शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
2
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
3
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
4
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
5
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
6
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
7
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
8
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
9
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
10
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
11
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
12
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
13
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
14
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
15
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
16
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
17
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
18
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
19
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
Daily Top 2Weekly Top 5

अपडेट राहा, नाहीतर बाजूला व्हा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 13:45 IST

एकेकाळी जातं घरची लक्ष्मी होतं, आज घरात जातं आहे का? ते का अडगळीत गेलं? - उपयुक्तता संपली म्हणून! आपली उपयुक्तताही अशीच संपली तर?

ठळक मुद्देहायर अ‍ॅण्ड फायर जमाना आहे.

विकास बांबल 

माझ्या लहानपणी आमच्या घरी, घराच्या एका कोपर्‍यात जातं होतं. आमची आजी, आई त्यावर तूर भरडायची, डाळ तयार करायची. मी तर असं ऐकलं की, तेव्हा चक्की वगैरे काही नव्हतं. जात्यावरचं गहू-ज्वारीपण दळायचे. आम्ही नंतर काही कारणास्तव भाडय़ाच्या घरात राहायला गेलो तरी आईने जातं काढून सोबत घेतलं. जिथे हाताला काम मिळेल ते आमचं गाव असाच आमचा त्याकाळी मुक्कामाचा पत्ता होता.दोन-तीन घरं बदलली असेल, पण आईने सोबत जातं घेतलंच. भक्कम वजनाचं जातं होतं. आता त्यावर ती पूर्वीएवढं कामसुद्धा करत नव्हती तरीसुद्धा जातं आईला पाहिजेच होतं.काळ बदलला, दिवस लोटले आता आमचं स्वतर्‍चं मोठं घर आहे. भाडय़ाच्या सगळ्याच घरांत जातं बसवून शकत नव्हतो; पण आता घरात मोठी ऐसपैस जागा आहे. पण जातं मात्न गच्चीवर अडगळीच्या सामानात टाकून दिलेलं आहे.कदाचित आम्ही ते जातं सोबत आणलंसुद्धा नसतं, पण आईचं जात्यावर प्रेम आहे त्यामुळे ते आणावं लागलं. मात्र त्याचा काही रोज उपयोग नव्हता त्यामुळे ते ठेवून द्यावं लागलं. असं फक्त आमच्याच घरी झालं का?तर नाही. अनेक घरात जातं होतं, ते कालबाह्य झालं. एकेकाळी हे जातं म्हणजे लक्ष्मी. त्याला चुकून जरी पाय लागला तरी मोठी चूक होत असे. घरातले रागवत. पण आज त्याची जागा अडगळीच्या खोलीत आहे. कधीतरी ते पूजतही असतील; पण केवळ उपचार म्हणून. एरव्ही ते गच्चीत एका कोपर्‍यात पडून राहतं. धूळ आणि जाळीजळमटी लागतात त्याला.हे सारं काय आहे?जातं म्हणा, पाटा-वरवंटा म्हणा या सार्‍या गोष्टी जीवनावश्यक गोष्टी होत्या. मग आज त्यांची गरज का संपली?यावरून एक गोष्ट लक्षात येतं की, जात्याची जागा तोवर होती जोवर त्याच्यामध्ये माणसाच्या त्या वेळच्या गरज पूर्ण करण्याची क्षमता होती. त्याशिवाय काम होत नसे. मदत म्हणून तेच वापरलं जायचं. पण आज जात्याला पर्याय उपलब्ध झाले. मिक्सर तर घरोघरी आले. चक्की (दळणकेंद्र) गल्लोगल्ली झाली. चक्की, मिक्सर आल्यापासून जात्याचं महत्त्व कमीच झालं. आता तर त्यापुढे जात चक्कीवरही न जाता अनेक घरात डायरेक्ट पीठच यायला लागलं. म्हणजे चक्की हवीच हा नियमही काही सर्वकाळ सत्य उरला नाही. जे या यंत्राचं तेच माणसांचंही होतच ना. शेवटी आपण ‘अपडेट’ होणं, कालानुरूप बदलणं याची चर्चा करतो ते नेमकं काय आहे. मनुष्याच्या बाबतीत ही हाच नियम थोडय़ाफार फरकाने लागू होतो. जोवर मनुष्यामध्ये कुणाची गरज पूर्ण करण्याची क्षमता आहे तोवर जगात त्याला किंमत आहे. एकदा का आपली गरज पूर्ण करण्याची क्षमता संपली की त्या जात्यासारखं अडगळीच्या ठिकाणी जाऊन पडावं लागेल.त्या जात्याचं तरी नशीब चांगलं आहे की माझ्या आईच त्या जात्यावर, जात्यावरचं नव्हे तर तिने स्वतर्‍च्या कमाईवर घेतलेल्या प्रत्येक वस्तूवर तिचं प्रेम आहे म्हणून त्या वस्तूंची घरात अडगळीची का असेना पण जागा आहे.पण नव्या अत्यंत व्यावसा¨यक जगात अशा भावनांना मोल नसतं. हायर अ‍ॅण्ड फायरचा जमाना आहे. तुमची उपयुक्तता सिद्ध करा नाहीतर बाजूला व्हा, पर्याय आहेत असं चित्र सर्वत्र आहे.आपल्याविषयी आपलं कुटुंब सोडलं तर या जगाला माया आहे का? आणि असली तरी ती कुठर्पयत सीमित आहे हे आपण जाणतोच. कारण कुटुंबासाठी आपण अख्ख जग असतो तर जगासाठी आपण केवळ एक व्यक्ती असतो. आज आपण कुणाच्या कामी येतो, आपल्याजवळ काही तरी आहे म्हणून आपली किंमत आहे. अर्थात कुटुंबाला तरी आपण प्रेम, वेळ, आपलं सहकार्य देतोय का हे तपासून पाहिलं पाहिजे. नाहीतर कुटुंब तरी आपल्याला कितीकाळ बांधून घालेल?पेनाची रिफिल एकदा संपली की पेन फक्त खिशाला शोभा बनून राहातो किंवा फेकून दिला जातो. त्याची उपयुक्तता संपते. अशा अनेक गोष्टी आपल्या आवतीभोवती आहेत, मग आपण तरी अपवाद का असू?यावरून आपण एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. एकदा का आपली गरज पूर्ण करण्याची क्षमता संपली की आपण बाजूला केले जाऊ. एखाद्या अडगळीच्या ठिकाणी जाऊन पडावं लागेलं.त्यामुळे आयुष्यात गर्दीचा भाग न होता स्वतर्‍च पर्याय नसणारं एकमेवाद्वितीय असं व्यक्तिमत्त्व घडवावे लागेल. ज्या दिवशी आपल्याला पर्याय म्हणून कोणी उपलब्ध झालं त्या दिवसापासून आपले मूल्य घटलेच म्हणून समजा. आणि हे असंच होणार असेल तर आपण एकच करू शकतो. ते म्हणजे बदलू शकतो. कालानुरूप जगू शकतो. आपले स्किल बदलू शकतो. स्वभाव, वृत्ती बदलू शकतो. माणसांना जोडून राहू शकतो. नवीन बदल आत्मसात करणं, तंत्नज्ञान अवगत करणं हेच अपडेट आणि कालसुसंगत राहण्यासाठीचे मार्ग आहेत. स्वतर्‍ला नवनवीन तंत्नज्ञान आणि बदलांचं रिफिलिंग सतत करत राहू. तरच आपण नव्या काळात आनंदानं जगू. कायम काळासोबत चालू! अडगळीत जाणार नाही.