शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
5
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
6
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
7
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
8
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
9
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
10
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
11
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
12
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
13
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
14
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
15
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
16
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
17
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
18
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
19
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
Daily Top 2Weekly Top 5

दिलवाल्या दिल्लीत होतं ते काफिर कचरट इश्क!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 08:00 IST

दिल्लीचं इश्क भडक आहे. उग्र आहे. दिल्ली लाजतबिजत नाही. हमाम में सब नंगे. रंगीत कपडे, भरपूर मेकअप आणि मोठ्ठा आवाज, दिल्ली प्रेमही असं करते आणि भांडणही! दिल्लीचं इश्क नशीलं, उद्धट. मेट्रोच्या गर्दीत स्वतर्‍ची स्पेस शिल्लक ठेवणारं.. गजब!! किलर!!!

ठळक मुद्देदिल्लीचं इश्क असंच आहे, नशीलं, उद्धट. मेट्रोच्या गर्दीत स्वतर्‍ची स्पेस शिल्लक ठेवणारं.

-अनादी

ये दिल्ली है मेरे यार,  बस इश्क मोहोब्बत प्यार ...दिल्ली पचवायचा एक जिगरा लागतो, तो सगळ्यांमध्ये नाही. नसतो. नसणार! मुंबई, पुण्याच्या लोकांना प्रेम साजरा करायला जागा लागते, दिलवाल्या दिल्लीकरांना मात्र फक्त कारण लागतं.कुठल्याशा पिक्चरमध्ये वाक्य आहे ना, हम खडे तो सरकार से बडे, तसंच आहे दिल्लीच्या इश्काचं. गार्डनबिर्डनमध्ये फुलायची वाट नाही पाहात ते. मेट्रो, सायकलरिक्षा, बॅटरी रिक्षा सगळंच आपलं. दिल्लीच्या इश्काचा स्वभाव ‘जवानी’ आहे. म्हणजे तुम्ही वयानं तरुण असा-नसा; तुमचं इश्क मात्र तरुण असलं पाहिजे. दिल्लीचं इश्क भडक आहे. उग्र आहे. फ्लॅमबॉयण्ट आहे. सत्तरच्या दशकासारखं दिल्लीचं प्रेमही इस्टमनकलर आहे. आणि मेट्रो ही त्याची फळायफुलायची जागा. दिल्ली लाजतबिजत नाही. हमाम में सब नंगे. पब्लिक डिस्प्ले ऑफ अफेक्शन अर्थात पीडीए भरभरून वाहात असतं दिल्लीत.प्रेम केलं तर दाखवायला नको? आणि जिथे दाखवायचा शौक आहे, तिथे बघण्याचा शौक असणारच ना! दिल्लीत प्रेम करायला काही कोणाला लव्हर्स गार्डन वगैरे लागत नाहीत; पण समजा कोणतं कपल तिथे जाऊन बसलंच झाडांमागे तर थोडय़ावेळाने तिथे चार-दोन टाळकी जमतातच. त्या कपलला काही करत नाहीत, बस लांबून लांबून बघतात. दिल्लीचा स्वभाव मला थोडासा टेकाडे भावजींसारखा वाटतो, किंवा टू बी मोअर प्रिसाइज पंजाबी लग्नातला एखाद्या अंकलारखा, तो तरुण पोरींकडे बघतो तेव्हा ठरकी वाटतो; पण ‘ओ मेरी जोहराजबी’ म्हणून संगीत फंक्शनमध्ये आंटीच्या गालाची पप्पी घेतो तेव्हा दिलवाला वाटतो.हे असं दिल्लीचं इश्क! पानं पिकली असो किंवा ताजी, देठ हिरवाच. दिल्ली मेट्रोतलं प्रेम म्हणजे काय सांगावं! दोघं हातात हात घालून स्टेशनवर येतात तेव्हा चेकिंगची लाइन लेडिज जेण्ट्ससाठी वेगळी असते, तेवढीही जुदाई सहन होत नाही त्यांना. डब्यात चढलं की जवळ खेटून उभं राहणं, हातात हात घेणं, गालावर एखादी पप्पी हे सगळं होतंच. डब्यात त्यांना कोणीही हटकत नाही. सब का टाइम आयेगा! रंगीत कपडे, भरपूर मेक-अप आणि मोठ्ठा आवाज, दिल्ली प्रेमही असं करते आणि भांडणही. दिलीचं इश्क म्हणजे बॅण्ड बाजा बारात मधला रणवीर आणि तनू वेड्स मनूमधली कंगना. त्याच्या टाइट टी-शर्टमधून त्याचे डोले दिसत असतात. गोरा गोमटा पोरगा, जराशी सावळी पोरगी. क्रॉपटॉपमधून तिची कंबर डोकावत असते. त्या कंबरेभोवतीच त्याचे हात, तिने लावलेली लाल लिपस्टिक, त्याचे लेदरचे शूज, मेट्रोच्या दाराजवळच्या प्राइम स्पॉटवर दोघं उभे, ती त्याच्या कडेवरच बसायची शिल्लक राहिलेली. गोविंदपुरीला मेट्रोचं दार उघडतं, आणि तिला पाहून कोणीतरी भंकस करतं.. ‘ए मा..’ ती शिवी हाणते, तो फक्त  बघतो. मेट्रोचं दार बंद होतं, परत सगळं पूर्ववत. मेट्रो खचाखच पॅक असते, तिचे कुरळे केस तुमच्या नाकातोंडात जात असतात आणि तुम्हाला गुलाबी थंडीत कानटोपी आठवते. छान दिसणं दिल्लीचं प्रेम आहे. तुम्ही रूपानं कसेही असा; पण छानछोकी हवीच. उगा नाही दिल्लीच्या लौंडिया ऑफिसमधून घरी जातानाही ‘टचअप’ करून जातात. नवरा भेटतो एखादीला मधल्या स्टेशनवर, तसंच जवळ घेतो जसं वरच्याने गर्लफ्रेण्डला मेट्रोत घेतलं होतं. असलं प्रेम झेपायला जिगरा लागतो. बाकी तुमच्यात काय देतात हो प्रेयसीला गिफ्ट? गुलाब, चॉकलेट, टेडीबेअर? आमच्यात ‘बाटली’ देतात. इश्क है या नशा हे वाक्य इथल्यासाठी बनलंय. दोघांपैकी एक जण, खरं तर दोघं टल्ली होऊन पडले नाही तर कसलं प्रेम? टल्ली होऊन मोठय़ाने ‘तू जान हैं मेरी’ ओरडलं नाही तर कसलं प्रेम?एखादी आंटी बाल्कनीतून वाकून पाहाते, गालातल्या गालात हसते आणि  मोठय़ाने बोंबलते, चलो निकलो. आतून त्याहून मोठय़ा आवाजात संध्याकाळचा पेग मारता मारता अंकल हाक मारतो, ओय जाने दे जान!उगाच नाही दिल्लीत दारू स्वस्त!दिल्लीचं इश्क असंच आहे, नशीलं, उद्धट. मेट्रोच्या गर्दीत स्वतर्‍ची स्पेस शिल्लक ठेवणारं. 60 वर्षांच्या दिलवालीला 65 वर्षांच्या दिलवाल्याने लाल लिपस्टीक गिफ्ट करावी तसं! गजब!! किलर!!!आणि आणखी कसंय सांगू का? तर केदारनाथमधल्या काफिराना गाण्यात सारा अली खानसाठी प्लेबॅक सिंगिंग करणार्‍या निखिता गांधीच्या आवाजासारखं कचरट. काफिर ! काफिराना सा है, इश्क है, या क्या है..

(लेखिका दिल्लीस्थित मुक्त पत्रकार आहेत.)