शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

IOT- जागोजागी इंटरनेट जोडणारा हा कोणता स्मार्ट जॉब?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2019 7:00 AM

वस्तू, यंत्र, उपकरणं स्मार्ट होतील आणि ते परस्पर माणसांची कामं करून टाकतील! त्यांना कामाला लावणारं एक नवीन ‘कुशल’ जग

ठळक मुद्देमाहितीची सुरक्षितता जपू शकणार्‍यांसाठी ही सुवर्णसंधी ठरू शकते.

अतुल  कहाते  

जगामधली जवळपास प्रत्येक गोष्ट किंवा वस्तू आपण इंटरनेटला जोडू शकलो तर? असं शक्य झालं तर जगातली प्रत्येक गोष्ट किंवा वस्तू एकमेकांशी इंटरनेटच्या माध्यमातून संवाद साधू शकेल. म्हणजेच अक्षरशर्‍ जागोजागी इंटरनेट असेल. याचा सोपा अर्थ म्हणजे कुठलीही वस्तू कुणीही कुणालाही माहिती किंवा संदेश पाठवू शकेल किंवा कुणाकडूनही माहिती किंवा संदेश मिळवू शकेल. सगळे एकमेकांना जोडलेले असतील. म्हणूनच अशा सगळ्या गोष्टी चतुर म्हणजेच ‘स्मार्ट’ झालेल्या असतील. या संकल्पनेला इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) असं म्हणतात. यामधला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एखादी गोष्ट किंवा वस्तू ‘स्मार्ट’ होण्यासाठी तिच्यामध्ये खूप शक्तिशाली संगणक असणं गरजेचं नसतं. फक्त अशा शक्तिशाली संगणकाला जोडलं जाण्याची क्षमता या वस्तूमध्ये आली की काम झालं! असं कुठं होतं का, तर होतं. तशी अनेक उदाहरणं घेता येतील. शेतामध्ये गरज नसताना पिकांना जास्त पाणी देणं किंवा पिके वाळलेली असूनसुद्धा त्यांना पाणी न देणं या दोन्ही समस्या दूर करण्यासाठी शेतजमिनीमध्ये नेमकी किती आद्र्रता आहे याची सातत्यानं मोजणी करून पाणी देण्याची वेळ होताच शेतकर्‍याला तसा संदेश गेला तर शेतकर्‍याचं काम किती सोपं होईल! यासाठी आता जमिनीची आद्र्रता मोजू शकणारी मापकं म्हणजे ‘सेन्सर्स’ मिळतात. ती जमिनीत खोचली आणि इंटरनेटला जोडली की आपल्या मोबाइल फोनवर शेतकरी केव्हाही शेतजमिनीमधल्या ओलाव्याचं प्रमाण बघू शकतो. इतकंच नव्हे तर असं मापक समजा शेतामधल्या पाणीपुरवठा करणार्‍या अशाच ‘स्मार्ट’ यंत्राला जोडलं तर गरज असेल तेव्हा पिकाला आपोआप पाणी घातलं जाईल!

हे भविष्यात महत्त्वाचं का ठरेल?

तंत्रज्ञानाचा वाढता झपाटा आणि लोकांचा यंत्रावरचा वाढत असलेला विश्वास या गोष्टींमुळे अधिकाधिक कामं यंत्राकडून करून घेण्याकडचा कल वाढत चालला आहे. निदान लौकिक अर्थानं आपलं आयुष्य आणखी सोपं आणि सुखासीन करण्याच्या दृष्टीनं माणूस सातत्यानं यंत्रांकडून आत्तार्पयत अशक्यप्राय वाटत असलेली कामं करून घेण्यासाठी धडपडताना दिसतो. आपण यंत्रांकडून काम करून घेत असताना त्या यंत्राला सतत माहिती पुरवणं किंवा सूचना देणं याऐवजी निरनिराळ्या यंत्रांनीच एकमेकांशी संवाद साधला तर किती बरं होईल असा विचार माणसानं केला आणि त्यातून हे ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ जन्माला आलं. याचा वापर आज कल्पनेपलीकडच्या अनेक गोष्टींसाठी होऊ शकतो. उदाहरणार्थ- मधुमेह असलेल्या माणसाला नियमित रक्तामधल्या ग्लुकोजची पातळी मोजून त्यानुसार गोळ्या-औषधं किंवा इन्स्युलिनची मात्रा यामध्ये बदल करावे लागतात. नजीकच्या भविष्यात ही कटकट दूर होण्याची दाट चिन्हं आहेत. आपल्या शरीरात बसवलेला एक छोटासा सेन्सर आपल्या शरीरातल्या रक्तामधल्या ग्लुकोजची पातळी आपण ठरवून दिलेल्या वेळी मोजेल आणि त्यानुसार आपल्याच शरीरात बसवलेल्या इन्स्युलिनचा साठा असलेल्या दुसर्‍या सेन्सरला आपल्या शरीरात किती इन्स्युलिन सोडायचं हे सांगेल. हा दुसरा सेन्सर त्यानुसार आपल्याला इन्स्युलिन पुरवेल. त्याच्याकडचा इन्स्युलिनचा साठा संपत आला की तोच औषधांच्या दुकानाला कळवून इन्स्युलिन मागवून घेईल! अशा किती गोष्टींमध्ये आपण ‘आयओटी’चा वापर करू शकतो याचा फक्त विचार केला तरी या तंत्रज्ञानाचं भविष्य किती उज्ज्वल आहे हे आपल्या लक्षात येईल.

हे शिकण्यासाठी कोणती कौशल्यं लागतात?

आयओटी ही संकल्पना तशी खूप मोठी आहे. म्हणूनच ‘आयओटी शिकणं’ असं काही नसतं. आयओटीमधल्या अनेक क्षेत्रांपैकी नेमक्या कुठल्या क्षेत्रात आपण काम करायचं हे ठरवणं गरजेचं असतं. एकूणच दोन यंत्रं एकमेकांशी थेट संवाद साधणार असतील तर हे संभाषण कसं होईल हे समजून घेणं त्यासाठी आवश्यक ठरतं. म्हणजेच मानवविरहित संवादाची संकल्पना जाणून घेणं यासाठी गरजेचं असतं. हे थेटपणे सगळ्या अभ्यासक्रमांमध्ये अजून शिकवलं जात नसलं तरी काही ठिकाणी तशी सोय उपलब्ध झालेली आहे. अर्थातच या सगळ्याच्या मुळाशी संगणकीय कामकाज कसं चालतं याची जाण आवश्यक ठरते. म्हणूनच आयओटीसाठी लागणारं सॉफ्टवेअर लिहायचं असेल तर त्यासाठी संगणकाची भाषा, संगणकाची रचना, संगणकाच्या जाळ्यांचं कामकाज हे सगळं समजून घेणं महत्त्वाचं आहे. संगणकशास्त्राच्या बहुतेक सगळ्या पदवी अभ्यासक्रमांमध्ये या संकल्पना शिकवल्या जातात. त्या पायावर आयओटीशी संबंधित उर्वरित संकल्पना शिकणं शक्य होतं. खासकरून यंत्रांमधला थेट संवाद म्हणजे एक वेगळंच आव्हान असतं. याचं कारण म्हणजे यंत्रांमध्ये किंवा नेहमीच्या उपकरणांमध्ये संगणकीय यंत्रणा बसवायची तर त्यावर अनेक मर्यादा असतात. अशा संगणकीय यंत्रणेचा मेंदू म्हणजे ‘सीपीयू’ फार ताकदीचा नसतो. अशा यंत्रणेची मेमरीही मर्यादित असते. या सगळ्या अडचणींवर मात करून आयओटीसाठीचं सॉफ्टवेअर लिहिणं हे कौशल्याचं काम असतं. म्हणूनच ज्याला चांगलं प्रोग्रॅमिंग जमतं तो आयओटीमध्ये जास्त सहजपणे काम करू शकतो. याखेरीज लिहिलेलं सॉफ्टवेअर तपासणं आणि त्याच्या चाचण्या घेणं म्हणजेच सॉफ्टवेअरचं ‘टेस्टिंग’ करणं हीसुद्धा आयओटीच्या संदर्भातली एक अत्यंत महत्त्वाची गरज असते.

रोजगाराच्या संधी कोणत्या?

1. भविष्यात सगळ्या वस्तू आणि सगळी उपकरणं हे सगळं एकमेकांना जोडलेलं असेल, त्यांच्यामध्ये संवाद होत असला तर त्यातून निर्माण होणारा एक महत्त्वाचा प्रश्न या संवादाच्या सुरक्षिततेचा आहे. उदाहरणार्थ समजा एका पाणी शुद्धीकरण प्रकल्पामध्ये हे तंत्रज्ञान वापरून दररोज पाणी किती अशुद्ध आहे याचं आपोआप मोजमाप करून त्यानुसार त्यात ठरावीक प्रमाणात क्लोरिन मिसळलं जाईल. आता एखाद्या विकृत विचारांच्या हल्लेखोरानं या आयओटीवर हल्ला करून क्लोरिनची मात्रा बदलून टाकली तर त्या सगळ्या भागाला रसायनयुक्त पाण्याचा पुरवठा होईल! म्हणजेच आयओटी तंत्रज्ञानाची सुरक्षितता जपणं हा अत्यंत गंभीर मुद्दा ठरणार आहे. साहजिकच यामध्ये खूप संधी उपलब्ध होतील. माहितीची सुरक्षितता जपू शकणार्‍यांसाठी ही सुवर्णसंधी ठरू शकते.2. याखेरीज इतक्या वस्तू आणि इतकी उपकरणं सातत्यानं माहितीची देवाणघेवाण करत असतील तर त्यातून निर्माण होत असलेल्या माहितीच्या अफाट साठय़ाचं पृथक्करण करणं, त्यांचं विश्लेषण करणं म्हणजेच ‘आयओटी अ‍ॅनॅलिटिक्स’ हे क्षेत्रही अतिशय महत्त्वाचं ठरेल. 3. ‘स्मार्ट’ वस्तूंची, यंत्रांची आणि उपकरणांची निगा राखणं, त्यांची देखभाल करणं यासाठीही मोठय़ा प्रमाणावर मनुष्यबळ लागेल. खास उल्लेख न केलेली एक गोष्ट म्हणजे सगळ्या वस्तूंनी आणि उपकरणांनी एकमेकांशी संवाद साधायचा असेल तर त्यासाठी आवश्यक असलेलं हार्डवेअर तयार करणं, त्या हार्डवेअरचा वापर करू शकणारं सॉफ्टवेअर लिहिणं यासंदर्भात आयटी कंपन्यांनाही कुशल लोक लागतील. 4. सर्वसाधारण सॉफ्टवेअर लिहू शकणार्‍या लोकांना आयओटीशी संबंधित असलेली कौशल्यं आत्मसात करावी लागतील.