शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात मदतीला धावली मुलींचीही व्हाइट आर्मी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2019 07:00 IST

देशातल्या पहिल्या रेस्क्यू टीममधल्या प्रशिक्षित अशा या तरुण मुली. प्रशिक्षणानंतर तीनच महिन्यात त्यांना महापुरात उतरावं लागलं; पण त्या डगमगल्या नाहीत. उलट खंबीरपणे पुरात मदतीला उभ्या राहिल्या.

ठळक मुद्देआर्मी, आपत्ती व्यवस्थापन आणि लढवय्ये कोल्हापूरकर तरुण यांच्या सोबत या ‘आपदा सखी’ आणि व्हाइट आर्मी या संघटनेतील मुली उभ्या होत्या.

- इंदुमती गणेश 

कोल्हापुरातील कुंभी, कासारी, भोगावती, पंचगंगा अशा 15 नद्यांना आलेला महापूर. शेकडो गावं पाण्यानं गिळल्यासारखी. आणि माणसं हतबल. आर्मी आली आणि मग जवान बोटीतून चार-चार नागरिकांना गावातून बाहेर काढू लागले.त्या जवानांबरोबर दिसल्या पांढर्‍या कपडय़ातल्या काही मुली. जवानांच्या  खांद्याला खांदा लावून रेस्क्यू ऑपरेशनमध्ये उतरलेल्या या तरुण मुलींच्या गटाचं नाव आहे ‘आपदा सखी’. म्हणजेच देशातील पहिली महिला रेस्क्यू टीम. या ‘आपदा सखीं’नी पुरुषांच्या बरोबरीने नव्हे, तर अनेकदा  त्यापुढे जाऊन आपल्या क्षमता सिद्ध केल्या. पाण्यात सतत काम करकरून या मुलींच्या पायांना खत लागले आहे. हातापायांना जखमा झाल्या. दिवसरात्न पाण्यात राहून थंडी-तापानं काहींना गाठलं, तर कुणाच्या रक्तदाबाच्या तक्रारी सुरू झाल्या. मात्र अशा परिस्थितीतही त्यांनी आपलं काम एका क्षणासाठीही थांबविले नाही. औषधे घ्यायची, काहीवेळ विश्रांती घ्यायची आणि पुन्हा पाण्यात उतरायचं. त्यांच्या या शौर्याला कोल्हापूरच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्नणेनेही सलाम केला आहे.  मुली नाजूक असतात, त्यांना अवजड कामं झेपायची नाहीत, पुरुषांच्या तुलनेत ताकदीची कामं त्या करू शकत नाहीत आणि पुरासारख्या आपत्तीत त्या काय काम करणार अशा जेवढय़ा म्हणून संशयशंका लोकांना असतील तेवढय़ा सार्‍या या मुलींच्या हिमतीनं आणि कामानं पंचगंगेच्या पात्नात विसर्जित झाल्या. या कोल्हापूरच्या तरुणींनी हजारो नागरिकांचे प्राण वाचवले आहेत. कळा सुटलेली गरोदर महिला, बोटीतच जन्मलेलं बाळ, काही दिवसांपूर्वी या जगात आलेली निरागस बाळं, अंगावरच्या कपडय़ांनिशी घराबाहेर पडलेल्या महिला, वृद्ध, महापुराच्या धास्तीनेच हृदयविकाराचा झटका आलेले अत्यवस्थ रुग्ण, तर कुणाचा झालेला मृत्यू.. या सार्‍यांच्या मदतीला या मुली धावल्या. आर्मी, आपत्ती व्यवस्थापन आणि लढवय्ये कोल्हापूरकर तरुण यांच्या सोबत या  ‘आपदा सखी’ आणि व्हाइट आर्मी या संघटनेतील मुली उभ्या होत्या. त्यांच्या कामाची नोंद घेत, त्यांच्या हिमतीचं कौतुक करणं तर भागच आहे.

***

व्हाइट आर्मी काम कशी करते?

व्हाइट आर्मी या संघटनेत 2008 सालापासून मुली कार्यरत आहेत; तर कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीने मार्च आणि मे महिना अशा दोन टप्प्यांत 93 मुलींना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात आले. प्रशिक्षणानंतर तिसर्‍या महिन्यातच या मुलींना प्रत्यक्ष कामात उतरावं लागलं. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले, शिरोली, कागल, करवीर या तालुक्यांच्या ठिकाणी या मुलींना पोस्टिंग देण्यात आलं होतं.  सैन्यदल आणि ‘एनडीआरएफ’च्या टीम कोल्हापुरात दाखल होण्यापूर्वीच या मुलींनी नागरिकांची सुटका करण्याचं काम सुरू केलं होतं. गावातून सुटका झालेल्या नागरिकांना बोटीतून खाली उतरवून घेणं, बोटीत बसवणं, महिला-लहानग्या बाळांना, मुलांना खांद्याभर पाण्यातून बाहेर काढणं, त्यांना वाहनार्पयत नेऊन सोडणं,  एखादा रु ग्ण असेल तर काठी आणि कापडाची झोळी करून रुग्णवाहिकेर्पयत नेणं, अगदी बोटीतून मृतदेह बाहेर काढण्यार्पयतची सगळी कामं या ‘आपदा सखीं’नी न डगमगता केली आहेत. वरून धो-धो पाऊस पडायचा; त्यातच पहाटे पाच वाजता त्यांचं काम सुरू व्हायचं ते मध्यरात्नी एक-दोन वाजता संपायचं. मोठय़ा हिमतीनं ही व्हाइट आर्मी पुरात उभी राहिलेली दिसली.

***आम्ही सगळ्या महाविद्यालयीन विद्यार्थिनी आहोत. पूर आल्यानंतर सगळ्याजणी पाण्यात रेस्क्यू ऑपरेशनसाठी उतरलो. हे सगळं करताना देशसेवा आणि समाजसेवेची भावना होती. आपणही कमी नाही, उत्तम काम करू हा आत्मविश्वासही या कामानं आला. 10 दिवस पाण्यात राहिल्यानं आम्ही सगळ्या आता आजारी पडलो आहोत; पण तरी काम थांबलेलो नाही.- शुभांगी घराळे ( सदस्य, व्हाइट आर्मी)

***

नागरिकांना वाचवायचं हे एकच ध्येय आमच्यासमोर होतं.  मुली आहोत म्हणून कुठेही डगमगलो नाही, कमी पडलो नाही. देशातील पहिली महिला रेस्क्यू टीम म्हणून आम्ही केलेल्या कामाचं आणि अनेकांना वाचवण्याचं समाधान कमावलं हेच मोठं आहे. - पवित्रा  डांगे ( सदस्य, व्हाइट आर्मी)

 

( इंदुमती लोकमतच्या कोल्हापूर आवृत्तीत वार्ताहर आहे.)

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूर