शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश
2
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
3
भारताच्या ड्रग्ज तस्करांवरील कारवाईमुळे दाऊद इब्राहिमला धक्का; आता दक्षिण आफ्रिका आणि मेक्सिकोमधील नवीन ठिकाणांचा घेतोय शोध
4
भरला संसार मोडून प्रियकरासोबत पळाली ३ मुलांची आई, जाताना पैसे अन् दागिनेही लुटून गेली; पतीची पोलिसांत धाव
5
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
6
VIRAL : पत्नीच्या चारित्र्यावर संशय आला, पती अचानक बेडरूममध्ये शिरला अन् बेड उघडताच समोर आलं भयाण वास्तव!
7
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
8
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
9
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
10
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
11
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
12
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
13
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
14
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
15
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
16
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
17
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
18
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
19
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
20
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

गळफास सोडा.

By admin | Updated: November 13, 2014 21:26 IST

डोण्ट किल युवरसेल्फ’ हा ऑक्सिजन मधला लेख वाचला आणि वाटलं तुमच्याशी थोडं मनातलं बोलावं.

 
- तुमचीच एक मैत्रीण
डोण्ट किल युवरसेल्फ’ हा ऑक्सिजन मधला लेख वाचला आणि वाटलं तुमच्याशी थोडं मनातलं बोलावं. 
मी एक डॉक्टर आहे.  आज डॉक्टर आहे, पण कधीतरी मीसुद्धा ह्या विचित्र फेजमधून गेले आहे. एकदा दोनदा नव्हे तर किमान चारदा तरी मी आत्महत्त्येचा प्रय} केला आहे. माझं भाग्य थोर की, आज मी जिवंत आहे आणि तुम्हाला हे पत्र लिहून अनुभव सांगण्याइतपत डोकं था:यावरही आहे.
मी कॉलेजात होते, बारावीत होते. मला फक्त आणि फक्त डॉक्टरच व्हायचं होतं. मी परिश्रमही करत होते. त्याच काळात माझी आई मला सोडून गेली. तेव्हा खरं तर मला तिची सर्वात जास्त गरज होती. पण अचानक आईला कॅन्सर झाल्याचं निदान झालं. डॉक्टरांनी फक्त सहा महिने शिल्लक आहेत म्हणून सांगितलं. मी ही गोष्ट पचवू शकले नाही. त्यावेळी आईला धीर द्यावा म्हणून मी माङो विचार कुणाला बोलून दाखविले नाही. आई गेली त्याच दिवशी माझी मेडिकलला अॅडमिशन झाल्याचं कळलं. खरं तर ही बातमी कळल्यावरच आईनं प्राण सोडला.
त्यानंतर दोन महिन्यातच माझी रवानगी खासगी हॉस्टेलला झाली. सुरुवातीला ह्या सर्व पूर्व परिस्थितीमुळे मी कुणात जास्त मिक्स होत नव्हते. त्यामुळे तिथे मला ‘शिष्ट’चा टॅग लागला, ज्या जवळच्या मैत्रिणींना माहीत होतं त्यांनी थोडं समजून घेतलं. पण माझी बाहेरच्या कठोर जगाशी पहिल्यांदाच ओळख झाली.  तरीही मी मनाशी ठरवलं की आईचं स्वप्न पूर्ण करायचं. मी प्रत्येक वर्षी फस्र्ट क्लासमध्ये पास होत होते. पण सतत काहीतरी कमतरता जाणवत असे, आपल्याजवळ आपलं हक्काचं माणूस नाही असं वाटत राहायचं.  त्यात इंटर्नशिपच्या काळात माङया आयुष्यात  एक ‘तो’ आला. वाटलं हाच तो, ज्याच्याशी मी  मोकळेपणानं बोलू शकते. मला तो मनापासून आवडायचा. आम्ही खूप गप्पा मारायचो; पण मी घरी सांगितलं आणि घरच्यांनी चक्क त्याला नकार दिला.  शेवटी आमचं नातं तुटलंच. 
काही दिवसांनी  घरच्यांनी एका मुलाशी  माझा साखरपुडा करून दिला. ह्या सगळ्या कारणांनी मी स्वत:वर, घरच्यांवर, सगळ्यांवरच चिडले होते. रागवले होते. त्यात मी डीप्रेस्ट होत गेले. म्टाळायची. वाटायचं सगळं संपवून टाकावं. 
त्यातच मी एकदा हाताची नस कापली. मला घरी नेण्यात आलं, उपचार झाले; पण पुन्हा हॉस्टेलवर पाठविलं गेलं. सगळ्यांना झाल्या प्रकाराची वाच्यता होऊ द्यायची नव्हती. मी आणखी डीप्रेशनमध्ये गेले. वारंवार आजारी पडत होते, जेवण, झोप, सगळं रुटीनच पार बदलून गेलं होतं. अशातच मी आत्महत्त्येचा दुसरा प्रय} केला. तोही फसला वाटलं होतं रेल्वेखाली जीव द्यावा. नाही जमलं.  त्यानंतर  मी पुन्हा दोनदा गळफास लावायचा अपयशी प्रय} केला. माङया रूममेटमुळे मी वाचले. त्यानंतर मात्र सर्वाना माङया मानसिक अवस्थेची दाहकता कळली. मानसोपचार तज्ज्ञांनी माङयावर उपचार केले. मला मानसिक आजारातून बाहेर काढलं. त्यानंतर माझं लगA झालं मी नव:याला सगळं सांगितलं. तोही डॉक्टर असल्यानं त्यानं मला समजून घेतलं.  
आज हा अनुभव इतका सविस्तर लिहिला, तो माङयासारख्याच या अनुभवातून जाणा:या इतर तरुण मुलामुलींसाठी. मी एवढंच सांगेन, मरावंसं वाटत असलं तरी मरू नका. मुक्तपणो बोला, लोकं काय म्हणतील, याचा विचार करू नका. योग्य मानसोपचार तज्ज्ञाची मदत घ्या. आणि ज्यांच्या आसपास असं कुणी डीप्रेस आहे, त्यांनी मनापासून त्यांना मदत करा, जगण्याची उमेद द्या.