शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

मुंबईतल्या गच्च गर्दीतही फुरसत शोधणारे आझाद इश्किया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 07:55 IST

मुंबई. इथं मनमुराद ओसंडणार्‍या समुद्राचा किनारा दिसता दिसत नाही. तसा तो शोधायचा तरी कुणाला असतो? ‘आंखों के सागर, होठोंके सागर.. ले डुबे हमें..’ची मदहोश धुन त्या दोघांच्या देहमनात वाजू लागलेली. कॉस्मोपॉलिटन गर्दी शिताफीनं नजरअंदाज करून प्रेममग्न झालेली ‘ती’ आणि ‘तो’ मरीन ड्राइववर बसतात. तासंतास. आपल्या प्रेमाचा बिनधास्त इजहार करतात.

ठळक मुद्दे समुद्राची गाज तनामनात घुमत राहते. आरपार रोमॅण्टिक माहोल. लिहिण्या-बोलण्याचा नाही, फक्त अनुभवण्याचा.

-शर्मिष्ठा भोसले

वर आभाळ निळं-जांभळं, लाल-भगवं झालेलं. सुहानी शाम समुद्रात उतरताना क्वीन्स नेकलेसचा हरेक हिरा लखलखत राहतो. नेकलेसच्या अर्धवर्तुळाचा काठ उंच उंच टॉवर्स मिरवणारा. पाण्यातल्या सतरंगी निऑन लाइट्सची प्रतिबिंबं नजरबंदी करणारी. त्याच काठाच्या दुसर्‍या बाजूला अंधाराच्या ग्लासात बुडत जाणारा समुद्र.मरीन ड्राइव्ह, मुंबई. मनमुराद ओसंडणार्‍या समुद्राचा किनारा दिसता दिसत नाही. तसा तो शोधायचा तरी कुणाला असतोय? ‘आंखों के सागर, होठोंके सागर.. ले डुबे हमें..’ची मदहोश धुन त्या दोघांच्या देहमनात वाजू लागलेली. कॉस्मोपॉलिटन गर्दी शिताफीनं नजरअंदाज करून प्रेममगन झालेली ‘ती’ आणि ‘तो’. मरीन ड्राइव, बांद्रा, बॅण्ड स्टॅण्ड, वरळी सीफेस, दादर चौपाटी इतकंच काय; पण रेल्वेचे सुनसान प्लॅटफॉर्मपण मुंबईसारख्या अस्ताव्यस्त पसरलेल्या शहरात प्रेमाचा बिनधास्त इजहार करायची मुभा खूप ठिकाणं देतात. इथले तितकेच रावडी प्रेमीलोकही ती मुभा नीटच घेतात.मी तशी ग्रामीण, निमशहरी भागात जन्मले-वाढले. मुंबईत नव्याने आले तेव्हा प्रेमाचं असं बेबाकपणे सार्वजनिक होणं बघायला नजर सरावलेली नव्हती. आधी जरा बिचकायला झालं. पण हळूहळू ही असंख्य लव्हबर्डस बघून वाटलं, या एरवी अंगावर येणार्‍या अजस्र महानगराला मानवी चेहरा देतात हे खुल्लमखुल्ला प्यार करणारे लोक. हरेक शहराला स्वतर्‍चं व्यक्तिमत्त्व असतं. उदास, खळाळतं, आत्ममग्न, हसरं, चिडचिडं. कसंही असू शकतं शहर. शहर प्रेमळ आहे की नाही? वाटतं, या प्रेमीजनांची गिनती करून त्याचा अंदाज बांधता येईल..ती विशीतली. भिरभिरती नजर, सफाईदार मेकअप केलेला गोरा मुखडा, जीन्स-टी शर्ट, एकदम शहरी-मॉड लूक. ती सेल्फीवेडी. मध्येच व्हॉट्अ‍ॅसप उघडून त्याला काय-काय दाखवत राहते. ‘आई, व्हॅलंेटाइन, कॉलेज, सबमिशन, गिफ्ट’ असं काय काय मध्येच कानावर पडत राहतं. काही काळात दोघं एकमेकात अर्धवट हरवतात..अचानकच त्याचा मोबाइल वाजतो. वैतागलेल्या चेहर्‍यानं उजळलेला स्क्र ीन बघत असताना तो अंधुकसा दिसतो मला. सावळा, पंचविशीचा, जरा जास्तच समंजस वाटतो वयापेक्षा. लोन, एक्सेल शीट, फॉर्म, असं काय काय बोलत राहतो. आदिश केळुसकरच्या ‘जाऊं कहां बता ऐ दिल..’ मधल्या, त्या वास्तववादी, सनकी प्रियकराची आठवण येत राहते. मुंबईत ‘रिलेशन’मध्ये असणारी ती दोघं. तोपण असाच तिला भेटायला गेल्यावर आलेल्या ऑफिस कॉलवर बोलताना उखडतो. त्या कुणाला काय काय हिशोब सांगत चिडतो. तसा ‘ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है’वाल्या मूडमध्येच असतो तो सिनेमाभर. ती हैदराबादी हिंदीत त्याला मनवत राहते. शेवटी तिच्यासमोरच त्याला एका गाडीनं उडवल्याच्या नोटवर सिनेमा संपल्याची आठवण होते. मन जरा अस्वस्थ होतं..प्रॉमिसेस, शपथा, रु सणं, मनवणं, लाजणं, रडणं-हसणं असं काय काय उलटसुलट क्र मात करत असलेले लव्हबर्डस थवे आजूबाजूला येऊन बसत असतात. एक एकटाच बसलेला कुरळ्या केसांचा ‘यंग मॅन’ शीळ वाजवायला लागतो. ‘दो लफ्जों की है, दिल की कहानी, या है मोहब्बत, या फिर जवानी..’ त्याचं वाजवणं थांबल्यावरही खूप वेळ खुशबूदार धून वार्‍यावर पसरत राहते. शब्द बनून माझ्या ओठांवर येते तेव्हा मी माझ्याही नकळत तेच गाणं गुणगुणायला लागलेली असते. ‘लग जा गलेसे, रु त है सुहानी, या है मोहब्बत, या है जवानी..’ बाजूची दोघं तंद्री मोडून हळूच माझ्याकडं बघतात, पुन्हा एकमेकात बुडून जातात. नमकीन वारा श्वासात भरून घेताना तलफ लावणारा चहा आणि भेळ, चणेफुटाणे असं काय काय विकणारी माणसं. ‘व्हॅलेंटाइन्स वीक’मध्ये गुलाब घ्या म्हणत मागे लागणारी मासूम, काळीसावळी पोरं हा हसीन कॅनव्हास पूर्ण करतात. माझा एक पोलीस मित्र सांगत होता, ‘दोनेक वर्षापूर्वीपर्यंत आम्ही पोलीस लोक या ‘लवर’ लोकांना खूप हटकायचो. ‘मोरल पोलिसिंग’ म्हणतात तेही करायचो. नंतर मात्र तसं न करायचे आदेश आम्हाला दिले गेले. आता पोलीस फक्त कायदा सुव्यवस्थेला बाधा येणारं कुणी काही करत नाही ना, यासंदर्भाने ‘लवर’ लोकांवर दुरून लक्ष ठेवतात. बाकी काही नाही.’जणू सादियोंका इंतजार केल्यावर झालेली अधीर-अधाशी भेट, नजरांची जुगलबंदी, कळत-नकळत ओझरते स्पर्श, हातातले थरथरते हात, त्वचेवर सजीव झालेले रोमांच, खटय़ामिठ्ठय़ा मिठीतला आवेग, किस-विस आणि बरंच काय-काय इश्किया..एक प्राध्यापक मित्र आहे, समाधान इंगळे. त्यानं बी.ए.ला शिकतानाच त्यानं त्याच्या औरंगाबाद शहराला डोळ्यासमोर ठेवून एक मस्तच कविता लिहिली होती,‘ना छोटी बनवायला पाहिजे ना मोठी बनवायला पाहिजे समुद्र नसला तरी शहरात एक चौपाटी बनवायला पाहिजे..गार्डनमध्ये चोरून जावं तर तिथंही पोलीस पकडतातआपल्याच माणसासमोर आपलीउगाचच इज्जत काढतातकुणालाही दिसणार नाही अशी ताटी बनवायला पाहिजे..’ आजही कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये त्याच्या या कवितेला टाळ्याशिट्टय़ांची जवान दाद मिळते. कारण अजूनही काळ बदलला तरी गावा-शहरात बरे प्रेमकट्टे नाहीतच. मग गावखेडय़ात गाभुळलेला रोमान्स चिंचेच्या झाडाखाली नसता आडबाजूच्या ओसाड विहिरीच्या आडोशाला होतो. निमशहरी भागांचं दुखणं अजूनच वेगळं. ना धड गाव न धड शहर. ती दोघं नोट्स द्यायला-घ्यायला भेटली तरी अफवांचा महापूर ! कॉफीशॉप्सवर धाड पडली की पोरा-पोरींना पोलीस गुन्हेगार असल्यासारखे पकडणार.अशा ‘संस्कारी’, सनातन प्रदेशात मैत्नी असो, की प्रेम, निवांत ऐकणं-बोलणं होतंच नाही. अनेकदा मनातली बात मनातच विरून जाते. डाव अध्र्यावरती मोडत कहाणी अधुरी राहते. मग ‘तो’ कुण्या दुसर्‍याच्याच घरी दिल्या गेलेल्या ‘ती’ची, ‘कधीतरी येईल माहेरी आणि क्षणभर दिसेल’ म्हणत वाट बघत राहतो..महानगरी प्रेमिक मात्र स्वतर्‍च्याच मस्तीत अख्ख्या शहराकडे पाठ करून बसलेले असतात. तशी दुनियादारी कुणाला चुकलीय? पण तास-दोन तास सगळा कोलाहल, वाहनांचे आवाज, गर्दीचा गोंगाट ‘म्युट’ होतो. समुद्राची गाज तनामनात घुमत राहते. आरपार रोमॅण्टिक माहोल. लिहिण्या-बोलण्याचा नाही, फक्त अनुभवण्याचा. बॅकग्राउण्डला फरीदा खानम नशील्या आवाजात आर्जवं करत राहतात, ‘वक्त की कैद में जिंदगी है मगर, चंद घडियां यहीं है जो आजाद है, इनको खो कर मेरी जानेजां.. उम्रभर ना तरसते रहो.. आज जाने की जिद ना करो, युंही पहलू में बैठे रहो..’

(शर्मिष्ठा मुक्त पत्रकार आहे.)