शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

गोलगोल इमरतीसारखी औरंगाबादी इश्काची गोष्ट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 17:28 IST

थोडी मोकळीक, थोडी बंधनं थोडा बदल, थोडी मुरड असं नवंजुनं घेत ‘जमवून’ घेत जगणं ही इथली प्रेमकहाणी.

ठळक मुद्देसंपूर्ण राज्याच्या चळवळींचं मैदान ठरलेल्या या शहरात प्रेमाची अभिव्यक्ती किती सोपी, किती अवघड आहे?

- अगस्त्य देवकर

प्रेमाची चव काय? जगभरात कुठेही याचं उत्तर चॉकलेट असं मिळेल.  पण या शहरात ते इमरती असंच द्यावं लागेल.प्रेमाचं प्रतीक काय? याचं उत्तर सर्रास ‘ताजमहाल’ असं येईल. पण या शहारत ते बीबी-का-मकबरा असं सांगावं लागेल.हे आहे औरंगाबाद आणि इथलं प्रेम.सुफीवाद, शायरी आणि कलेची जिवंत नहर असणार्‍या या शहरात आधुनिक प्रेमाचं स्टेटस काय? संपूर्ण राज्याच्या चळवळींचं मैदान ठरलेल्या या शहरात प्रेमाची अभिव्यक्ती किती सोपी, किती अवघड आहे?उत्तर आहेर्‍ खूप पुढं आलोय..अजून खूप पुढं जायचंय!या शहरातील लोकांनी मुलंमुली मित्न असतात ही एक प्रकारे मान्य आणि गृहित धरलेलं आहे. त्यामुळे मुलामुलींनी एकत्न फिरण, बसणं, बोलणं आता तितकं नजरा वळवणारं ठरत नाही. पण मुलामुलींचा ग्रुप असेल तरच. जोडप्यांना अजून तरी ती मोकळीक नाही.मोबाईलच्या स्क्र ीनच्या पल्याड, व्हॉट्सअ‍ॅप/इन्स्टाच्या इमोजीशिवाय नजरेला नजर देऊन मनातलं सांगण्याची, मनसोक्त गप्पा मारण्याची मुभा पब्लिक प्लेसमध्ये तरी नाही. अनेक छोट्या-छोट्या गार्डन्समध्ये मुलामुलींना न बसू देण्याच्या पाट्यादेखील लावण्यात आल्या आहेत. बीबी-का-मकबरा इथं प्रेमाच्या आणाभाका घेणारी जोडपी दिसतील. विद्यापीठ परिसर, साई टेकडी, कॅनॉट गार्डन या काही ठिकाणीही जोडप्यांचा वावर असतो. पण मनात धाकधुक मात्र कायम असते. उनाड पोरं, हटकणारे काका-काकू आणि स्वयंघोषित ‘संस्कृती रक्षक’ यांना इथं टाळता येईलच असं नाही.‘‘मुलगा-मुलगी एकटे बसलेले असतील तर एखादं टोळकं येऊन प्रश्न करणार, घरी सांगण्याची धमकी देणार, ‘हे धंदे इथं चालणार नाही’ असा डोस पाजणार म्हणजे पाजणारच असं इंजिनियरिंग थर्ड इयरला असणारा स्वप्नील सांगतो. त्याची ही आपबीती. अशा वेळी पोलिसांकडे मदत मागण्याचीसुद्धा पंचाईत असते. मग आता ही मुलं शहरातल्या नव्या कॅफेंकडे वळू लागली आहेत. कॉफी आणि बरंच काही असा मामला आहे.दहा वर्षांपूर्वी सीसीडी आणि सीसीबी या दोन नावांपलिकडे औरंगाबादकरांचे कॅफे विश्व नव्हतं. पण आता दर आठवड्याला नवीन कॅफे सुरू होतोय, असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. शहरात तीनशेहून अधिक छोटेमोठे कॅफे आहेत. कॉलेज परिसरात आणि खासकरून कॅनॉट प्लेसमध्ये कॅफेची गर्दी आहे. 100 ते 150 रु पयांमध्ये तासनतास बसता येतं. बजेटनुसार कॅफेची चॉईस आहे.तरु णाईचा आधुनिक कट्टा म्हणा ना. या शहरांत देशभरातूनच नाही तर जगभरातून मुलं आता शिकायला येतात. त्यांनाही लहानमोठे कॅफे, कॉफीशॉप हा बरा आधार वाटतं. मुली सांगतात की, इतक्या भयंकर घटना अवतीभोवती घडत असतात त्यामुळे आता पालकांनी मुलींवर र्निबध कडक केले आहेत. त्यामुळे आता कॉलेज ते घर असं करत मुली बाहेर कुठं जाऊ शकत नाहीत, त्या तडक घरीच जातात. खरंतर अजूनही इथं बॅचलर मुलामुलींना घरं मिळणं थोडं कठीणच जातं. मुलीमुली राहत असतील तर सोसायटीतील इतर रहिवाशांची त्यांच्यावर बारीक नजर असते. काही ठिकाणी तर बिल्डिंगच्या समोर किवा ड्रॉप करण्यासाठीसुद्धा मुलं आलेली चालत नाहीत. मात्र आता हळूहळू शहरातील अनेक कॉलेजमध्ये मुलमुली- ग्रुप किंवा जोडीने फिरू शकतात इतकी मोकळीक आहे. एका ‘मर्यादे’च्या आत मुलामुलीच्या एकत्न फिरणं, बसणं, बोलणं याबाबत कॉलेजमध्ये अडचण येत नाही. खास करून इंजिनियरिंग, मेडिकल आणि हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालयात ही सामान्य बाब आहे. मात्र अनेक मुलांशी बोलल्यावर हे सहज लक्षात येतं की, प्रेमात पडतानाही लगA करताना काय अडचणी येतील याचा विचार अनेकजण करतात. कारण जातीचा धाक. त्यापायी होणारा विरोध आपण टाळूच शकत नाही असं अनेकांनी सांगितलं.थोडा बदल, थोडी मोकळीक आणि थोडी बंधनं असं इथलं चित्र आहे.

( अगस्त्य औरंगाबादमध्ये खासगी नोकरी करतो.)