शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
6
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
7
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
8
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
9
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
10
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
11
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
12
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
13
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
14
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
15
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
16
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
17
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
18
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
19
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
20
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द

तुमच्या मताला लोकशाहीत किंमत आहे, असं वाटतं का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 16:44 IST

सामूहिक लोकशाहीवर पक्का विश्वास; पण व्यक्तिगत स्तरावर हतबलता मुलांना वाटतं, नागरिकांच्या ‘मता’ला ‘किंमत’ अर्थातच आहे; पण ‘माझ्या एका मता’ला ती आहे का, याविषयी मात्र शंका!

ठळक मुद्देअवघड प्रश्नांची उत्तरं शोधण्यापेक्षा तो प्रश्न स्किप मारणं जास्त सोपं जात असावं. मात्र स्किप मारण्यातली ‘कळ’ आणि ‘सल’ मात्र ठसठसणारी आहेच !

-ऑक्सिजन  टीम 

बाईच्या जातीला काय कळतं राजकारण, बाईची अक्कल चुलीपाशी, असं थेट आता कुणी म्हणत नसलं आणि निदान स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना पन्नास टक्के आरक्षण असलं तरी ‘राजकारण’ बाईमाणसाचं काम नाही असं तरुण मुलींच्या मनातही आजही कुठंतरी खोल रुजलेलं असेल का?वाचायला त्रासदायकच वाटली ही वाक्यं तरी निदान ही आकडेवारी तरी असंच सांगते. इथं तरुण मुलं ठामपणे म्हणतात की आमच्या मताला लोकशाहीत किंमत आहे, त्या मताची ताकद सत्ता उलथून टाकू शकते.मात्र मुली? त्यांच्या म्हणण्यात तो ठामपणा नाही.बिचकल्याच बहुतेक मुली या प्रश्नावर आणि एका प्रश्नानं त्यांच्या मनात अनेक गोष्टींचं काहूरही माजलं असावं. तसं नसतं तर 20 टक्के मुलींनी हा प्रश्नच स्किप का मारला असता? मुलींनी उत्तरच दिलं नाही; पण त्यांचं उत्तरच न देणं जास्त बोलकं आहे.2019 साली प्रगत म्हणवणार्‍या महाराष्ट्रात 20 टक्के मुली या प्रश्नाचं उत्तरच टाळतात की, आपल्या एका मताला किंमत आहे की नाही?कदाचित आपल्या मताला किंमत नाही, असाच त्यांचा अनुभव असेल?किंवाबाईच्या जातीनं शक्यतो आपलं मत मांडूच नये, गप्पच रहावं असं त्यांच्यावर बिंबवण्यात आलं असेल.किंवामत मांडलं की येणारी जबाबदारी त्यांना नाकारायची असेल?उत्तर काहीही येवो, ते वास्तव अस्वस्थ करणारंच असेल.अजून एक म्हणजे राजकीय निर्णयप्रक्रियेत महिलांच्या मताची किंमत याचाही एक आरसा ही आकडेवारी दाखवते. आजही घरोघर कर्ते पुरुष सांगतील त्याच उमेदवाराला/पक्षाला घरातल्या बायकांना मत द्यावं लागतं असं उघड सिक्रेट चर्चेत असतंच.त्यामुळे आपल्या मताला ‘किंमत’ ती काय असा प्रश्न मुलींना पडत असेल.आणि म्हणून अवघड प्रश्नांची उत्तरं शोधण्यापेक्षा तो प्रश्न स्किप मारणं जास्त सोपं जात असावं. मात्र स्किप मारण्यातली ‘कळ’ आणि ‘सल’ मात्र ठसठसणारी आहेच !

****

एकूण प्रतिसाद काय सांगतो?

* अर्थात, किंमत आहे -  62.78%* माझ्या एका ‘मता’ला काहीही किंमत नाही - 15.38 %* नक्की सांगता येत नाही - 10.86 %एकूण सहभागींपैकी 10% तरुण-तरुणींनी या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही.------------------------------------------मुली म्हणतात * अर्थात, किंमत आहे - 53.24 %* माझ्या एका ‘मता’ला काहीही किंमत नाही - 14.40 %* नक्की सांगता येत नाही - 12.40%एकूण सहभागींपैकी तब्बल 20% तरुणींनी या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही.मुलांमध्ये हे प्रमाण अवघं 2.2% एवढं आहे.  -----------------------------------------------मुलगे म्हणतात * अर्थात, किंमत आहे - 72.36 %* माझ्या एका ‘मता’ला काहीही किंमत नाही - 16.31 %* नक्की सांगता येत नाही - 9.31 %एरवीही आपल्या मताला ‘किंमत’ असण्याचा अनुभव मुलींपेक्षा मुलांच्याच वाटय़ाला अधिक येतो.त्याचेच स्वच्छ प्रतिबिंब या प्रश्नाच्या प्रतिसादात पडलेलं दिसतं.

*** 

2009 : ओन्ली फॉर अ‍ॅडल्ट्स - दहा वर्षात नेमकं काय बदललं?

  ‘मता’ची किंमत तेव्हा कमी वाटत होती,आता नाही!*तरुण मतदार कुणाच्या मागे, कुणाबरोबर जाणार, त्यामुळे राजकीय समीकरणं बदलणार का? हा प्रश्न तेव्हाही राजकीय पक्षांना जेरीस आणत होताच. मात्र तेव्हा चित्र असं होतं की सर्वेक्षणात सहभागी जवळपास 40 टक्के  तरुण-तरुणींना वाटत होतं की, आपल्या मताला लोकशाहीत काही किंमत नाही. आपल्या एका मतानं काही घडत-बिघडत नाही.