हाताला कामच नाही, असं म्हणत रडत बसाल तर पस्तावाल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 07:25 PM2020-06-25T19:25:50+5:302020-06-25T19:30:59+5:30

सुगी येईलच; पण त्यासाठी आज आपण कष्ट पेरलेले असले पाहिजेत.

jobless, no work, try new things, change your aprroch. | हाताला कामच नाही, असं म्हणत रडत बसाल तर पस्तावाल.

हाताला कामच नाही, असं म्हणत रडत बसाल तर पस्तावाल.

Next
ठळक मुद्देतेजी येईल, तेव्हा तुम्ही कुठं असाल?

- अजित जोशी

नव्या आर्थिक वर्षाची पहाट उजाडता उजाडता, नेमकी आपल्या देशावर कोविडची काळरात्न पसरली आणि आख्खा देश अक्षरश: जागच्या जागी थिजून गेला. आधीच डबघाईला आलेली अर्थव्यवस्था आणि त्यात कोविडमुळे थांबलेले व्यवहार यामुळे ज्याला त्याला आपल्या पोटाची चिंता सतावायला लागली.
पण यात सगळ्यात जास्त संकट आलं, ते तरुणाईवर. त्यांना चार पैसे कमावून देऊ शकण्याची क्षमता असलेलं शिक्षण थांबलं. त्यांच्या कुवतीवर मोहोर उमटवणा:या परीक्षांवर सावट आलं. ते डोळे लावून बसतात त्या कॅम्प्स प्लेसमेंटचं तर कोणी नावच काढत नाही.
इतरांचं वर्तमान थबकलं असेल, तर तरु णाईला आपला भविष्याचा गाडाच जणू रुतलाय का काय असं नक्की वाटू शकतं.
पण शेअर बाजाराचा एक सिद्धांत आहे. बाजाराच्या मूलभूत क्षमतांवर विश्वास असेल तर किमतीत होणारी पडझड ही गुंतवणुकीची संधी म्हणून पाहिली पाहिजे. 
आजच्या तरुणाईला सध्या निराश वाटू शकतं. पण हेही लक्षात घ्यायला पाहिजे की अर्थव्यवहार एव्हढय़ा तळाला पोहोचले आहेत, की ते आता अजून फार खाली जाऊच शकणार नाहीत. किंबहुना गेले तर वरच जातील. हां, त्याला वेळ जरूर लागेल. पण आत्ता यावर लक्ष केंद्रित करायला हवं, की ही गंगा जेव्हा परत आपल्या मूळ प्रवाहाने वाहायला लागेल, तेव्हा त्यात नेमकेपणी आपलं घोडं कसं न्हाऊन घ्यायचं?
थोडक्यात, भविष्यात जेव्हा तेजी येईल तेव्हा आपण योग्य वेळी, योग्य त्या ठिकाणी कसे असू, जेणोकरून आपल्याला त्याचा फायदा घेता येईल?
1. यात सगळ्यात पहिला मुद्दा आहे शिक्षणाचा. माहितीच्या महाजालाने आपल्यार्पयत नुसतं टिकटॉकच आणलंय असं नाही, तर शिक्षणाच्या अफाट संधीही आणलेल्या आहेत. यू-टय़ूबवर तुम्हाला हव्या त्या ज्ञानशाखेचं नुसतं नाव घ्या आणि अक्षरश: लाखो व्हिडिओ उपलब्ध होतात. 
कोर्सेरासारख्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला चार आकडय़ातल्या फीमध्येसुद्धा ब्लॉकचेन ते आर्टिफिशियल इंटलिजन्स अशा असंख्य नव्यानव्या क्षेत्नातली सर्टिफिकेटसुद्धा मिळतात. हे अभ्यासक्रम अगदी किमान शिक्षण असलेल्याला समोर ठेवून बनलेले असतात. ते येल किंवा स्टॅनफोर्डसारख्या नामांकित विद्यापीठांनी दिलेली असतात. त्यात भरपूर प्रात्यक्षिक आणि समजून घेत शिकायला जागा असते. अनेकदा तर ती अगदी हिंदीतूनही शिकता येतात. आज आपल्या पारंपरिक विद्यापीठातल्या पदव्यांची काय अवस्था आहे, हे आपल्याला माहीत आहे. पण मोठय़ा मोठय़ा कंपन्याही नोक:या देताना या प्रमाणपत्नांना पदव्यांपेक्षा जास्त मोल देतात. पुन्हा तुम्हाला जर नुसती एखादी गोष्ट अवगत करायची असेल आणि प्रमाणपत्नाची गरज नसेल तर अनेकदा हे कोर्सेस मोफतही करता येतात.
2. दुसरा मुद्दा आहे तो नोक:यांचा. त्याच्याकडे वळण्याआधी आपण एक परिस्थिती समजून घेऊ. अनेक कंपन्यात असं होतं, की एका विशिष्ट नोकरदारांचा वर्ग कंपनीला महागडा व्हायला लागतो. म्हणजे वर्षानुवर्षाच्या पगारवाढीने सहसा चाळिशीत ते पन्नाशीत असलेल्या या मधल्या फळीतल्या लोकांचा पगार बराच लठ्ठ झालेला असतो. त्यामानाने त्यांची उपयुक्तता तेव्हढी असतेच असं नाही. आता नेहमीच्या काळात अशा लोकांचा काही फार बोजा कंपनीला असतो, अशातला भाग नाही. पण अशा जबरदस्त मंदीच्या काळात अशा लोकांना डच्चू दिला जाण्याची शक्यता असते. त्या ठिकाणी कंपनी मग त्यापेक्षा थोडी कमी उपयुक्तता असलेला; पण बराच कमी पगार घेणारा एखादा तरुण माणूस निवडते. यामुळे आपोआप खालपासून वर चढती भाजणी लागते. आज आपण कुठे आहोत, हे पाहात असताना तरुणांनी या घटनेचा विचार करायला हवा आणि आपल्याला अशा संधी कशा मिळतील, त्याची तयारी करायला हवी. यासाठी  मी बरा की माझं काम/अभ्यास बरा हा दृष्टिकोन उपयोगी नाही. आपण ज्या क्षेत्नात आहोत किंवा जाऊ इच्छितो, त्या क्षेत्नाची/कंपनीची आपल्याला नीट माहिती हवी. त्या क्षेत्नातल्या मोठय़ा कंपन्या, त्यांची उत्पादनं, त्यामागचं तंत्नज्ञान, प्रक्रि या, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भविष्यात होऊ शकणारे बदल, अशा गोष्टी नीट जाणून घ्यायला आज भरपूर वेळ हाताशी आहे, तो वापरला पाहिजे. कोणाची जावो न जावो आणि कोणाला मिळो न मिळो, मला संधी कशी मिळेल, किमान हातची कशी जाणार नाही, याचा विचार करायला आत्ताच मोका आहे. मंदीत माझं कसं होईल असं रडत बसलं तर तुमचं नैराश्य हाती येऊ पाहणारी संधी गमावून बसेल.
3. आजचा जमाना स्टार्टअप किंवा स्वयंउद्योगाचा आहे. कोविडने नव्या आणि जुन्या उद्योगातही अनेक संधी निर्माण केलेल्या आहेत. शिवाय स्वत:चा उद्योग म्हणजे दरवेळेला काही डिजिटल तंत्नज्ञान वापरून केलेला प्रचंड मोठय़ा पातळीवरचा चमत्कारच असतो, असं नाही. अशा चमत्काराच्या मागे लागून आणि निव्वळ हौस म्हणून स्टार्टअप करून असंख्य उत्साही मंडळी खड्डय़ात गेलेली आहेत. उद्योग करावा, तो करायचा म्हणून नव्हे, तर तुम्ही जे विकताय ते विकण्याची तीव्र इच्छा आणि विश्वास तुमच्यात असला पाहिजे, म्हणून ! म्हणूनच मध्यंतरी ही बातमी आली, की लॉकडाऊनच्या काळात अनेक तरुण तरुणींनी चक्क घरोघरी मासळी पुरवण्याचा व्यवसाय सुरू केला आणि यशस्वीही ! आपल्या मालाची/सेवेची उपयुक्तता, असलेली किंवा येऊ शकत असलेली स्पर्धा आणि भविष्यातल्या वाढीची शक्यता, या तीन चाचण्यांवर आणि आकडय़ांची भाषा वापरून आपल्या धंद्याला घासून पाहिलं, तर तुम्हाला नक्की यश मिळेल. कोविडने अशा संधी अधिकाधिक निर्माणही केलेल्या आहेत.


4. मात्न या सगळ्या चर्चेत एक लक्षात घ्यायला हवं, की गेल्या काही वर्षात, खासकरून डिजिटल क्र ांतीनंतर आर्थिक (किंवा खरं तर एकूणच मानवी) व्यवहार बदलत आहेत. कोविडने या प्रक्रियेला वेग दिलेला आहे. काही दरवाजे बंद होतायत, हे खरंच. पण अनेक इतर किलकिले होतायत, ते वेळेत पाहायला हवे. याचं एक उदाहरण आहे शेतमालावरच्या प्रक्रि येचं ! शेतमालाच्या पडत्या किमती आणि जमिनीचे घटते आकार, ही समस्या जरूर आहे. पण शेतमालावर प्रक्रि या केली, त्याचं चांगलं पॅकेजिंग केलं आणि त्यात मूल्यवाढ सध्या झाली, तर चांगलं उत्पन्न येऊ शकतं, या संधी आहेत. कोविडच्या काळात अशा मालाची मागणी वाढते. आज शहरात शिकून तिथली मानसिकता जाणणारा आणि गावातून आलेला असल्यामुळे शेतीच्या ट्रिक्स समजू शकणारा असा एक मोठा तरुण वर्ग आहे. त्याला या व्यवसायात उज्ज्वल भविष्य असू शकतं. पुन्हा सरकारही नेहमी अशा धडपडीला आधार देतं. त्याचा फायदा घेण्याची हीच वेळ आहे. जगातल्या व्यवहारातल्या मूलभूत बदलांकडे आपल्याला जागरूकतेने पाहायला हवं, तरच या काळरात्नीचा शेवट जवळ दिसायला लागेल.
प्रहार चित्नपटाच्या एका गाण्यात सुंदर ओळी आहेत..
‘जिन पर हैं चलना नई पिढ़ीयों को, उन ही रास्तों को बनाना हमें हैं’
कोविडने आपल्या तरु ण पिढीला येणा:या पिढय़ांच्या वाटा बनवायची संधी दिली आहे. पण तिचा फायदा घ्यायचा, तर याच गाण्याची पहिली ओळ लक्षात ठेवून, तिच्यावर कायम भरवसा ठेवायला हवा.
हमारी ही मुठ्ठी में, आकाश सारा.. 


(लेखक सीए आणि व्यवस्थापन संस्थेत असोसिएट प्रोफेसर आहेत.)

 

Web Title: jobless, no work, try new things, change your aprroch.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.