शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

आईषी घोष नावाच्या तरुणीच्या हिमतीचा प्रवास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 07:00 IST

एका लहानशा गावातून आली आहे ती. दिल्लीचं तोंड बघेर्पयत जणू लाजाळूचं झाडच होती! पण जेएनयूने या मुलीला पंख दिले. बदलत्या भवतालाशी नजर भिडवत, अवघड प्रश्न विचारत जगल्या-तगलेल्या या पंचविशीतल्या मुलीची हिंमत मोठी विलक्षण आहे!

ठळक मुद्देमेरे लहू से सूरज निकलेगा..

-शर्मिष्ठा भोसले 

एक कोवळी तरुणी. तिच्या फुटलेल्या डोक्यावरून रक्ताचा भळभळता ओघळ वाहतोय, अध्र्याहून अधिक चेहरा माखलाय. एक हातही जायबंदी झालेला. तरीही ती बोलत राहतेय. या सगळ्यात बाजूचे कुणीकुणी तिच्या डोक्यावर कपडा झाकून, इतरही काय काय धडपड करत जखमेतून वाहत्या रक्ताला थोपवू पाहतात.दुसरी एक तिचीच समवयीन. अर्धवट अंधारलेल्या इमारतीत उभी. रुमाल बांधून चेहरा झाकलेला. शर्ट-जीन्स अशा पेहरावात, हातात दंडुका घेऊन अत्यंत गुर्मीत उभी आहे. - जेएनयू, अर्थात, जवाहरलाल नेहरू विद्यापीठात 5 जानेवारीच्या संध्याकाळी वसतिगृहातील विद्यार्थी आणि प्राध्यापकांवर झालेल्या हिंसक हल्ल्यानंतर दोनच प्रातिनिधिक इमेजेस सोशल मीडियासह लोकांच्याही मनामेंदूत तरंगत राहिल्या. काही अपवाद सोडले तर नकाबपोश बनत हातात दंडुका घेतलेल्या तरु णीचा धिक्कार आणि वाहत्या जखमेला जमेस न धरता हल्ल्याचा निषेध करणार्‍या आईषीची वाहवाच झाली. आईषी घोष. एका लहानशा गावातून आलेल्या, दिल्लीचं तोंड बघेर्पयत जणू लाजाळूचं झाड असलेल्या पंचविशीच्या पोरसवदा तरुणीत ही इतकी ताकद, हिंमत आली कुठून? तिच्या आसपासचा भवताल शिकणार्‍या, बोलणार्‍या, सवाल करणार्‍या मुली-स्रिया बघून भुवया उंचावणारा. त्यात ही मात्न या भवतालाशी नजर भिडवत, अवघड प्रश्न विचारत कशी जगली-तगली? कुणाच्या गावीही नसलेल्या गावात जन्मून देशाच्या राजधानीर्पयत पोहोचत तिनं दिल्ली कशी गाजवली? गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये ‘जेएनयू’मध्ये झालेल्या विद्यार्थी निवडणुकीत ‘जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी स्टुडण्ट्स युनियन’ची (जेएनयूएसयू) अध्यक्ष असलेली आईषी मूळची पश्चिम बंगालमधल्या बुर्दवान गावची. वडील देबाशिष, ‘दुर्गापूर थर्मल पॉवर स्टेशन’चे कर्मचारी आणि आई शर्मिष्ठा घोष गृहिणी. दुर्गापूर म्हणजे ‘इंडस्ट्रीयल हार्टलॅन्ड’. तिथल्या कामगारांच्या युनियन्स, त्यांचे प्रासंगिक, सार्वकालिक लढे बघतच आईषी लहानाची मोठी झाली. तिचे वडील देबाशिष रेव्हल्युशनरी सोशलिस्ट पार्टीचे (आरएसपी) सदस्य होते. ‘जेएनयू’मध्ये शिकणार्‍या विद्याथ्र्याना देशद्रोही, अ‍ॅण्टीनॅशनल यांसह सुमार, फुकटे अशी असंख्य विशेषणं काही प्रवृत्तींकडून लावली जातात. मात्न आईषीनं दहावीत 90 टक्के आणि बारावीत 93 टक्के मिळवत टक्केवारीच्या आधारावर जोखली जाणारी गुणवत्ताही कधीचीच सिद्ध केलेली आहे. आईषी लहानाची मोठी झाली दुर्गापूरमध्ये आणि उच्चशिक्षणासाठी तिनं दिल्लीचा रस्ता धरला. ‘जेएनयू’मध्ये आईषी सध्या ‘स्कूल ऑफ इंटरनॅशनल रिलेशन्स’ या विभागात संशोधन (पीएच.डी.) करते आहे. अजून पुढची चार-ते पाच वर्षे ती या विद्यापीठाची विद्यार्थिनी असेल. आईषीची धाकटी बहीण इशिकासुद्धा सध्या दिल्लीतच शिक्षण घेतेय.दिल्लीत दौलतराम कॉलेजमध्ये शिकत असतानाच ती विद्यार्थी आंदोलनांमध्ये सक्रि य झाली. पुढं ‘जेएनययू’मध्ये प्रवेश घेतल्यावर ती ‘एसएफआय’ (स्टुडण्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया) या विद्यार्थी संघटनेत सहभागी झाली. दिल्लीला येण्याआधी मात्न ती होती एक लाजरीबुजरी, नाकासमोर पाहून चालणारी, खालमानेनं वावरणारी मुलगी. तिचं कुटुंब या हल्ल्याच्या घटनेनंतर अर्थातच तिच्या सोबत खंबीरपणे उभं आहे. तिच्या आईसाठी मात्न तिचं हे धाडसी रूप अगदीच अनोळखी. शर्मिष्ठा यांची प्रतिक्रि या होती, ‘‘कदाचित कामगार संघटनेत सक्रि य राहिलेल्या तिच्या वडिलांकडून तिनं जाणता-अजाणता लढाऊपण मिळवलं असेल. लहानपणी इथं गावपातळीवर तिच्यातली ही अन्यायाविरु द्ध उभं राहण्याची धमक जगासमोर यायला तसा मंचही नव्हताच उपलब्ध. ‘जेएनयू’नं मात्न तिच्यातला संघर्ष पुरेपूर जागवला. आम्हा दोघांनाही तिचा अभिमानच आहे. कारण ती स्वतर्‍साठी नाही, तर सामान्य, गरीब विद्याथ्र्याच्या हक्कासाठी तळमळीनं उभी आहे.’’ 

दौलतराम कॉलेजातून आईषीनं राज्यशास्नत पदवी मिळवली. तिथं शिकताना आजूबाजूचं विद्यार्थी जीवनातलं वास्तव ती जवळून निरखत राहिली. होळीच्या काळात विद्यार्थिनींवर रंगाचे फुगे फेकून मारणार्‍या मुलांची हुल्लडबाजी तिच्यावरही येऊन आदळली. अनेक अन्यायकारक शैक्षणिक निर्णय तिच्यासह सहकारी विद्याथ्र्यावर लादले गेले; पण त्यावेळी ती शांत राहिली. मात्न ‘हे सगळं रोखलं पाहिजे, त्यासाठी विधायक हस्तक्षेप करणार्‍या विद्यार्थी राजकारणात उतरलं पाहिजे’, हे तिनं मनोमन ठरवलं.

 ‘जेएनयू’मध्ये प्रवेश घेतल्यावर विद्यार्थी चळवळीचं मोल उमजलेले अनेकजण तिला नव्या काळातच भेटत राहिले. ज्यांच्याजवळ गमवायला काहीच नाही अशा तरुणांसह इतरही विद्याथ्र्यानी उभारलेले लढे तिला कमालीचे संमोहित करून गेले. विद्याथ्र्याच्या मेसचे प्रश्न ते देश वा जागतिक पातळीवर विद्याथ्र्याना फटका बसेल असं एखादं धोरण सगळ्यांवर या संघटना चर्चा करायच्या, कृतीकार्यक्र म राबवायच्या. हरेक थरांतून आलेल्या विद्यार्थिनींना सतावणारे प्रश्न या मंचाच्या माध्यमातून सोडवले जायचे. ती म्हणते, ‘क्यूं न मै भी इन आवाजोंमें एक आवाज बनूं, उन करोडो महिलाओंके लियेभी बात रखू जो बाहरी जिंदगीमें जुझ रही है.’ 5728 मतांपैकी 2313 मतं मिळवत निवडून आलेली आईषी विद्याथ्र्याचे जीवन-मरणाचे प्रश्न सातत्याने लावून धरत असल्यानेच विद्यापीठ प्रशासनासह केंद्र सरकारचाही तिच्यावर रोष असल्याचं तिच्यासह अनेकांचं म्हणणं आहे. ‘जेएनयू’ हे केंद्रीय विद्यापीठ. त्याचं प्रशासन, नियमन सगळं केंद्रशासनाच्या अखत्यारीत. काही काळापूर्वी तिथल्या फीची रचना, हॉस्टेल्सचं भाडं आणि इतर शुल्कात केंद्र शासनाने अव्वाच्या सव्वा वाढ केलीय. त्याविरु द्ध विविध विद्यार्थी संघटनांचा लढा सुरू आहे. आरु षी अर्थातच त्यात सक्रि य आहे. तिच्या घरची आर्थिक परिस्थिती पाहता ही शुल्कवाढ तिच्यासाठी परवडणारीच आहे; पण ‘या विद्यापीठात शिकणारे तब्बल 40 टक्के विद्यार्थी अतिशय प्रतिकूल आर्थिक-सामाजिक-सांस्कृतिक वर्गातून येतात’ हे वास्तव तिला नीटच माहिती आहे. हिंसेचं प्रकरण झाल्यावर विविध वृत्तवाहिन्यांनी आईषीच्या मुलाखती घेतल्या. अजिबात भावनिक न होता अतिशय मुद्देसूद, तर्कसंगत पद्धतीने ती आपलं म्हणणं मांडत राहिली. यापुढेही फीवाढ, नागरिकता संशोधन कायदा अशा गोष्टींविरु द्धचा आमचा लढा अहिंसक आणि शांततेच्या मार्गानेच सुरू राहील हे ती आग्रहाने सांगत राहिली. सप्टेंबरमध्ये निवडणुकीत विजय मिळाल्यावरही, ‘मै चुनकर आई ये अच्छा तो लग रहा है लेकीन ये सब काममेंभी दिखना चाहिये इसपर मै विश्वास रखती हूं. सिर्फ चुनावी जीत मायने नही रखती. सालभर आप मेरा काम देखिये’, अशी प्रगल्भ प्रतिक्रि या तिनं दिली. ‘विद्यापीठात नवे पुतळे उभारू नका, मुलींच्या वसतिगृहातल्या स्वच्छतागृहांची अवस्था सुधारा. माध्यमं सतत आम्हाला जाब विचारत राहतात, की तुम्ही विद्यार्थी सरकारच्या धोरणांवर भाष्य-टीका का करता? तुम्ही तुमचं बघा. मात्न इथं माझ्यासोबत शिकणारे काश्मिरी विद्यार्थी गेले कित्येक महिने आपापल्या घरच्यांसोबत फोनवरही बोलू शकलेले नाहीत, ते सरकारच्या धोरणांमुळेच ना? सरकारी विद्यापीठं खिळखिळी करत खासगी विद्यापीठांना वाटा मोकळ्या केल्या जाताहेत त्यामागे सरकारच आहे ना? मग का बोलायचं नाही आम्ही विद्याथ्र्यानी सरकारविरु द्ध?’ असे अत्यंत संयत सवाल ती विचारते. हलका बांगला भाषेचा लहेजा असलेलं हिंदी, अस्खलित इंगजी आणि ठाम, तार्किक बोलणं ऐकणार्‍याला तिचं वय विसरायला लावतात.येत्या काळात विद्यापीठातील विद्याथ्र्याना मानसिक समुपदेशनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, विद्यापीठातील आरोग्यकेंद्र 24 तास सुरू असावं अशा अनेक मागण्या लावून धरण्यावर आईषीचा भर असणार आहे. विद्यापीठाचे कुलगुरुराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अजेंडे राबवत असल्याचा थेट आरोपही तिनं केलाय. तिची नेता म्हणूनची वैचारिक स्पष्टता साहजिकच विद्यापीठाच्या आतील आणि बाहेरील सत्ताधार्‍यांना धोक्याची वाटते आहे.‘जेएनयू’मध्ये गेल्यावर विविध अनोख्या गोष्टींमध्ये सतत लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे तिथल्या विविध विभागांच्या, हॉस्टेल, मेस, लायब्ररीच्या भिंती. नागार्जुन, पाश, भगतसिंग, फैज अहमद फैज अशा विद्रोही कवी-शायरांसह जग बदलायला शिकवणार्‍या विविध फिलॉसॉफर्सच्या ओळी कॅम्पसभर तुम्हाला हाका मारत राहतात. संघर्ष करणार्‍या, बोलणार्‍या लढणार्‍या जिवंत माणसांची रेखाटनं, ‘सिस्टम’ला उपरोधानं फटकारणारी व्यंगचित्नं भिंतीभिंतींवर रंगवलेली असतात. या बोलत्या, गात्या भिंतींनीच आईषी आणि तिच्यासारख्या असंख्य ‘लढाई-पढाई साथ साथ’ करणार्‍या तरुणांना जणू ऊर्जा पुरवलीय.. ‘आम्ही काहीच चुकीचं बोललो, वागलो नाहीत. आमच्यावर झालेल्या हिंसेमुळे, दडपशाहीमुळे आम्ही भिऊ वा विचलित होऊ हे तर शक्यच नाही’, असं ठणकावून सांगणार्‍या, आपल्या वर्तमानासह भविष्याबाबत कमालीच्या सजग असलेल्या ‘मिलेनियल जनरेशन’ची ती प्रतिनिधी आहे.अखिलेश कुमार नावाच्या एका तरुणाची कविता याकाळात कुठंतरी ऐकायला मिळाली.  ‘तुम कैद करलो दिवारोंमें रोशनियां,मेरे लहू से सूरज निकलेगा’आईषीचा व्हायरल झालेला निडर फोटो इथल्या व्यवस्थेला पुन्हा पुन्हा जणू हेच बजावून सांगतो आहे. 

--------------------------