शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

फक्त 19 वर्षाची कोफी ग्रॅमी अवॉर्ड जिंकते तेव्हा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 07:30 IST

ती फक्त 19 वर्षाची. दाताला अजून ब्रेसेस आहेत, हसते-उसळते कुणाही टीनएजर सारखीच. मात्र तिला नुकताच प्रतिष्ठेचा ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे. तिची ही जमैकन गोष्ट.

ठळक मुद्देही सुरुवात आहे, नव्या संगीताला जगभरातल्या तरुण श्रोत्यांनी आपलंसं करत, खर्‍या अर्थानं व्हायरल करण्याची.

- शिल्पा दातार-जोशी

अमेरिकेतल्या लॉस एन्जेलिस शहरात ‘ग्रॅमी’ हा अतिप्रतिष्ठित पुरस्कार सोहळा असतो. यावर्षी ‘बेस्ट रेगे अल्बम’साठी विजेत्याचं नाव पुकारलं गेलं आणि ती स्टेजवर आली. ब्राउन थ्री-पीस सूट घातलेली एक तरुण मुलगी. फक्त 19 वर्षाची. रेगे हा जमैकन संगीत प्रकार. (आपण फक्त वेस्ट इंडिज सामन्यांच्या वेळी क्वचित ते म्युझिक ऐकलं तर ऐकतो.)कोफी. कोण ही मुलगी? एकदम ग्रॅमी अवॉर्डर्पयत कशी पोहोचली?  दाताला ब्रेसेस लावलेली, टीनएजर मुलगी. संगीत तिच्या आयुष्यात होतंच, आता प्रसिद्धी आली आणि जगभर तिचं नाव पोहोचलं इतकंच. तुला ग्रॅमी पुरस्कार मिळाला तर आयुष्यात काय बदललं असं पत्रकारांनी विचारलं तर ती सांगते, ‘काही फार नाही, फक्त बिझी झाले मी फार!’19 वर्षाच्या मुलीचं आयुष्य बदलून टाकणारी ही कहाणी नक्की काय आहे? तर ती सुरू होते जमैकात.जमैकातील किंग्स्टनच्या बाहेर स्पॅनिश वसाहतीत ती वाढली. एकुलती एक लेक. आईसोबत ती चर्चमध्ये जायची. ती सांगते, मी डोळे उघडले, ऐकायला लागलं तेव्हापासूनच माझ्या कानावर म्युझिक पडतं आहे. तिथंच ती गाणं शिकली, गाणी लिहू लागली.  किशोरवयीन असताना, रेगे संगीताद्वारे प्रेरित होऊन तिनं आपल्याला ते संगीत यावं म्हणून प्रय} सुरू केले. कोफीची एकल आई हौशी अभिनेत्री, कलाकार. आरोग्य मंत्रालयाची कर्मचारी होती. आईबरोबर चर्चमध्ये गेल्यावर तिथं ती गाणं म्हणायची. वयाच्या बाराव्या वर्षीच ती गिटार शिकली. वयाच्या 14व्या वर्षी ती रेगे संगीत व बोल ऐकून स्वतर्‍ गीतं रचायला लागली. प्रोटोजे व क्र ॉनिक्स यांना गुरु मानून तिची काव्यलेखन व गाण्याची तालीम सुरू झाली. पण तिच्या त्या प्रयोगांना कोणत्याही रूढ संगीताची चौकट नाही. कॉफी गिटार वाजवते आणि पियानो, सेलो, व्हायोलिनही. उसेन बोल्ट तिचा फेवरिट. त्याच्यासाठी तिनं एक गाणं लिहिलं होतं. लिजेण्ड नावाचं. ते सोशल मीडियात व्हायरल झालं. त्यानंतर तिनं बर्निग हे गाणं लिहिलं तेही खूप गाजलं. तेच तिचं खरं तर पदार्पण.

तिचं गाणं, त्यातली गोष्ट ही तिची आणि तिच्या वयाच्या मुलामुलींच्या जगण्याचीही गोष्ट आहे.‘टोस्ट’ या तिच्या अल्बममध्ये ते दिसतं. तिची आई घराच्या उंबर्‍यावर बसून आफ्रिकी पद्धतीच्या छोटय़ा छोटय़ा वेण्या घालताना ती हे गाणं गात असते. ब्रीदलेस. परमेश्वराचे आभार मानणारं हे गाणं ती अतिशय सहजपणे गाते. चेहर्‍यावर कोणताही मेकअप नाही; पण प्रतिभेचं तेज मात्न दिसतं. समाजातल्या वेगवेगळ्या गोष्टींवर या संगीतातून भाष्य केलं जातं. मग ते राजकीय, क्र ीडा, कला, सामाजिक, संस्कृती असं कोणतंही असो! कोणावरची तरी स्टोरी पद्यात रचून ती तालात गायली जाते.  ‘लिजेण्ड’ या अल्बमचीही अशीच गोष्ट आहे. तिचे शब्द आणि गिटारच्या साहाय्यानं ते संगीत लोकांसमोर आणण्याची कला तिला लोकप्रियतेच्या शिखरावर घेऊन गेली. डिजिटल जगतानं तिचं ते मोहक आवाजातलं गाणं उचलून धरलं. बर्निग हे गाणं प्रसिद्ध झाल्यानंतर तिला कोलंबियाबरोबर रेकॉर्ड डीलची ऑफर देण्यात आली. अमेरिकेत नृत्य आणि  रेगे संगीताचा अंश असलेल्या पॉपमध्ये रिहाना आणि ‘पॅशनफ्रूट’ ड्रेकने आधीच आपलं स्थान निर्माण केलं होतं. पण कोफीचं संगीत मात्र पॉपमिश्रित रेगे आहे. कोफीच्या या वेगळ्या प्रकारच्या रेगे संगीताला आध्यात्मिक उत्कटतेची झालर आहे. कृतज्ञता, आशा, सकारात्मकता आणि अन्याय याबद्दल लिहिण्याचं तिचं सामथ्र्य तिच्या ‘स्टार पॉवर’इतकंच अस्सल आणि निर्विवाद आहे. कोफी म्हणते, ‘‘काही लोकप्रिय कलाकारांची गाणी जमैकामध्ये कुठेही गायली जातात, इथला प्रत्येकजण त्याच्याशी संबंधित आहे. परंतु सर्व कलाकार परदेशात मुख्य प्रवाहात उडी मारण्यात अजून सक्षम नाहीत. हिट होणं हे बरेचदा आर्थिक उत्पन्न मोजण्याचं परिमाण झालंय. पण माझं संगीत मला जास्त महत्त्वाचं वाटतं.’’ जमैकाच्या स्पॅनिश टाउनबाहेर अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक व मिशेल ओबामा यांच्यासमोर तिनं अल्बम सादर केला होता. सर्वोत्कृष्ट रेग अल्बमसाठी ग्रॅमी घरी नेणारी आतापर्यंतची पहिली महिला कलाकार आहे.आता तिचं नाव जगभर गाजतं आहे.ही सुरुवात आहे, नव्या संगीताला जगभरातल्या तरुण श्रोत्यांनी आपलंसं करत, खर्‍या अर्थानं व्हायरल करण्याची.

(शिल्पा मुक्त पत्रकार आहे.)