शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
3
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
4
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
5
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
6
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
7
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
8
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
9
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
10
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
12
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
13
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
14
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
15
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
16
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
17
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
18
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
19
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
20
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय

क्रिकेटमधील बॅँडिट्समध्ये 'तो' खेळतो तेव्हा क्लासिक बंदिश रंगते....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 15:21 IST

त्याचं शक्तिस्थान त्याची साधी-सरळ बॉलिंग अ‍ॅक्शन, त्याचा स्विंग, लाइन आणि लेंग्थ. एक नजाकतदार बॉलर रनअपचा आलाप घेत स्विंगची तान छेडत शुभ्र कपडय़ात हातातील रेडचेरी बॉल टाकतो....

ठळक मुद्दे क्रिकेटमधील बॅँडिट्समध्ये ही बंदिश ‘खास’ आहे.

अभिजित पानसे

गेल्या काही वर्षापासून क्रिकेटमध्ये बॉलर जमात ही सलमान खानच्या चित्रपटातील व्हिलन व इतर दुय्यम पात्रांसारखी झाली आहे. भाईकडून लेखकाला कडक सूचना मिळाल्याने लेखकाने या पात्रांना कमकुवत करून या पात्रांना फक्त एकच भूमिका पार पाडायला लावत असतो ती सलमान कसा मोठा दिसेल. सध्या क्रिकेटमध्ये वेगवान बॉलर्स याच दुय्यम भूमिका निभावत आहेत. बॅट्समनला मोठं करणं, त्याला प्रेक्षकांसमोर हिरो बनवणं, बॅट्समनकडून मार खायला लावणं हेच जणू त्यांचं आता काम उरलंय. आणि हे नियम आयसीसी भाईनेच लिहिले आहेत.पॅव्हिलीयनच्या विंगेतून बाहेर येऊन स्विंगसम्राट, सीमसम्राट बॉलर माध्यान्ही डोक्यावर आलेल्या तळपत्या सूर्याच्या उन्हात उघडय़ा मैदानात डेड रबर, सिमेंट खेळपट्टीवर हातात बॉल घेऊन आर्जवे करताहेत की ‘कोणी गवत देता का रे गवत! कोणी बाऊन्स देता का रे! आयसीसी सरकार!’ बॉलर्सची ही दीनवाणी सद्यर्‍स्थिती झाली आहे ती क्रिकेटच्या स्क्रिप्ट रायटर्सकडून म्हणजे बोर्डाकडून. सर्व नियम बॅट्समनफ्रेण्डली बनवून.2008 पासून आयपीएल सुरू झाल्यानंतर काही वर्षानी दोन नव्या बॉलचा नियम, मग पॉवर प्लेचा सुपरसेल, बॉलरचा पाय पाव मिलिमीटरनेही क्रिजच्या पल्याड गेला तर त्याला नो बॉलचा मोठा अपराधी घोषित करून बॅट्समनला मिळणारी एका वर एक फ्री हिटची बंपर ऑफर असे अनेक विविध सोयीसुविधा बॅट्समन जमातीला मिळत गेल्यात.  एकंदर वेगवान बॉलर्सची अवस्था दात काढलेल्या सापासारखी झाली असताना एका वेगवान बॉलरने गेल्या आठवडय़ात सहाशे टेस्ट विकेट घेण्याचा रेकॉर्ड केला. वेगवान बॉलर म्हणून सगळ्यात जास्त कसोटी बळी घेणारे म्हटलं की आठवतात कोर्टनी वॉल्श, ग्लेन मॅकग्रा, वसीम अक्रम. पण 600 कसोटी विकेट घेणारा एकमेव जलदगती बॉलर ठरला आहे इंग्लंडचा जेम्स अँडरसन.फार मोठा विक्र म आहे हा. एखाद्या बॅट्समनने बारा हजार ते पंधरा हजार कसोटी धावा कराव्यात असा हा विक्रम आहे. इथेही बॉलरच्या कर्तृत्वाचं माहात्म्य सांगताना बॅट्समनच्या कामगिरीचा सहारा घ्यावा लागला. ते असो. 

सहाशे कसोटी बळी घेणारा प्रथम बॉलर इंग्लंडचाच असावा यासाठी इंग्लंड क्रिकेट बोर्ड खरंच कौतुकास पात्र आहे. क्लासिक कसोटी क्रिकेटला ते अजूनही आजच्या वीस-वीसच्या बाजारात गांभीर्याने घेतात. एका कॅलेंडर वर्षात सगळ्यात जास्त कसोटी सामने इंग्लंडच खेळतं.2003 मध्ये इंग्लंड संघात एका मध्यम उंचीचा, मध्यम बांधा असलेल्या वेगवान बॉलरचं आगमन झालं. सुरुवातीला संघातील मोठय़ा इतर बॉलर्समुळे तो झाकोळला गेला. शिवाय त्याला बॅट्समनकडून मारही पडायचा.स्वतर्‍कडे जास्त वेग नसताना त्याने हळूहळू संपूर्ण लक्ष बॉलच्या सीमवर, लांबी, रेषेवर आणि सगळ्यात महत्त्वाचं हवेत स्विंग करण्यावर केंद्रित केलं. इंग्लंडची हवा व थंड वातावरण स्विंगला आधीच पोषक. तो बॉलर आपल्या हवेतील स्विंगच्या नजाकतीने मोठमोठय़ा बॅट्समनना गोंधळात टाकून, घाबरवून सोडत राहिला. असा हा जेम्स अँडरसन बघता बघता इंग्लिश बॉलिंग आक्रमणाचा सरदार बनला.अत्यंत अबोल असलेल्या जेंटलमन जिमी अँडरसनने क्वचितच बॅट्समनला शिवीगाळ केली असेल. 2006 मध्ये मलिंगासारखे डोक्यावर केसांचं रंगीबेरंगी पागोटं करत त्याने वेगळा लूक केला होता; पण त्याचं शक्तिस्थान त्याची साधी-सरळ बॉलिंग अ‍ॅक्शन, त्याचा स्विंग आणि त्याची लाइन आणि लेंग्थ. याच शस्नंच्या भरवशावर त्याने बॅट्समनच्या मनात भीती निर्माण केली व इंग्लंडला अनेक कसोटी सामने जिंकवून दिले.भारताचा 2011 वर्ल्डकप जिंकल्यावर झालेला दौरा असो, 2014 चा दौरा व नुकताच झालेला 2018चा इंग्लंड दौरा असो, भारत तिन्ही दौर्‍यात सपशेल हरला. या तिन्ही दौर्‍यांच्या अपयशाचं सगळ्यात प्रमुख कारण म्हणजे जेम्स अँडरसन.जेम्स अँडरसनबद्दल त्याचे सहकारी कित्येकदा त्याच्या अबोलपणाबद्दल सांगतात, की 2018 च्या भारताच्या इंग्लंड दौर्‍यात कसोटी मालिका सुरू असताना एकदा जेम्सच्या गाडीने एका शहरातून दुसर्‍या शहरात जाताना संपूर्ण प्रवासभर तो एक शब्दही बोलला नाही. त्याच्या डोक्यात फक्त विराट कोहलीला आऊट करण्याचे मनसुबे तयार होत होते. विराट कोहली आणि जेम्स अँडरसनमधील स्पर्धा विख्यात आहे.2014 चा इंग्लंड दौरा विराट कोहलीच्या आजवरील करिअरमधील काळा डाग आहे. त्या इंग्लंड दौर्‍यावर सपशेल अपयशी ठरलेला विराट कोहली अँडरसनचा सतत बळी बनला होता; पण विराट कोहली स्वतर्‍वर किती प्रचंड मेहनत घेतो हे 2018 च्या इंग्लंड दौर्‍यावर बघायला मिळालं. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेच्या सुरुवातीपासून विराट कोहली आणि अँडरसनच्या स्पर्धेबद्दल बोललं जातं होतं. यावेळीही अँडरसन विराटला आपला बकरा बनवणार इंग्लंड मीडियाकडून सतत म्हटलं जातं होतं. स्वतर्‍ जेम्स अँडरसनही याबद्दल आत्मविश्वासू होता; पण हा विराट कोहलीचं कॅरेक्टर या दौर्‍यात दिसलं. संपूर्ण मालिकेत सगळ्यात जास्त रन्स काढणारा विराट कोहली होता आणि पाच कसोटीतील दहा इनिंग्समध्ये एकदाही जेम्स अँडरसनने विराट कोहलीला आऊट केलं नाही. आता कोहलीनंही त्याचं विक्रमासाठी अभिनंदन केलं आहे. आठशे विकेट घेणारा मुरलीधरन महानोत्तम गोलंदाज आहे यात किंचितही दुमत नाही; पण शेन वॉर्न, मुरलीधरन, अनिल कुंबळे हे सारे स्पीनर्स होते. एक वेगवान बॉलरला सातत्याने आपला वेग, स्विंग, फिटनेस टिकवणं अत्यंत कठीण काम असतं. सतत गुडघे व पाठीवर येणारा दबाव सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत 156 कसोटी सामने खेळून सहाशे विकेट घेणारा जेम्स अँडरसन महान बॉलर आहे.करिअरमध्ये आजतागायत तेहेतीस हजारांच्या वर बॉल टाकून, सलग मोठमोठे अचूक लाइन - लेंग्थने स्पेल करणारा जेम्स अँडरसन बॅट्समनला जखडून ठेवतो. याचा फायदा दुसर्‍या बॉलरला होतो. स्टुअर्ट ब्रॉडही अँडरसनच्या बॉलिंगची सोबत लाभल्याने पुढील वर्षी स्वतर्‍चे सहाशे बळी घेईल. यामुळे कोणत्याही कॅप्टनला जेम्स अँडरसन आपल्या संघात हवा असतो. जेम्स अँडरसन हा टी-ट्वेन्टी वा आयपीएलसारख्या चकचकाट असलेल्या स्पर्धापेक्षा कसोटी क्रि केटला कायम प्राधान्य देतो. म्हणून जेम्स अँडरसन हा महान खेळाडू आहे.एक नकारात्मक गोष्ट जेम्स अँडरसनबद्दल बोलली जाते की तो फक्त इंग्लंडमध्येच यशस्वी होतो, आशिया उपखंडात तो निष्प्रभ होतो. जे खरं तर बर्‍यापैकी बरोबरही आहे. येथे एक गोष्ट समजणं आवश्यक आहे की अँडरसन हा स्विंग बॉलर आहे. हवेत बॉलची दिशा वळवून बॅट्समनला चकवणे, स्लिपमध्ये आऊट किंवा एलबीडब्ल्यू आऊट करणे हे त्याचे बलस्थान आहे. इंग्लंडच्या थंड, दमट हवा, ढगाळ वातावरण स्विंगच्या पिकासाठी पोषक आहे. त्यामुळे हाच अँडरसन भारतात खेळायला आल्यावर भारतातील उष्ण व कोरडं वातवरण जेम्स अंडरसनसारख्या मध्यम गती नजाकत असलेल्या स्विंग बॉलरला बर्‍यापैकी निष्प्रभ करतं. सध्याच्या क्रि केटप्रेमी (?) प्रेक्षकांचे मनोरंजनाचे चोचले पुरवताना क्रिकेटचा बॅट्समनला हिरो बनवण्याच्या अट्टाहासात वेगवान बॉलरची पंचिंग बॅगसारखी दयनीय अवस्था करून ठेवली असताना सरफरोश चित्रपटातील नसीरूद्दीन शहांनी म्हटलेलं वाक्य आठवतं. ‘दरसल ये शायरी में तसव्वुर की कंगाली का दौर हैं. जब अच्छी गजले लिखी ही नही जायेंगी तो हम गायेगे कहा सें!’ यावरून तमाम अस्सल कसोटी क्रि केटप्रेमींच्या वतीने म्हणावं वाटतं की, ‘दरसल ये क्रि केट के तमाशे में क्रि केट की कंगाली का दौर हैं! अगर अच्छे तेज गेंदबाज आयेंगे ही नहीं तो हम क्लासिक क्रिकेट देखेंगे कहा से?’अशावेळी जेम्स अँडरसनसारखा एक नजाकतदार बॉलर रनअपचा आलाप घेत स्विंगची तान छेडत शुभ्र कपडय़ात हातातील रेडचेरी बॉल टाकतो तेव्हा वाटतं अजूनही क्लासिक बॉलर्सची बंदिश सुरू आहे. आणि क्रिकेटमधील बॅँडिट्समध्ये अजूनही कोणी बंदिश गात आहे.

(अभिजित ब्लॉगर आहे.)