शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

गणपतीच्या डेकोरेशनला सुटी, तरुण कार्यकर्त्यांचा पूरग्रस्तांना मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 15:20 IST

गणपती मंडळाचे तरुण कार्यकर्ते म्हणजे नुस्ता कल्ला! वर्गणीसाठी फाटणार्‍या पावत्या आणि डेकोरेशनची धावपळ. यंदा कोल्हापुरात मात्र तरुण कार्यकर्त्यांनी स्वयंस्फूर्तीनं या सार्‍याला फाटा दिला आहे.

ठळक मुद्देडेकोरेशन, मिरवणुका, डीजे हे सारं बाद करून पूरग्रस्तांची घरं उभी राहावीत म्हणून आता हे हात राबणार आहेत !

इंदूमती गणेश 

गणपतीच्या डेकोरेशनची चर्चाच नाही तर फायनल तयारी करण्याचे हे कोल्हापुरातले दिवस. आपलं सगळ्यात भारी झालं पाहिजे म्हणत झपाटल्यासारखं काम करणारी पोरं. उद्यमनगर, राजारामपुरी, शाहूपुरीचे तांत्रिक देखावे, मंगळवार पेठ, बुधवार पेठ, कसबा बावडय़ातील सजीव देखावे, लक्ष्मीपुरी म्हणजे विद्युत रोषणाई, काल्पनिक मंदिरे, शिवाजी चौक तरुण मंडळाचा 21 फुटी मानाचा महागणपती, शतकोत्तर परंपरा असलेली गणेश मंडळे, तालीम संस्था, घरगुती गौरी-गणपतीची  सुरेख देखाव्यांची सजावट. असा नुसता माहौल. घरगुती डेकोरेशनलाही लाखभर रुपये खर्च झाले तरी हरकत नाही असं म्हणत झटणारं इथलं पब्लिक.त्यात गणेश विसर्जन मिरवणुका म्हणजे तर स्वतंत्न विषय. स्वातंत्र्य दिनाच्या संचलनातील महाराष्ट्राच्या देखाव्याची प्रतिकृती, कुणाकडे केरळच्या लोककलाकारांचे आकर्षण तर कुणी कोकणच्या दशावतार ग्रुपला दिलेले निमंत्नण, वेगवेगळ्या राज्यांतील कलावंतांचे सादरीकरण. मुंबई-पुण्याच्या ढोलपथकांचे वादन किंवा धनगरी ढोल. डोळे दीपवणारे लेझर शो. तीस तीस तास चालणारी गणेश विसर्जन मिरवणूक. त्यासाठी तरुण कार्यकत्र्याना दिल्या जाणार्‍या रुमालापासून कपडय़ांर्पयतची वेगळेपण जपणारी मंडळे. तरुण मुली आणि महिलांचा उत्स्फूर्त सहभाग, लेझीमपासून मर्दानी खेळांर्पयत सगळ्यात त्याही पुढं.यंदा मात्र हा असा माहौल नाही.कोल्हापूरच्या गणेशोत्सवाची खास बात असते. सांस्कृतिक वारसा, परंपरेची कास धरून नव्याचा स्वीकार. राजर्षी शाहूंची पुण्याई अभिमानाने मिरवताना त्यांच्या विचारांचा वसा कृतीतून जपणारे रांगडे कोल्हापूरकर. पण यंदा मात्र सार्‍याचीच रया गेली आहे. कधीही न पुसणारा ओरखडा ओढला यंदा महापुरानं. तो महापूर आता ओसरला आहे; पण मागे राहिलेल्या लाखो नागरिकांच्या डोळ्यात अश्रूंचा महापूर मात्र आजही कायम आहे. डोळ्यादेखत घर-संसार, लेकराप्रमाणे सांभाळलेली गुरं-ढोरं, सोन्यासारखी शेती वाहून कुजून गेली. ते सारं पाहवत नाही.पण आता पडल्या घरात विस्कटलेल्या संसाराची घडी पुन्हा बसवण्यासाठी त्यांच्या मदतीला उभी राहिली आहेत गणेश मंडळं. उत्सवासाठी गेल्या महिन्याभरापासून मंडळांची तयारी सुरू होती. देखावा, मिरवणुकांचेही नियोजन झालं होतं. देखावेही तयार होत होते; मात्न या आपत्तीनंतर जवळपास सर्वच मंडळांनी गणेशोत्सवाचे नियोजन रद्द केलं आहे. कोल्हापूर शहरातील सर्व गणेश मंडळांनी यंदा गणेशोत्सवाचा सगळा डामडौल, देखावे, रोषणाई, मोठय़ाने निघणार्‍या मिरवणुका, सजावटी, ईष्र्येने केलं जाणारं वेगळेपण हे सगळं प्लॅनिंग रद्द करून अत्यंत साध्या पद्धतीने हा सण साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. सगळे हेवेदावे, गट-तट विसरून जवळपास दोनशे मंडळांनी एकत्न बैठक घेऊन हा ठराव केला आहे.पुरामुळे गणेशोत्सवातील सगळे कार्यक्रम आम्ही रद्द केले आहेत. मांडव उभारून केवळ श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आणि पूजाविधी केले जातील. मंडळाच्या वतीने कधीच वर्गणी घेतली जात नाही. यंदा हा सगळा निधी पूरग्रस्तांसाठी वापरला जाईल, असं संभाजीनगर तरुण मंडळाचे अध्यक्ष अजित सासणे सांगतात.राधाकृष्ण तरुण मंडळाच्या वैशिष्टय़ाप्रमाणे यंदाही भव्य काल्पनिक मंदिराचा देखावा उभारण्यात येणार होता. आता या सेटचं काम थांबविण्यात आले आहे. या भागातच अनेक नागरिक पूरग्रस्त असल्यानं त्यांना बाहेर काढणे, स्वच्छतेसाठी मदत करणे, जीवनावश्यक वस्तू पुरविणे यात कार्यकर्ते गुंतले आहेत.जुनी बुधवार पेठ तालमीचा चिंचपोकळीचा राजा आणि एस. पी. बॉइज ग्रुपचा चिंतामणी या दोन्ही गणेशमूर्तींचे भव्य मिरवणुकीने आगमन होणार होते. आता त्या रद्द करून महापुरावर देखावा करण्यात येणार आहे. तटाकडील तालीम मंडळाने पारंपरिक बँडवर गणेशमूर्तींचे आगमन आणि विसर्जन मिरवणूक काढण्याचं ठरवलं आहे.राजारामपुरी शिवाजी तरु ण मंडळाचे दुर्गेश लिंग्रस म्हणाले, मंडळाचे यंदाचे 50 वे वर्ष असल्याने 5-6 लाख रुपये खर्चून गणपतीचा भव्य दरबार साकारण्यात येणार होता; आता हे नियोजन रद्द करून साधे मंडप उभारण्यात येणार आहेत. 2005  साली मंडळाने पूरग्रस्तांसाठी निधी दिला होता, यंदादेखील वर्गणीच्या रकमेतून पूरग्रस्तांना मदत केली जाईल.गणपती मंडळं म्हणजे तरुण मुलांची गर्दी. त्यांचा प्रसंगी धांगडधिंगा. मिरवणुका, नाचणं हे सारंच डोळ्यासमोर येतं. पण यंदा हे तरुण कार्यकर्ते हे सारं बाजूला ठेवून पूरग्रस्तांच्या मदतीला सरसावले आहेत.  यंदा पुरामुळे उद्योगधंद्यालाही कोटय़वधींचा फटका बसल्याने अनेक मंडळांनी वर्गणी न मागण्याचा निर्णय घेतला आहे.आर्थिकच नाही तर विविध कामांसाठीची मदतही ते करत आहेत. गणपती मंडळ कार्यकत्र्याचा हा चेहरा अधिक विधायक आणि उमेद मनाशी धरावी असा आहे.

**********

पूरग्रस्तांना घरे बांधून देणार कोल्हापुरातील प्रत्येक गणेश मंडळं व तालीम संस्था किमान 21 हजारांची वर्गणी पूरग्रस्तांसाठीचा निधी म्हणून देणार आहेत. कोल्हापूरकरांसह आलेल्या मदतीतून पूरग्रस्तांना दोन महिने पुरेल इतके अन्न, धान्य व जीवनावश्यक साहित्य देण्यात आले आहे. आता प्रश्न आहे तो पडलेल्या घरांचा. म्हणूनच एकटय़ा मंगळवार पेठेतील 17 तालमी आणि 130 मंडळांनी मिळून किमान 15 पूरग्रस्तांना घरे बांधून देण्याचा संकल्प केला आहे. शहरात साडेतीन हजार तरुण मंडळे नोंदणीकृत आहेत. या सर्व मंडळांच्या सहभागातून किमान तीन कोटी रुपये जमा झाल्यास दीडशेहून अधिक पूरग्रस्तांची घरे बांधणं शक्य आहे, अशी माहिती पाटाकडील तालीम मंडळाचे सदस्य विजय देवणे यांनी दिली. 

(लेखिका लोकमतच्या कोल्हापूर  आवृत्तीत वार्ताहर आहेत.)