षुल्लक गोष्टींवरून आपण आवडलेल्या माणसांना जोखत राहणार आहोत का? * सिनेमांत दाखवतात तसं तू माझ्याकडे पाहिलं आणि मी तुझ्याकडे पाहिलं, म्हणून प्रेम म्हणायचं का त्या नात्याला? * नेमकी काय आहे आपली प्रेमाची व्याख्या, कधी विचार केलाय? * बरं सगळं व्याख्येत बसलेलं असूनसुद्धा स्ट्रेस का वाटतोय मग? का येतात मनात अनेक शंका-कुशंका? पक्का विश्वास का वाटत नाही समोरच्यावर? प्रत्येक गोष्टीत ‘तो असा असता तर’ आणि ‘ती तशी असती तर’, अशी हातघाईची लढाई का होतेय?* आपलं नातं एक छान बुके का नाही होऊ शकत? एक फूल माझं - एक तुझं असं? म्हणजे प्रत्येकाचं वेगळं अस्तित्व आहेच आणि सोबत येऊनसुद्धा आणखीन काही सुंदर समृद्ध व्हायची शक्यता असलेलं?  विचार तर करा.. 

( लेखिका मानसशास्त्राच्या अभ्यासक आहेत.)