शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: राज्यात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आघाडीवर, महाविकाआघाडीची काय परिस्थिती?
2
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
3
Jawhar Nagar Parishad Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
4
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
5
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
6
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
7
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
8
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
9
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
10
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
11
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
12
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
13
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
14
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
15
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
16
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
17
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
18
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
19
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
20
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
Daily Top 2Weekly Top 5

खेळायला शिका..

By admin | Updated: September 8, 2016 13:31 IST

आॅलिम्पिक संपलं, बक्षीसं जाहीर झाली, क्रीडा संस्कृतीवर बरी-वाईट टीकाही झाली; मात्र आता खेळात करिअरच्या मोठ्या संधी आहेत,

 - सतीश डोंगर

आॅलिम्पिक संपलं,बक्षीसं जाहीर झाली,क्रीडा संस्कृतीवर बरी-वाईट टीकाही झाली;मात्र आता खेळात करिअरच्या मोठ्या संधी आहेत,आणि चाकोरीबाहेरचं हे करिअरनव्या जगात घेऊन जाऊ शकेलम्हणून अभ्यासक्रमही उपलब्ध आहेत,हे कुणी सांगितलं आहे का?

आॅलिम्पिकचा धुराळा आता खाली बसला. यागेल्या काळात व्हायरल होत होत एक पोस्ट तुमच्याहीकडे आली असेलच.पी. व्ही. सिंधूला किती कोटी रुपयांची बक्षिसं, जमीन, फ्लॅट्स, गाड्या, नोकरी हे सारं मिळालं याची एक खूप मोठी जंत्रीच होती.ते सारं वाचून आपल्याला धाप लागते. एवढा पैसा कमावला याचं अप्रूप, कौतुक आणि असूयाही वाटते.जेमतेम दोन पदकं आणि काही हातावर मोजता येतील अशा खेळाडूंची असामान्य कामगिरी यासाठी भारतात त्यासाऱ्या खेळाडूंचं किती कौतुक झालं.असं कौतुक इतर देशांच्या खेळाडूंच्या वाट्याला येतं का?याबाबतीत अमेरिकेसारख्या प्रगत देशाशी जर भारताची तुलना केली तर खूपच विपरीत स्थिती बघावयास मिळेल. अमेरिकेसारख्या प्रगत आणि क्रीडासंस्कृती रु जलेल्या देशातील शेकडो आॅलिम्पियन्स आजही आपल्या भविष्याचं कसं होणार याच्या चिंतेत असतात. आर्थिक चिंता त्यांना असते हे खरंतरी वाटेल का आपल्याला? आणि इकडे भारतासारख्या विकसनशील देशात आॅलिम्पिकची वारी जरी केली तरी खेळाडूच्या भविष्याची चिंता बऱ्यापैकी मिटते अशी स्थिती आहे. तिकडे रिओमध्ये आलेल्या शंभराहून अधिक अमेरिकन खेळाडूंनी ‘गो फंड मी’ अशा आशयाचे फलके झळकविले होते. कारण अमेरिकेने सुवर्णपदक विजेत्याला २५ हजार, रौप्यपदक विजेत्याला १५ आणि कांस्यपदक विजेत्याला दहा हजार यूएस डॉलर्सची बक्षिसे जाहीर केली आहेत. भारताच्या तुलनेत ही रक्कम फारच कमी आहे. आॅलिम्पिकमध्ये भरघोस यश मिळवून सुद्धा अमेरिकन खेळाडूंना फारसे आर्थिक स्थैर्य मिळत नाही. स्वत:वरच पैसा अधिक खर्च होतो. शिवाय पुरस्कर्तेही मिळत नाहीत. त्या तुलनेत एखाद्या भारतीय खेळाडूने साधी राष्ट्रीय स्पर्धा जरी गाजविली तरी त्याच्यावर बक्षिसांची अक्षरश: उधळण केली जाते. शासकीय सुविधा, नोकरीसाठी सवलत, ब्रॅँड अ‍ॅम्बेसेडर, मान-सन्मान अशा सर्व सोयी स्वत:हून चालून येतात.हे सगळं चित्र काय सांगतं? याचा अर्थ एवढाच की, आज तरी खेळाडू म्हणून करिअर करायचं असेल तर आपल्या देशात मोठी संधी आहे. आव्हानं, अडचणी अर्थातच आहेतच, मात्र नव्या क्रीडाधोरणानुसार तर ज्यांना खेळाची आवड आहे, खेळ हे ज्यांचं पॅशन आहे त्यांनी केवळ नोकरीसाठी त्यावर पाणी सोडू नये. किंवा क्रीडा कोट्यातून एखादी नोकरी मिळेल म्हणून खेळणं एवढ्यापुरतंच आता खेळाकडे पाहू नये. अर्थात स्पोर्ट्समध्ये करिअर करत असताना प्रत्येक खेळाडू राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वत:ची ओळख निर्माण करू शकेल असं नाही; मात्र याचा अर्थ खेळाडूंच्या सर्व मेहनतीवर पाणी फेरले जाईल, असाही होत नाही. ज्या खेळाशी तुम्ही जोडलेले आहात, त्याच खेळात तुम्ही स्पोर्ट्स मॅनेजमेंट, कोच किंवा इन्स्ट्रक्टर, कमेंटेटर किंवा अ‍ॅँकर, स्पोर्ट्स जर्नालिस्ट, स्पोर्ट्स मेडिसिन, इव्हेंट मॅनेजमेंट, फॅसिलिटी मॅनेजमेंट आदि क्षेत्रातही संधी आता संधी मिळू शकते.खेळाची आवड असेल तर खेळण्यापलीकडे अनेक प्रकारच्या संधी आता क्रीडाक्षेत्रात उपलब्ध होत आहेत.आपल्या शेजारी चीनमध्ये तर आॅलिम्पिक पदकाचं स्वप्न पूर्ण करण्याच्या ध्यासानं वयाच्या पाचव्याच वर्षी मुलाला स्पोर्ट्समध्ये झोकून देण्याची मानसिकता आहे. त्यामुळेच आॅलिम्पिकच्या पदतालिकेमध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या स्थानावर चीन असते. भारतात याच्या विपरीत स्थिती बघावयास मिळते. एक क्रिकेट सोडलं तर खेळात करिअर याचा लहानपणापासून विचार होत नाही. जिम्नॅस्टिक, फुटबॉल, टेबल किंवा लॉन टेनिस, ज्युदो कराटे याचे क्लासेस अनेकजण लावतात पण ते पालकांच्या आग्रहापोटी. एक क्रीडा अ‍ॅक्टिव्हिटी नावाला सोब करते. कॉलेजच्या जीवनात एखाद्याने राज्यस्तरीय स्पर्धा गाजविल्यानंतर त्याला क्रीडाप्रकारात करिअरची स्वप्नं पडतात. काही यात यशस्वी होतात, तर काहींचं स्वप्न स्वप्नच राहतं. खरं तर आपल्याकडे ५ ते ८, ९ ते १४ आणि १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या क्रीडापटूंना प्रशिक्षण देण्यासाठी अनेक अकॅडमी कार्यरत आहेत. या अकॅडमी खेळाडूंना इंटरसिटी, इंटरस्टेट अशा ठिकाणी स्पर्धेत उतरवून त्यांना नॅशनल, इंटरनॅशनल स्पर्धांमध्ये उतरविण्यासाठी परिपक्व करतात. येथूनच खेळाडूच्या पुढील भवितव्याचा पर्यायाने आॅलिम्पिकचा प्रवास सुरू होतो. त्यामुळे तुम्ही खेळत असाल तर खेळणं थांबवू नका. चाकोरीबाहेरचं एक करिअर आणि त्यातला नितांत आनंद तुमची वाट पाहतोय.आवड असेल, तर त्याबाबतची दिशाही सापडू शकते.त्यासाठी प्रयत्न मात्र करायलाच हवेत.- सतीश डोंगरे(लेखक लोकमतच्या नाशिक आवृत्तीत सहायक उपसंपादक/वार्ताहर आहेत.)२६ पदके; कमाई कोट्यवधींची१९२८ ते २०१६ पर्यंत भारताने आॅलिम्पिकमध्ये २६ पदकांची कमाई केली आहे. २०१२ मध्ये भारताने तब्बल दोन रौप्य आणि चार कांस्यपदके जिंकून इतिहास रचला होता. त्यात सर्वाधिक ११ पदके हॉकी या क्रीडा प्रकारात भारताने पटकावली आहेत. सर्व विजेत्या आॅलिम्पिकपटूंवर कोट्यवधी रुपयांच्या बक्षिसांची उधळण त्याकाळीही करण्यात आली आहे.भारताने एम्सटर्डम आॅलिम्पिकमध्ये (१९२८) पुरुष हॉकी प्रकारात पहिल्या सुवर्णपदकाची कमाई केली होती. पुढे १९५२ च्या हेलिसंकी आॅलिम्पिकमध्ये खाशाबा जाधव या कुस्तीपटूने पहिले वैयक्तिक कांस्यपदक जिंकले. १९९६ च्या अटलांटा आॅलिम्पिकमध्ये टेनिस स्टार लिएंडर पेस यानेही कांस्यपदक जिंकले. २००० साली सिडनी येथे आयोजित केलेल्या आॅलिम्पिकमध्ये कर्णम मल्लेश्वरी या महिला कुस्तीपटूने ६९ किलो वजनीगटात कांस्यपदक जिंकून इतिहास रचला. २००४ च्या आॅलिम्पिकमध्ये नेमबाज राजवर्धन राठोड याने रौप्यपदकाची कमाई केली. २००८ च्या बीजिंग आॅलिम्पिकमध्ये नेमबाज अभिनव बिंद्रा याने सुवर्ण, सुशीलकुमार याने कांस्य, तर कुस्तीपटू विजेंद्रकुमार सिंह याने कांस्यपदक जिंकले, तर २०१२ च्या लंडन आॅलिम्पिकमध्ये सुशील कुमार, योगेश्वर दत्त, गगन नारंग, विजय कुमार, साइना नेहवाल, मेरी कोम यांनी दोन रौप्य आणि चार कांस्यपदकांची कमाई करून दिली. हे सर्व खेळाडू जेव्हा भारतात परतले तेव्हा त्यांच्यावर चौफेर बक्षिसांची उधळण केली गेली. याशिवाय मानसन्मान, प्रेम मिळालं ते वेगळंच.खेळ शिकाखेळायचं म्हणजे फक्त खेळाडूच व्हायचं एवढ्यापुरतं हे जग आता उरलेलं नाही. त्यापलीकडे जाऊन क्रीडा व्यवस्थापन ते क्रीडा मानसशास्त्र ते क्रीडा इव्हेण्ट या साऱ्यापासून खेळात पदवी देणाऱ्या अनेक संस्था आता भारतातही उपलब्ध आहेत. सीबीएसई बोर्डानं तर शालेय स्तरावर क्रीडा अभ्यासक्रम सुरू केला आहे.याशिवाय दिल्ली विद्यापीठात काही नवीन कोर्स सुरू झाले आहेत.* यासंदर्भातली सगळ्यात महत्त्वाची संस्था म्हणजे इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट आॅफ फिजिकल एज्युकेशन अ‍ॅण्ड स्पोर्ट्स सायन्स.क्रीडा विषयात विविध अभ्यासक्रम, माहिती, आॅनलाइन कोर्सेसही या संस्थेत शिकवले जातात. बारावीनंतर, पदवी, पदव्युत्तर आणि पीएचडीपर्यंत या विषयात अभ्यास करता येतो.अधिक माहितीसाठी- Indira Gandhi Institute of Physical Education & Sports Sciences www.igipess.du.ac.in/ ही वेबसाइट पाहता येईल.*लक्ष्मीबाई नॅशनल कॉलेज फॉर फिजिकल एज्युकेशन, तिरुवनंतपुरम.ttp://www.lncpe.gov.in *

यासह अनेक संस्था मानसशास्त्र, व्यवस्थापन, इव्हेण्ट, पीआर, मॅनेजमेण्ट, एमबीए यासंदर्भातले खेळाशी संबंधित विषय शिकवितात.