शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
4
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
5
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
6
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
7
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
8
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
9
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
10
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
11
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
13
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
14
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
15
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
16
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
17
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
18
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
19
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
20
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
Daily Top 2Weekly Top 5

LOOK @ You! - कान महोत्सवात नेमकं काय होतं स्टाइल स्टेटमेण्ट?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 17:32 IST

कान महोत्सवात रेड कार्पेटवर दीपिकानं काय पोशाख घातला, कंगणाची साडी, प्रियंकाची लिपस्टिक अशा चर्चा होतात. मात्र फॅशनच्या पलीकडे शोधलं तर दिसतं त्यांचं हे स्टाइल स्टेटमेण्ट. ते एका आंतरराष्ट्रीय सोहळ्यापुरतं नाही. ते त्यांच्या त्यांनी घडवलेल्या व्यक्तिमत्त्वाचा भाग आहे. फॅशनचा हात धरून हे स्टेटमेण्ट कसं बदललं जाऊ शकतं? - त्याचीच ही चर्चा.

ठळक मुद्दे‘अटेन्शन टू द डिटेल’ या तत्त्वानं आता आपल्या लूकचा निर्णय घेतला जातो. त्यातून आपलं स्टाइल स्टेटमेण्ट घडतं आणि व्यक्तिमत्त्व, आपली इमेज हे आकाराला येतं, हे सेलिब्रिटींच्याच नाही तर सगळ्यांच्याच बाबतीत खरं आहे!

- प्राची खाडे

फॅशनच्या संदर्भात विचार करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर फॅशन बदलत गेली, उत्क्रांत होत गेली. गेल्या अनेक वर्षात फॅशन फक्त दिसणं, नटणंमुरडणं यापुरती उरली नाही, तर ती व्यक्तिगत पातळीवर उत्क्रांत होत एका नव्या रुपाला पोहोचली आहे. आणि आता तर नव्या सोशल मीडियाच्या काळात फॅशनचे अर्थ, त्यातून मांडायचं आपलं व्यक्तिमत्त्व, आपल्याला अभिप्रेत संदेश हे सारंच बदललं आहे.हे जरा समजायला अवघड आहे असं वाटलं तरी ते तसं नाही. फॅशन बहुआयामी आहे, याचंच हे एक रूप आहे. सोशल मीडियामुळे फॅशन आणि तिचा परिणाम, त्यानं होणारे बदल हे व्यक्तिगत पातळीवर आणून ठेवले आहेत, कारण सोशल मीडिया  व्यक्तिगत संवादही साधू शकतो, त्याचा परिणाम व्यक्त होण्यावर होतो. व्यक्त होण्यात फॅशनही अभिप्रेत आहेच. कानसारख्या महोत्सवात रेड कार्पेटवर उतरणार्‍या तारकांच्या कपडय़ांची, मेकअप आणि फॅशनची जी चर्चा होते ती फॅशनपुरती मर्यादित असली तरी प्रत्यक्षात ते चित्र तसं नाही. बदलत्या काळात त्याचीही सारी परिमाणंच बदलली आहेत. पूर्वी काय व्हायचं तर आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या महोत्सवात जायचं असेल तर तिथल्या वातावरणाचा विचार व्हायचा. अ‍ॅम्बियन्स-माहौल काय आहे? कोण कोण गेस्ट आहेत? थिम काय आहे? या सगळ्या सरसकट जेनेरिक माहितीच्या आधारावर काय घालायचं याचा विचार केला जायचा. त्यानुसार आपले सेलिब्रिटीही स्वतर्‍ला सादर करायचे. आता मात्र बदलत्या काळात सेलिब्रिटी, टीव्ही कलाकार, सिनेमातले कलाकार हे सारेही फॅशनच्या बाबतीत इव्हॉल्व होत गेले आहेत. पूर्वी या तारकांच्या फॅशनचं तरुण पिढी अनुकरण करायची. सिनेमातल्या फॅशन लोकप्रिय व्हायच्या. मात्र त्यांचं फॉलोइंगही काहीअंशी देशापुरतं मर्यादित होतं. आता सोशल मीडियावर त्यांचं फॅन फॉलोइंग जगभर असतं. जगात कुठंही असलेला माणूस सोशल मीडियावर कनेक्ट होऊ शकतो, संवाद साधू शकतो. व्यक्तिगत पातळीवर हा संवाद होतो, पर्सनल कनेक्शन तयार होतं. त्यात हे सेलिब्रिटीही आपले रोजच्या जगण्यातले फोटो सोशल मीडियात पोस्ट करतात. बाहेर जेवायला जातानाचे, जिमला जातानाचे, बागेतले, सुटीला गेल्यावरचे, घरात वावरतानाचे फोटोही ते आपल्या सोशल मीडिया अकाउण्टवर टाकतात. हे सारे करताना ते केवळ एका इव्हेंटचा नाही तर आपल्या व्यक्तिमत्त्वाचा, आपल्या इमेजचा, आपल्या स्टाइल स्टेटमेण्टचाही विचार करतात. त्यातून ते स्वतर्‍चं एक स्टाइल स्टेटमेण्ट तयार करत असतात. त्यांना फॉलो करणार्‍यांनाही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अंदाज असतो आणि त्यांच्या स्टाइल स्टेटमेण्टचाही.हे सेलिब्रिटी जेव्हा रेड कार्पेटवर जातात तेव्हा ते आपलं व्यक्तिमत्त्व सोबत घेऊन जातात. त्यांच्या ‘पर्सनॅलिटी’प्रमाणे डिझायनर मग त्यांच्या कपडय़ांचा विचार करतात. त्यांच्या व्यक्तित्वाला शोभेल किंवा अधिक ठळकपणे मांडेल असे कपडेच मग रेड कार्पेटवर घातले जातात. सरसकट काहीही घातलं असं आता होत नाही. कारण हे सेलिब्रिटी स्वतर्‍चं, आपल्या स्टाइल स्टेटमेण्टचं आणि आपल्या इंडस्ट्रीसह देशाचंही प्रतिनिधित्व करत असतात.एक उदाहरण सांगते, विद्या बालन. तिची स्टाइल पूर्वी खूप वेगळी होती. पुढे सब्यसाची मुखर्जीने साडी खास तिच्यासाठी डिझाइन केल्या. आणि त्यानंतर साडय़ा ती सर्रास नेसू लागली. त्याआधी साडी हे काही स्टाइल स्टेटमेण्ट नव्हतं. मात्र बाईपण, सेन्शुअस असणं, तरीही पारंपरिक आणि डिसेंट असं विद्याचं आणि साडीचं स्टाइल स्टेटमेण्ट तयार झालं. तेच तिनं आंतरराष्ट्रीय स्तरावरही नेलं. अत्यंत ग्रेसफुल असा तिचा साडीतला वावर असतो. विद्याच्या व्यक्तिमत्त्वाला शोभेशा साडय़ा मग तयार झाल्या, त्या तिनं वापरल्या.दीपिका पदुकोण, अनुष्का शर्माही साडय़ा वापरतात. मात्र त्यांचं स्टाइल स्टेटमेण्ट वेगळं आहे. दीपिका लो नेक गळा, वेस्ट लाइन दिसणार्‍या साडय़ा नेसते. तिच्यासाठी डिझाइन केलेल्या साडय़ा वेगळ्या असतात. अशा रीतीनं सेलिब्रिटींचीपण पर्सनल स्टाइल घडत असते. आणि ही स्टाइलही अत्यंत ‘पर्सनल’ होताना दिसते. आणि मग जेव्हा हे कलाकार आंतरराष्ट्रीय सोहळ्यांत जातात तिथं त्यांना सोशल मीडियात जगभरातले लोक फॉलो करतात. त्यामुळे आता सर्रास काहीही न घालता आपल्या व्यक्तिमत्त्वाची ओळख ठळक करतील, अधिक चांगल्या प्रकारे आपलं स्टाइल स्टेटमेण्ट मांडतील असे पोषाख आणि मेकअप हे कलाकारही परिधान करतात.सोनम कपूरचं उदाहरण घ्या. ती फॅशनिस्टा आहे. ती आताशा अनेक इव्हेंट्सना अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावरही साडी नेसते. कॉटनची, पेस्टल शेडची साडी सर्रास वापरते. त्यात तिचं इंडिया स्टेटमेण्ट तर असतंच. मात्र ‘यंग’ लूकचंही स्टेटमेण्ट असतं. पारंपरिक पद्धतीनं साडी न नेसता ती पॅण्टवर, स्कर्टसह, टॉपबरोबर साडी नसते. अगदी कान महोत्सवातही तिनं गुलाबी साडी, पॅण्ट आणि जॅकेटसह नेसली होती. आपलं फॅशनिस्टा असणं, आपली पर्सनल स्टाइल, आपलं भारतीयत्व आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरची आपली ओळख हे सारं तिनं एकत्र छान गुंफलं. तिच्या रेड कार्पेट ड्रेससह हे सारं येतंच.मुद्दा काय तर, फॅशन ही आता सरसकट, जेनेरिक राहिलेली नाही, तर ती ‘पर्सनलाइज्ड’ झाली आहे. जे कपडे आपण घालतो तो आपला अ‍ॅटिटय़ूड आहे. ती आपली पर्सनॅलिटी आहे असं म्हणून स्वतर्‍ला रेड कार्पेटवर पेश केलं जातं.आता हे सूत्र तुम्ही दीपिका, कंगणा, हीना खान, प्रियंका चोप्रा, ऐश्वर्या राय यांच्या कान महोत्सवात सादर झालेल्या पोशाख आणि मेकअपला लावून बघा. त्यांचं व्यक्तिमत्त्व, अ‍ॅटिटय़ूड आणि पर्सनल स्टाइल त्यात दिसेल. कारण फॅशनचं जग आता अत्यंत पर्सनल होत आहे..

*** 

मेकअप डिझायनर.

ड्रेस डिझायनरइतका आता महत्त्वाचा असतो मेकअप डिझायनर. मेकअप आर्टिस्ट. हेअर स्टायलिस्टही. आताशा तरुण मुलं-मुलीही हेअर ग्रुमिंग, सेल्फ ग्रुमिंगचा इतका विचार करतात. आपल्या हेअर स्टाइलवर प्रयोग करतात. त्यातून आपला अ‍ॅटिटय़ूड मांडतात. तरुण मुलगे तर दाढी ठेवतात, काढतात, ट्रिम करतात, केसांचा रंग बदलतात. प्रयोग हे तारुण्यातल्या स्टाइलचा भाग असतात.चांगलं दिसायचं असेल तर उत्तम मेकअप हवा, केसांची रचना हवी, ड्रेसेस चांगले हवेत, फोटोग्राफर हवा हे सारं आजकाल सोशल मीडियात फॅशन फॉलो करणार्‍या सर्वाना कळतं. तसं ते प्रत्यक्षातही करतात.ही ‘लूक अ‍ॅट यू’ अशी स्वतर्‍कडे पाहण्याची, चांगलं दिसण्याची ओढ सामान्य माणसांना आहे. तशीच सेलिब्रिटींतही आहेच.  त्यामुळे हा नवीन काळ आहे तो आहे. ‘अटेन्शन टू द डिटेल इन फॅशन!’ म्हणजेच प्रत्येक लहानसहान तपशीलाचा विचार करून आपल्या लूकचा निर्णय घेतला जातो. त्यातून मग आपलं स्टाइल स्टेटमेण्ट घडतं आणि व्यक्तिमत्त्व, आपली इमेज हेही आकाराला येतं.जे सामान्य लोक करतात तेच सेलिब्रिटी रेड कार्पेट, विविध इव्हेंट यासंदर्भातही करतात. त्यामुळे मेकअप आणि केसरचना यांचेही संदर्भ आता बदलले आहेत, अधिक पर्सनलाइज्ड झाले आहेत.

***फॅशन नव्हे पर्सनॅलिटी

 कोण काय घालतं, ट्रेण्ड काय, रंग कोणते चर्चेत याचा विचार करून कपडे आता घातले जात नाहीत. तर आपली शरीरयष्टी, व्यक्तिमत्त्व यांना शोभेल असेच कपडे आता वापरले जातात. पूर्वी कानला जाताना कुणाला भारताचं प्रतिनिधित्व अधोरेखित करायचं असेल तर सर्रास सिल्कची साडी नेसून जाणं व्हायचं. आता तसं करता, आपलं व्यक्तिमत्त्व, अ‍ॅटिटय़ूड, आंतरराष्ट्रीय स्तरावर करायचं स्टेटमेण्ट आणि फॅशन याचा मेळ घालून लूक डिझाइन केले जातात. 

(लेखिका स्टायलिस्ट आहेत.)शब्दांकन- ऑक्सिजन टीम