शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

खटकाळे ते कराड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2017 06:00 IST

कराडला जायचं कसं हे माहिती नसताना मी त्या गावात अ‍ॅडमिशन घेतली आणि त्यानंतर तिथंच जगायलाही शिकलो..

खटकाळे. सह्याद्रीच्या डोंगररांगांत आणि माणिकडोह धरणाकाठी वसलेलं एक गाव. माझं प्राथमिक शिक्षण पहिली ते दुसरी गावात, तर तिसरी ते चौथी मामांच्या निमिगरी या गावात झालं. माध्यमिक शिक्षण मी जुन्नरला बोर्डिंगमध्ये राहून घेतलं. अनेक अडचणी, समस्या यांना तोंड देत दहावी पास झालो. मुळात अकरावीला कशाला अ‍ॅडमिशन घ्यावं याचा मेळ बसेना. सर्वच सायन्सला जातात म्हणून मी पण सायन्सला जाण्याचा हट्ट धरला. परंतु मला इंग्रजीला मार्क कमी होते. त्यामुळे तुला ते जमणार नाही, असंही सारे सांगत होते. शेवटी सायन्सलाच प्रवेश घेतला. बारावीसुद्धा पास झालो. आता मला तर इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी करायचे नव्हते. मला शेती आणि झाडांची खूप आवड असल्यामुळे अ‍ॅग्रिकल्चरला अ‍ॅडमिशनसाठी फॉर्म भरला. पहिल्या तीन लिस्ट लागल्या परंतु माझा नंबर लागलाच नव्हता. घरचे आता बोलत होते, इकडे बीएस्सीला अ‍ॅडमिशन केलं असतं. आता एक वर्ष वाया जाणार. पण चौथी लिस्ट लागली. माझा नंबर कराड येथील दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालय, राजमाची येथे लागला. आनंद झालाच.पैशांची जुळवाजुळव करून आम्ही त्याच रात्री मामाच्या मुलासोबत पुण्याकडे मोटारसायकलवर रवाना झालो. त्यात पाऊस आणि अवसरीच्या घाटात आमची मोटारसायकल बंद पडली. त्यानंतर ढकलत पंक्चर काढून आम्ही रात्री २ वाजता पुण्यात पोहोचलो. कारण मला सकाळी कराडला पोहोचायचं होतं आणि हे मला दुपारी ३ वाजता समजलं होतं. खरंतर मला कसं जायचं तिथवर हे पण नीट माहिती नव्हतं. मामाच्या मुलासोबत पुण्यावरून पहाटे निघून सकाळी आम्ही कराडला पोहोचलो. एसटी स्टँडवर तोंड धुवून मी व माझ्या अ‍ॅडमिशनला आलेले सांगलीचे चुलत चुलते आम्ही कॉलेजला जाऊन अँडमिशन केलं.कॉलेज आणि हॉस्टेल लाइफ सुरू झालं. ओळखीचं कोणीच नव्हतं. त्यामुळे काही दिवस फक्त वाचन आणि मोबाइल यांच्यात गेलं. हॉस्टेलमध्ये जुन्नरचाच अक्षय आणि धुळ्याचा देवीलाल हे मित्र झाले. एकामेकांबद्दल प्रचंड आपुलकी आहे. माझे आवडते माणिकसर यांच्यामुळे खूप गोष्टी शिकलो. नुस्तं कराडच पाहिलं नाही, तर सातारा शहर, कोरेगाव, पाटण, कराड यांच्या ग्रामीण भागातही फिरलो. तेथील संस्कृती, राहणीमान, जीवनमान, चालीरीती समजून घेतल्या. माणसं जोडत होतो. प्रेमाची. वसतिगृहात राहत असताना तेथील अनेक समस्यांबाबत संघर्ष केला. या दिवसांत मी खूप घडलो.आज मी कोल्हापूरमधील गव्हर्नमेंट कॉलेजला एमएस्सी करतो आहे. अनेकदा साध्या राहणीमुळे काही लोक नावंही ठेवत. पण त्याचं दु:ख वाटलं नाही. आजही मी साधाच राहतो. कारण मला वाटतं की साधी राहणी आहे, त्यात समाधान आहे. माझ्यासोबत मी जोडलेली जिवाभावाची माणसं आहेत. आत्मविश्वासही आहे. या प्रवासानं मला हेच शिकवलंय..

- नवनाथ हिराबाई गोपाळ मोरे मु. खटकाळे, पो. निमिगरी,ता. जुन्नर, जि. पुणे