शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

.निमित्त टाचक्या स्कर्टचं आणि काही थेट प्रश्न!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 07:30 IST

मुलींना तोकडे कपडे का घालावेसे वाटतात? फॅशन म्हणून? लांब- घोळदार कपडय़ांचं ओझं नको म्हणून? वावरायला, बाळगायला, वापरायला सोपे म्हणून? चारचौघांत आपण पटकन उठून दिसावं म्हणून? की जागतिकीकरणाच्या प्रक्रि येत आपण जागतिक लाइफ स्टाइल म्हणून कपडेही स्वीकारले आहेत म्हणून? - हे प्रश्न केवळ कपडय़ांचे नाहीत, तर हे आपल्या ‘लोकल भानाचे’ही आहेत!

ठळक मुद्देमुंबईत जे.जे. महाविद्यालयात मुलींनी शॉर्ट स्कर्ट वापरण्यावर बंदी घालण्यात आली. त्यावरून पेटलेला वाद, मुलींचं म्हणणं आणि काही प्रश्न.

- वर्षा माळवदे 

मार्च महिन्याच्या तिसर्‍या आठवडय़ात मुंबईत एक इंटरेस्टिंग गोष्ट घडली. मुंबईच्या प्रतिष्ठित जे. जे. रुग्णालयाशी संलग्न ग्राण्ट मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थिनी अगदी नखशिखांत पेहराव करून आणि चेहरे झाकून कॉलेजच्या आवारात अवतरल्या. कॉलेज व्यवस्थापनाचा निषेध म्हणून त्यांनी ही निदर्शनं केली होती. निमित्त होतं, होळीच्या कार्यक्रमानंतर कॉलेजचे डीन आणि वसतिगृहाच्या वार्डन यांनी छोटे स्कर्ट्स घालायला आणि कार्यक्र मादरम्यान सहाध्यायी पुरुष मित्नांशेजारी बसायला मनाई करणारा नियम. होळीच्या कार्यक्र मादरम्यान काही विद्याथ्र्यानी केलेल्या गैरवर्तनामुळे केलेला हा नियम म्हणजे ‘स्वतर्‍च्या आवडीचे कपडे घालण्याच्या’ आमच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा आहे, असं या निदर्शनं करणार्‍या मुलींचा आरोप होता, तर विद्यार्थिनी योग्य पेहरावात कॉलेजमध्ये याव्यात असा हेतू हा नियम लागू करण्यामागे असल्याचं कॉलेज व्यवस्थापनानं सांगितलं.या घटनेने आपल्यासमोर पुनर्‍ पुन्हा येणारे आणि तरीही अनुत्तरीत असलेले काही प्रश्न पुन्हा उभे केले. नियम कसे तयार होतात? काही विद्याथ्र्यानी केलेल्या गैरवर्तनामुळे नियम तयार करावे हे योग्य आहे का? हे नियम मुलींसाठीच का लागू असतात? गैरवर्तन करणार्‍यांमध्ये मुलगे नव्हते? मग त्यांच्यासाठी कोणताही नियम नाही? योग्य पेहराव म्हणजे काय? पेहरावाची योग्य-योग्यता कोण ठरवतं? किंवा ती कशाने ठरते? नियम तयार होत असताना अनेक अपवादात्मक घटना लक्षात घ्याव्या लागतात, हे कितीही मान्य केलं तरी केवळ अपवादात्मक घटना नियम तयार करण्यासाठी कारणीभूत असता नये. नियम हे व्यवस्थेचा अविभाज्य भाग म्हणून निर्माण झाले तरच अपेक्षित ते परिणाम, शिस्त आणि शासन प्रस्थापित होऊ शकते. भारतासारख्या पुरुषप्रधान सामाजिक रचनेमध्ये नियम मुलींसाठीच का लागू असतात आणि गैरवर्तन करणार्‍यांमध्ये मुलगे असले तरी त्यांच्यासाठी कोणताही नियम का लागू नाही, या प्रश्नांची उत्तरं आपला समाज आजही शोधतो आहे; बदलासाठी धडपडतो आहे.या घटनेतला प्रश्न उरतो तो पेहराव्याच्या योग्य-योग्यतेचा? खरं तर हा प्रश्न आहे वर्तनाच्या योग्य-योग्यतेचा. मुलींनी आखूड कपडे घालू नये असं म्हणत अनेकदा ड्रेसकोड लादला जातो. हा ड्रेसकोड लादताना धर्म आणि संस्कृतीच्या नावाखाली अनेक कारणं आपण देत राहातो. ही भारतीय संस्कृती म्हणजे नक्की काय आणि ती काय काय करण्यापासून स्रियांना वंचित ठेवते हा आणखी एका वादाचा मुद्दा आहे. मुंबईत जे. जे.च्या मेडिकल कॉलेजचा मुद्दा आहे तो नियमाविरुद्ध मुलींनी बंड करण्याचा आणि या बंडाची गरज आणि वैधता तपासण्याचा.भारतीय समाजात अनेक स्त्रियांनी नानाविध कारणांसाठी अनेकवेळा बंडं पुकारली आहेत. गेल्या काही वर्षात तर या बंडखोर वृत्तीची नवनवी रूपं आपल्याला पाहायला मिळताहेत. स्त्रियांचे हक्क आणि त्यांच्याविषयी लढल्या गेलेल्या लढाया या प्रेरणादायी असल्या तरी वरवरच्या, कृत्निम स्त्नी स्वातंत्र्याच्या वल्गना या कशात गणायच्या? स्त्रियांनी दारू पिणं किंवा नाक्यावर सिगारेट ओढणं हे स्त्नी-हक्काचं बंड म्हणायचं? मुलींनी कोणते कपडे घालावेत हा त्यांनी श्वास घेण्याइतकाच नैसर्गिक मुद्दा आहे. त्यासाठी त्यांच्यावर निदर्शनाची पाळी का यावी? प्रत्येक व्यक्तीची आवड, सोय, उत्पन्न, सवयी, कुटुंबाच्या सवयी आणि हवामान यावर खरं तर कपडय़ांची योजना ठरत असते. भारताच्या प्रत्येक प्रांतातल्या कपडय़ांचा इतिहास अभ्यासला तर असं लक्षात येतं की भारतीय हवामानाला साजेसे, उत्पन्न गटानुसार फारसा फरक न पडणारे कपडे भारतीय समाजाने ब्रिटिश विचारसरणीचा प्रभाव जाणवेर्पयत वापरले. उत्पन्नानुसार कपडय़ाचा पोत बदले; पण त्यांची लांबी-रुंदी ही हवामान आणि व्यक्तीचा व्यवसाय यावर ठरे. व्हिक्टोरिअन नैतिकतेच्या कल्पनांचा इतका मोठा प्रभाव भारताने अनुभवला की स्त्नी आणि पुरुष, गरीब आणि श्रीमंत,  व्यक्तिगत आणि सार्वजनिक वर्तनाच्या भारताच्या व्याख्याच बदलल्या. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी, विशेषतर्‍ स्त्रियांनी कोणते कपडे घालावेत किंवा घालू नयेत याची नियमावली तयार झाली. त्याआधीही अशा नियमावल्या केवळ परकीय आक्र मणांच्या प्रभावानेच तयार झाल्या होत्या आणि त्यात स्त्रियांचा अधिकाधिक वस्तुकरणाचाच कल आपल्याला दिसतो. त्यामुळे ‘अंग झाकणे’ ही भारतीय संस्कृतीला परकी असणारी मूल्यकल्पना आपण बाहेरून आयात केलेली आहे; किंबहुना ती आपल्यावर लादली गेलेली आहे. आखूड किंवा छोटे कपडे घालण्याची फॅशन आज मुंबई आणि परिसरात सहज आढळून येते. काही प्रमाणात पुणे शहराच्या काही भागांमध्ये ती आढळते. नाशिक किंवा नागपूरसारख्या शहरांमध्ये ती अजून पसरलेली नाही, किंवा केवळ घरात छोटे कपडे घालण्यार्पयतच ती सीमित आहे; पण फॅशनचं हे लोण इतर ठिकाणी पसरायला फारसा वेळ लागणार नाही. आज मुंबईत घडलेल्या घटना आणि निषेध उद्या इतर ठिकाणीही ऐकायला येतील. मनात डोकावणारा एक सहज प्रश्न म्हणजे मुलींना तोकडे कपडे का घालावेसे वाटतात? फॅशन म्हणून? लांब-घोळदार कपडय़ांचं ओझं नको म्हणून? वावरायला, बाळगायला, वापरायला सोपे म्हणून? चारचौघांत आपण पटकन उठून दिसावं म्हणून? की 1990च्या जागतिकीकरणाच्या प्रक्रि येत आपण जागतिक लाइफ स्टाइल म्हणून कपडेही स्वीकारले आहेत म्हणून? वेगवेगळ्या संदर्भात, वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या मुलींना यापैकी कुठल्याही कारणांनी छोटे कपडे घालावेसे वाटले असू शकतात. किंबहुना 1991 नंतर अतिशय वेगाने जागतिक नागरिक बनू शकलेल्या देशांमध्ये भारताचा क्र मांक वरच्या श्रेणीत आहे. या जागतिक प्रभावाने भारतीयांची आर्थिक आणि सांस्कृतिक विभागणी झाली आहे. सेवा क्षेत्नातल्या उच्च उत्पन्न गटाने हे जागतिक नागरिकत्व, सवयी, पैसा आणि लाइफ स्टाइल जितक्या सहजपणे स्वीकारली आहे, तितक्या सहजतेने तो बदल पारंपरिक व्यवसायात अडकलेल्या निम्न उत्पन्न गटाला अजून स्वीकारता आलेला नाही, कारण त्यांना तो आर्थिकदृष्टय़ा आवाक्यात आलेला नाही. ग्रामीण अर्थव्यवस्थेकडून हळूहळू शहरी बनू पाहणार्‍या समाजगटाची अवस्था अजूनही आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्टय़ा त्रिशंकू आहे. समाजाच्या पोताचे हे अनेक बदल समजून न घेता शहरातला जागतिक नागरिक आपल्या मुलांना गेली 25  र्वष जागतिक क्षितिजं दाखवत लहानाचं मोठं करतो आहे आणि तीच खरी ग्यानबाची मेख आहे. या ‘जागतिक’ नागरिकाची जागतिक क्षितिजाकडे डोळे लावून मोठी होत असलेली मुलगी जागतिक फॅशनचे कपडे घालते. त्यात तिला काहीही वावगं वाटत नाही; वाटूही नये. तिने कोणते कपडे ल्यावेत हे ठरवण्याचा अधिकार तिचाच आहे; पण मग सार्वजनिक परिप्रेक्षात आलेली ही जागतिक नागरिक मुलगी तिच्या देशी परीप्रेक्षाबाबत अगदी अनभिज्ञ असते. ‘त्रिशंकू’ समाज हळूहळू नजर चुकवत चोरून तिच्याकडे पाहात राहातो; कालांतराने नजर बसली की आपल्या मार्गाला लागतो. अजूनही जागतिक बनू न शकलेल्या समाजापुढे मात्न नैतिकतेचे प्रश्न उभे राहातात, त्यांचं मोरल पोलिसिंगही सुरू  राहातं. यापैकी कोणत्याही गटातल्या कोणाचीही लैंगिक वखवख मुलींच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित करते. आणि मग नियम आणि ड्रेसकोड लागू होतात. जोर्पयत समाजाच्या मानसिक परिपक्वतेची प्रक्रि या विविध माध्यमांतून सजगपणे राबवली जाणार नाही, तोर्पयत स्त्रियांनी कोणते कपडे घालावेत याची चर्चा होत राहाणार. इतर कोणत्याही देशासारखी भारतातही या बदलाची वाट पाहावी लागणार. तोर्पयत ‘जागतिक नागरिक’ मुलींनो, तुमच्या आईवडिलांची जागतिक पिढी जे कदाचित तुम्हाला सांगायला विसरली आहे, त्याची आठवण तेवढी ठेवा. समाज पोकळीतून जन्माला येत नाही. त्यामुळे एका समाजाचं दुसर्‍या समाजाकडे संक्र मण व्हायला वेळ लागतो. तेव्हा या मधल्या काळात थोडं ‘लोकल भान ’ बाळगा. तुमचे कपडे तुम्हीच ठरवायचे; पण ते वेळ, जागा, माणसं, परिसर यांच्याकडेही एक नजर राहू द्या. 

( लेखिका मुंबईच्या रुईया महाविद्यालयात प्राध्यापक आहेत.)