शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

अठराव्या वर्षी होतं असं! ...पण दुसरे आॅप्शन्सही असतात !!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2018 12:22 IST

‘मला नुस्तं लोळत पडायचंय बाबांनो, मित्रांसोबत नुसत्याच गप्पा मारायच्यात, फोन हातात घेऊन दिवस दिवस बसायचंय... थंड बसून राहाणं हाच माझा छंद आहे’ - असं ज्याच्या-त्याच्या कानात ओरडून सांगावंसं वाटतं ना?

- प्राची पाठकछंद काय तुझा?हा एक सहजच विचारला जाणारा प्रश्न. अगदी शाळेपासून लोक आपल्याला विचारत असतात. ‘आवडतं काय तुला?’मोठ्ठं होऊन अमुक होणार, याचं उत्तर लहानपणी काहीही दिलं तरी चालतं. पण १८ वर्षांचं होता होता मात्र करिअरसह या ‘काय आवडतं?’ प्रश्नाचा एक नवा व्याप मागे लागतो.आपण आपल्या आवडी-निवडीनुसार एक, दोन, चार छंद सांगतो. त्यात आपल्या अवतीभोवती मित्र-मैत्रिणींचा गराडा असतो. सोशल साइट्सवरचा माहितीचा भडिमार असतो. फोनमधून डोकं वर निघेल तर नां, ही वस्तुस्थिती कमी- जास्त फरकाने आजकाल अनेकांना समजून घ्यावी लागते.त्यात नवीन प्रश्न आयुष्यात अचानक महत्त्वाचे ठरू लागतात. आपलं दिसणं भारी आहे का? आपला सेल्फी कसा दिसतो? या बाजूने कसा? त्या बाजूने कसा?त्यात वय असं की, घरात काही जबाबदाºया असतात. अभ्यास, करिअर गोल्स असतात. कुणाला एखादा जॉब घेऊन शिकावं लागतं. कुणाला काही भलत्याच अडचणी येतात. आणि या साºयातून काय आवडतं वा काय आवडत नाही, याचीच आपली यादी मोठी होते. शी, हे नाही करणार मी, असं म्हणत हेच मत जास्त पक्कं होत जातं.लोक सांगत असतात, ‘हेच वय आहे काहीतरी कर! त्यांच्याकडे आपण ‘काय लेक्चर देतात’ म्हणून बघतो. लेक्चरचा डोस वाढला तर त्या लोकांपासून पळ काढू लागतो.‘मला केवळ लोळायचं आहे बाबांनो, मित्रांसोबत नुसत्याच गप्पा मारायच्या आहेत, फोन हातात घेऊन दिवस दिवस बसायचं आहे’, असं त्यांच्या कानात ओरडून सांगावंसं वाटतं. हे करायलापण हेच वय आहे, नंतर आहेच करिअर मागे धावपळ, घरात धावपळ. ‘थंड बसून राहाणं, हा माझा छंद आहे,’ असं कधी कोणाला मुद्दाम सांगावं असंही वाटत असतं.त्यात मुलांना विचारायचे प्रश्न आणि मुलींना विचारायचे प्रश्न असा भेद अनेकदा असतोच. ‘माझं मी ठरवीन, हाच माझा छंद आहे, ते तुम्ही प्लीज समजून घ्या’ असं सांगून टाकावं असंही मुलींच्या मनात येतंच.मात्र या साºयात होतं काय, या माझं मी ठरवीनमध्ये कळत नकळत मला काय आवडतं, काय करायचं आणि काय काय शिकायचं आहे, यापेक्षा मी काय करणार नाही, काय मला नको आहे, कोणती गोष्ट अजिबातच आवडत नाही, याचीच यादी मोठी आणि पक्की होत असते. आपल्याला काय आवडतं यापेक्षा काय आवडत नाही हे पटकन सांगता यायला लागतं.काय आवडत नाही, याची यादी म्हणजेच आपली ओळख बनून जाते. मी या चार गोष्टी करून बघितल्या. त्यात हे-हे अनुभव आले. त्यावरून सध्या तरी ही गोष्ट मला पुढे ढकलाविशी वाटतेय, कदाचित ती मला झेपत नाहीये, ते लक्षात आलं आहे, असं फार कमी जण सांगतात.बाकीचे सारे एकदम स्पेसिफिक आवडी-निवडी वरवरच्या माहितीवरून बनतात. ‘नाही म्हणजे नाहीच्च’ हा शिक्का कितीतरी गोष्टींवर वयाची विशीसुद्धा आलेली नसताना ठामपणे मारून टाकला जातो.‘करून तर बघू’, हा उत्साह फार लवकर मावळतो. कदाचित आज टाळलेली गोष्टच उद्या आपल्याला आयुष्याची दिशा देऊ शकते. तिचा कुठे नां कुठे वापर करता येऊ शकतो. निदान कोणत्या-कोणत्या गोष्टींमुळे आपल्याला ती गोष्ट जमली नाही, ते तरी नीटच लक्षात येतं.आजूबाजूला त्या विषयांत नावाजलेलं कोणी त्या टप्प्यात चटकन आपल्याला मदत करू शकणारं असतं. तशी संधी कदाचित नंतर मिळणार नाही, अशी परिस्थिती असते. त्यामुळे म्हणून एकदमच विषयाला कुलूप लावून टाकायचं नाही. फाइल डिलीट करून टाकायची नाही; आपल्या डोक्यात डाउनलोड करून ठेवायची. एडीट करता येईल का, ते बघायचं. त्यानिमित्ताने कुठे भटकायला जाता येतं, वेगळ्या फिल्डमधली माणसं भेटतात, नवीन विश्व कळतं. हे सारं या वयातच करून घ्या.नंतर ना वेळ उरतो हाताशी, ना अनेकदा आयुष्य परवानगी देतं. त्यामुळे ‘खुल के जिओ’ हा एकमेव मंत्र हाताशी ठेवून मनात येईल ते करून पाहणं हा या वर्षीचा मंत्र केला तर खूप बहार येते आयुष्यात!(prachi333@hotmail.com)