शहरं
Join us  
Trending Stories
1
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
2
दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार
3
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
4
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
5
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
6
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
7
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
8
अर्जुन-सानिया यांच्या साखरपुड्यासंदर्भातील फिरकी घेणारा प्रश्न अन् सचिन तेंडुलकरचा 'स्ट्रेट ड्राइव्ह'
9
उकडीचे की तळणीचे मोदक? वाद मोठा जहाल, पण दोन्ही मोदक आरोग्याच्या हिताचे; वाचा फायदे
10
मेड इन इंडिया! मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार अखेर लॉन्च, परदेशातही निर्यात होणार
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
12
गणेश चतुर्थी २०२५: गुरुजींना उशीर झाला? रेकॉर्डेट कंटेट नको? स्वतःच करा गणपती प्राणप्रतिष्ठा
13
चीनमध्ये शक्तीप्रदर्शन; मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकाच व्यासपीठावर, अमेरिकेला लागणार मिरची
14
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
15
पैसै घेऊन मूर्तीकार पळाला, कारखाना जैसे थे ठेवला; ऐनवेळी मूर्ती कुठून आणायची, गणेशभक्तांना चिंता
16
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
17
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
18
कॅनरा बँकेला ११७ कोटींचा गंडा; अमित थेपाडेला अटक, ईडीची दक्षिण मुंबईतील हॉटेलमध्ये कारवाई
19
मेड इन इंडिया 'ई-विटारा'ची १०० देशांमध्ये होणार निर्यात; पंतप्रधान मोदी म्हणाले, "भारताच्या आत्मनिर्भर आणि..."
20
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?

गेंदवा को मारे, नेटवा को फाडे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 08:00 IST

हुतुप इरबा. हे गाव झारखंडच्या नकाशावर शोधलं तरी सापडणार नाही. या गावातल्या पोरी सकाळी उठून घरातली धुणीभांडी करतात. चुली पेटवून स्वयंपाक रांधतात. म्हशींना चरायला नेतात आणि शाळा संपली की संध्याकाळी मैदानावर पळतात- फुटबॉल खेळायला! एका अमेरिकन तरुणाने त्यांना हे इंजेक्शन टोचलं आहे. या मुलींसाठी फुटबॉल हा खेळ नाहीये फक्त! ती आहे एक संधी दारिद्रय़, दुर्लक्ष, अवमान आणि उपेक्षेच्या रिंगणाला लाथ मारून जिवंत होण्याची, माणूस म्हणून जगण्याची संधी! या पोरी आता चक्क श्रीलंका आणि स्पेनमध्ये जाऊन तिथे मॅचेस मारून आल्या आहेत, आणि आता तर त्यांच्या संस्थेला 2019 सालचा अत्यंत प्रतिष्ठित असा ‘लॉरियस स्पोर्ट फॉर गूड’ हा जागतिक पुरस्कार नुकताच मिळाला. फुटबॉलला मारलेली लाथ आयुष्य कसं बदलतो त्याची ही गोष्ट.

ठळक मुद्देफुटबॉलला लाथ घालून आयुष्याचा हरता सामना जिंकायला निघालेल्या झारखंडच्या पोरी

- मुक्ता चैतन्य

मु.पो. हुतुप-इरबा, ओरमानजी ब्लॉक, जिल्हा रांची, झारखंड.या पत्त्याच्या अगलबगल राहणार्‍या सविता कुमारी, पुष्पा कुमारी, शिवानी, नीता, मनीषा आणि त्यांच्यासारख्या सहा ते पंधरा वयोगटातल्या शे-दोनशे आदिवासी मुलींना कालर्पयत स्वतंत्र अस्तित्व नव्हतं. ओळख नव्हती. चेहरा नव्हता.पण अचानक एके दिवशी कधी न पाहिलेली एक गोष्ट या मुलींच्या आयुष्यात आली, फुटबॉल.- आणि सारं चित्रच पालटून गेलं.आज या मुली फडर्य़ा इंग्रजीत बोलतात, आत्मविश्वासाने वावरतात, गुडघ्यावर पोचणारी पॅण्ट घालून जोशात फुटबॉल खेळतात, तो खेळू नये म्हणून कुणी रोखलं तर कुणालाही उलट उत्तर न देता आपलं खेळणं चालू ठेवतात, दिल्ली, कोलकाता, मुंबई मोलकरणी म्हणून जाणार नाही असं ठामपणे सांगतात आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे चिमुरडय़ा वयात घरच्यांना लग्नाचा विचार केला तर त्या सक्तीला ठणकावून नकार देतात.आपल्या उंबर्‍याबाहेरही एक जग असतं, हे त्यांना आता कळलं आहे. ते त्यांनी पाहिलं. अनुभवलं आहे. देशाच्या एका कोपर्‍यात असलेल्या झारखंडच्याही कोपर्‍यातल्या हुतुपच्या या पोरी थेट स्पेनला जाऊन ‘डोनोस्टी कप’ या हौशी फुटबॉल स्पर्धेत कांस्यपदक पटकावून फुटबॉलचं मैदान गाजवून आल्या आहेत.झारखंडच्या या शूर पोरींना भेटायचं, तर मुंबईहून दिल्ली आणि तिथून रांची असा प्रवास करत झारखंडला पोहचेर्पयत वेगळंच जग सुरू झालेलं असतं.रांची राजधानीचं शहर असलं तरी साधारण मध्यम आकाराच्या नगरांप्रमाणेच आहे. इथे पोहचलेली आधुनिक गोष्ट म्हणजे फक्त मॉल बाकीचे रस्ते, वीज आणि बाकीच्या सुविधांचे तीनतेरा वाजलेले. नव्यानं जन्माला आलेलं राज्य, सततची अस्थिर राजकीय परिस्थिती आणि काही भागात झपाटय़ाने फैलावणार्‍या नक्षलवादाची काळी छाया. राज्याची सीमा तोडून नवीन ओळख जन्माला आली, तरी सामान्य माणसांची नाळ अजूनही बिहारशी जोडलेली आहे.हे असलं अर्धवट कुचंबलेपण पावलापावलावर दिसतं. सलतंही.या असल्या कुचंबलेल्या राज्यात काही वर्षापूर्वी एक अमेरिकन तरुण आला. त्याचं नाव फ्रान्झ गॅस्टलर. फ्रान्झ काही सेवाभावी संस्थांबरोबर काम करण्यासाठी म्हणून भारतात आला होता. दिल्लीत दोन र्वष काढल्यानंतर झारखंडला आला तो कृषी ग्रामविकास केंद्राबरोबर काम करण्यासाठी.रांचीच्या आसपासच्या रुक्का, टोला, बस्ती अशा कितीतरी गावांमधून शालेय विद्याथ्र्याना इंग्रजीचे धडे देण्याचे काम फ्रान्झ करायचा. गोरा अमेरिकन तरुण गावागावात फिरतो हे नवलच होतं तिथल्या लोकांसाठी. त्यात तो शाळाशाळांमधल्या मुलग्यांबरोबर फुटबॉल खेळायचा.झारखंडमध्ये महागडय़ा क्रिकेटपेक्षा स्वस्तातल्या फुटबॉलची धुम्मस फार. त्यातून जवळच्या कोलकात्याचा प्रभाव. मुलगे तर गल्लीत सतत पडीक.एकदा काही मुलींनी धीर करून फ्रान्झला विचारलं,‘आम्हालापण फुटबॉल शिकवाल का?’- त्या एका प्रश्नात फ्रान्झला त्याच्या पुढच्या कामाची दिशा दिसली.कृषी ग्रामविकास केंद्रातही नोकरी सोडून फ्रान्झ जवळपास चार महिने हुतुपला येऊन गावकर्‍यांबरोबर राहिला. तो सांगतो, ‘मी या गावात राहायला आलो तेव्हा बघायचो, की मुली सतत कामाला जुंपलेल्या आहेत, त्या खेळायच्या नाहीत म्हणून फुटबॉलचा विषय निघाला तेव्हा मुलांना आणि मुलींनाही मी बरोबर घेतलं होतं. पण मग जाणवलं, मुलांमध्ये फुटबॉल शिकण्याची तेवढी आच नाही. तडफ नाही. मुलग्यांना बहुतेक सगळ्या गोष्टी सहज मिळतात, त्यामुळे शिकण्याची धडपड नव्हती. मुलींचं मात्र तसं नव्हतं. फुटबॉल शिकण्याची संधी मिळाल्यावर त्यांनी ती खेचूनच घेतली. मग मला जाणवलं की फुटबॉल हे एक चांगलं माध्यम असू शकतं. आणि हाच विचार घेऊन मी कामाला सुरुवात केली. आमची ‘युवा’ ही संस्था याच विचारांतून उभी राहिली.सोनूजी हे रांचीमध्ये काम करणारे युवांचे कार्यकर्ते आणि सचिव. मूळचा कलाकार पिंडाचा हा माणूस फुटबॉलच्या प्रेमापोटी ‘युवा’शी जोडला गेला आणि मग युवा चाच झाला. सोनुजी सांगतात, गावाकडे मुलांना पुष्कळ संधी मिळते. पुरुष असल्यामुळे शिक्षण, अन्न, आरोग्य, रोजगार या सगळ्यांसाठी पहिल्यांदा मुलाचाच विचार होतो. त्या मानाने मुलींच्या नशिबी सदाचच दुर्लक्ष. ती काजळी झटकून फुटबॉल खेळायला लागलेल्या आमच्या पोरींकडे पाहाच तुम्ही..त्या पार बदलल्या आहेत. एकतर हा खेळ त्यांनी निवडला, तो शिकवाल का? म्हणून फ्रान्झकडे विचारणा त्यांनी केली. हा खेळ आपलं आयुष्य बदलेल असं काही त्यांना तेव्हा माहीत नव्हतं. या पोरींना घराबाहेर पडायची एक संधी हवी होती. त्यांना मनमोकळं खेळायचं होतं. आता युवाच्या दोन्ही केंद्रांवर आजूबाजूच्या गावातून मुली फुटबॉल खेळायला येतात. दोन्ही केंद्रांवर नियमितपणे फुटबॉलच्या सरावासाठी येणार्‍या मुलींची संख्या जवळपास 200 आहे. तर या दोन्ही गावांच्या पंचक्रोशीतल्या जवळपास 600 मुली युवाशी जोडल्या गेल्या आहेत. त्या मुलींचं एक आवडतं गाणं आहे. - या देशाचं कसं होणार म्हणून सामाजिक-राजकीय गळे काढणार्‍या प्रत्येकानं त्यांचे शब्द वाचायलाच हवेत..जितके दिखाना है, मौका हमने पाया हैतो आओ, दिखा दे.वुई आर वन अ‍ॅण्ड ओन्ली युवामेंदवाको मारेंगे,नेटवा को फाडेंगे,सबसे जुदा हम हम है युवा !(लोकमत दीपोत्सव 2013 या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेल्या लेखाचा हा संपादित अंश. ‘युवा’ संस्थेला आज जागतिक पुरस्कार मिळाला असला तरी लोकमत दीपोत्सवने त्यांच्या कामाची दखल 2013 मध्येच घेत हा एक विशेष रिपोर्ताज प्रसिद्ध केला होता.)