शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

प्रेमाचा हार्मोनल लोचा नेमका कसा होतो?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 05:55 IST

आपण प्रेमात पडलोय, शारीरिक आकर्षण आहे, असं कितीही वाटलं तरी जरा जपून, कारण?

ठळक मुद्दे कुणीतरी आवडलो आणि आपण पाहताक्षणी प्रेमात पडलो असंही सोपं हे गणित नाही.

-डॉ. यशपाल गोगटे

प्यार किया नहीं जाता, हो जाता है, असं किती सहज म्हटलं जातं.वयात येताना तर प्रेमात पडणं, कुणाविषयी आकर्षण वाटणं, आवडलेल्या माणसांचा डीपी किंवा फेसबुक प्रोफाइल तासंतास पाहत राहणं, दुसरं काहीच करावंसं न वाटणं.हे सारं किती रोमॅण्टिक वाटतं. मात्र प्रेमात पडणं किंवा आकर्षण वाटणं म्हणजे मनाचा नाही तर शरीराचा केमिकल लोचा असतो, आणि त्याकाळात आपण त्या लोचामुळे भलभलते निर्णय घेतो, हे माहिती असलेलं बरं. जरा कोरडी वाटेल ही माहिती, कारण प्रेमात पागल झालेले लैला मजनू आपल्याला माहिती असतात, मात्र या केमिकल लोचाविषयी आपल्याला काहीच माहिती नसतं, त्यामुळे आपण प्रेमात पडलोय, शारीरिक आकर्षण वाटतं आहे म्हणजे नक्की काय होतं आहे हे कळतही नाही. प्रेमाचं वेड मात्र असंच लागत नाही, कुणीतरी आवडलो आणि आपण पाहताक्षणी प्रेमात पडलो असंही सोपं हे गणित नाही. प्रेमाचं हे वेड लागतं, त्याला कारणीभूत असतात आपल्या शरीरातले हार्मोन्स.आणि ते हार्मोन्स केमिकल लोचा करतात आणि मग प्रेमात पडल्यासारखं वाटतं. प्रेमात पडणं, प्रेमानं एकत्र, जोडीने राहणं ही भावना मुख्यतर्‍ सस्तन प्राणी व पक्षी यांच्यात आढळते. आणि या प्रेमळ भावनेसाठी जवाबदार असलेलं हार्मोन म्हणजे ओक्सिटोसिन. आयुष्यभर सर्व प्रकारच्या प्रेम भावना निर्माण होतात त्या या ओक्सिटोसिनच्या कमी जास्त होणार्‍या प्रमाणामुळे. मेंदूच्या तळाशी वाटाण्याच्या आकाराच्या पिट्युटरी ग्रंथीत हे हार्मोन तयार होतं. पिट्युटरी ग्रंथीतून निर्माण होणार्‍या  ओक्सिटोसिनचा जोडीदार हार्मोन म्हणजे वॅसोप्रेसीन. याच बरोबर कार्यरत असणारी हार्मोन्सची दुसरी जोडगोळी ही सेरोटोनिन - डोपामिनची. मेंदूत तयार होणारे हे हार्मोन्स.  या संपूर्ण व्यवस्थेला सक्रिय ठेवण्याकरता अ‍ॅड्रिनल ग्रंथीतून निर्माण होणारे कॉर्टिसॉल  व जननग्रंथीतून निर्माण होणारे टेस्टोस्टेरॉनही तेवढेच महत्वाचे असतात. शरीरातील संपूर्ण हार्मोनव्यवस्था प्रेमासाठी तत्परच असते.म्हणजे आपल्या शरीरातच प्रेमाचा एक उत्सव साजरा केला जातो. शास्त्नीय दृष्ट्या प्रेम हे तीन प्रकारांत असतं.  मातृप्रेम, प्रणय (रोमँटिक लव्ह ) व बंधू-मित्न प्रेम. या तीनही प्रेमासाठी हामोन्स वेगवेगळ्या प्रकारात सक्रीय होतात. म्हणून तर अनेकदा आपल्याला आपले दोस्त जवळचे वाटतात. मैत्री, जिव्हाळा, आपुलकी व विश्वास हे सारं अधिक असतं.  या बंधू- मित्न प्रेमाचा अतिरेक म्हणजे प्रत्येक वेळेस फेसबुकवर टाकलेल्या पोस्टना मिळणार्‍या लाईक्स मोजणं. त्या अधिक असल्यास शरीरात डोपामिनचे प्रमाण वाढतं. मग त्याचं व्यसन जडतं. अगदी दारू, सिगारेट व तंबाखू सारखंच मग  फेसबुक- व्हाट्सअपचंही  व्यसन लागू शकतं.

प्रणय अर्थात रोमँटिक लव्ह ही भावना हार्मोनच्या दृष्टिकोनातून जटील प्रकारात मोडते. या प्रेमाची सुरवात ही ओक्सिटोसिनमुळेच होते, या बरोबरच कॉर्टिसॉल, सेरोटोनिन व टेस्टोस्टेरॉन हे देखील सक्र ीय होतात. हे हार्मोन्स या सुरवातीच्या काळातील अनिश्चितता, उत्सुकता, असुरिक्षतता या संमिश्र भावना निर्माण करतात. धड धड वाढते ठोक्यात अशी काहीशी अवस्था होते. एकदम खूप प्रेमात पडल्यासारखं वाटतं, खूप रोमॅण्टिक वाटतं. हूरहूर जाणवते.त्याउलट म्हणजे प्रेमाच्या विरु द्ध असलेले राग, क्र ोध अथवा हिंसा या भावनांमागे देखील हार्मोन्सच जवाबदार असतात. त्यामुळे आपण प्रेमात पडलोय, कुणाविषयी आकर्षण वाटतं आहे, म्हणजे नेमकं काय झालं आहे, त्यातून आपली ही अनिश्चित अशी अवस्था आहे, त्यात एकदम मोठे निर्णय घेऊ नयेत. विचारपूर्वक, तारतम्य ठेवून निर्णय घ्यावे. धडधड वाढते प्रेमात हे खरं, पण म्हणूनच जरा जपून असं सांगावं लागतं!

( लेखक हार्मोन तज्ज्ञ आहेत.)