शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

माहितीची लाइट, सत्ताधार्‍यांची टाइट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 06:00 IST

गावात हीरो व्हायचंय? ग्रामसभेत जा, प्रश्न विचारा. पण हवेत बॅट मारू नका, दांडी उडेल. अभ्यास करून जा, तो कसा करायचा, सांगतो, फोन तर घ्या तुमचा हातात.

ठळक मुद्देग्रामसभेत बोलायचं असेल तर थोडी तयारी करून जाणं गरजेचं आहे.

- मिलिंद थत्ते

लोकसभेत एखाद्याला पक्षाला बहुमत, तर त्यांचा नेता तो पंतप्रधान. देश चालवायला, सरकार हाकायला पैसे लागतात. ते कमवायला सरकारला कर गोळा करावा लागतो. पण कर किती नि कुठला गोळा करायचा हे पंतप्रधानाला लोकसभेला विचारावं लागतं. अर्थसंकल्प लोकसभेत मंजूर व्हावा लागतो, सरकारचा जमाखर्च सांगावा लागतो, त्यात लोकसभा बदल करायला लावू शकते. हे सारं करून मग पंतप्रधान कारभार करू शकतात. देशासाठी कायदा-नियम करण्याचे अधिकार लोकसभेला असतात. लोकसभा ठरवील त्याप्रमाणे अंमलबजावणी करणे हे सरकारचं काम.आता तुम्ही म्हणाल, हे तर सगळं आम्हाला माहीत आहे ना बे ! काहून बोअर करून राहिला?हे सगळं जर तुम्हाला माहीत आहे, तर मग हेही माहीत असेल की, देशाची लोकसभा, राज्याची विधानसभा, तशी गावाची ग्रामसभा ! अन् मग या ग्रामसभेतले खासदार कोण? सही जवाब ! तुम्हीच. तुमच्या खासदारकीची मुदत काय? अमर्याद, मरेपर्यंत खासदार! मग खासदार म्हणून काम कसं चाललंय तुमचं? जाता की नाही ग्रामसभेत? बोलता तिथे की मूग गिळून बसता?जर ग्रामसभेत बोलायचं असेल तर थोडी तयारी करून जाणं गरजेचं आहे. नेट प्रॅक्टिस करायची नाही, अचानक ब्याट हातात घ्यायची नि बेफाम फिरवायची - असं केलं तर तिथं दांडी उडणार तुमची! हीरोचा झिरो होनार ! म्हणूनच तयारी करायची ग्रामसभेत जाण्यापूर्वी. म्हणजे काय?तर त्यासाठी हे करून पहा.  तो तुमचा लई शाना फोन घ्या, त्यात panchayatonline.gov.in ही वेबसाइट उघडा. तिथं वर्ष निवडा, राज्य निवडा, planning unit किंवा योजना इकाई म्हणून village panchayat  निवडा. मग जिल्हा, तालुका, गाव समदं निवडा.* डायरेक्ट त्या वर्षाचा पंचायतीचा प्लॅन दिसतो. कामं दिसतात, रक्कम दिसते, कुठून निधी येणार ते दिसतं. त्यात वित्त आयोग  (finance commission) आणि स्वनिधी (own fund) हे दोन नक्की दिसतील. हे दोन्ही पैसे ग्रामपंचायतीकडे हमखास असतात. * मागच्या वर्षीचा आराखडा अशा पद्धतीने पहा, डाउनलोडा, अन् आपल्या वस्तीत सर्वांना वाचून दाखवा. * कोणती कामे झाली नाहीत, त्यावर बोट ठेवा. मग ग्रामसभेत तुमचा म्हंजी खासदारांचा आवाज उठू द्या. आपण माहितीच्या आधारावर प्रश्न विचारतो, तेव्हा आपल्या शब्दाला वजन असतं.एकदा करून तर पहा. आपण माहितीची लाइट लावली, की सत्ताधार्‍यांची टाइट होती का नाई बगा !

    (लेखक ‘वयम्’ चळवळीचे कार्यकर्ते आहेत)